राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे कळंबोलीत महारानी अहिल्यामाई होळकर यांच्या २२८ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अभिवादन करतांना राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते (छायाचित्र : ऋषिकेश जरग) |
महारानी अहिल्यामाई होळकर यांचा आदर्श राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून रासपची वाटचाल सुरू : शरदभाऊ दडस
कळंबोली : यशवंत नायक ब्युरो
महारानी अहिल्यामाई होळकर आदर्श राज्यकर्त्या होत्या. त्यांचा आदर्श राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन रासपचे विदयार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष कळंबोली शहर शाखा यांनी महाराणी अहिल्यामाई होळकर यांचा २२८ वा स्मृतिदिन कार्यक्रम कामगार नाका येथे आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात श्री. दडस बोलत होते.
श्री. दडस पुढे म्हणाले, महाराणी अहिल्यामाई होळकर यांच्या जन्मगावी चोंडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली. जिस समाज का दल है! उस समाज का बल है!! जानकर साहेबांनी रासपचे दल तयार केले म्हणून आपल्याकडे राजकीय बळ आहे. आपण भीक मागणारे नसून देणारे आहेत याचा विचार करायची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष संघर्ष करत आहे. महात्मा फुले यांचा विचार अहिल्यामातेचे आदर्श राज्य प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद लोकसभा व विधानसभेत वाढवावी लागेल.
महारानी अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहत अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे सुदामशेठ जरग, महात्मा फुले वाचनालय अध्यक्ष गोरख वाघमारे, विठ्ठल शिनगारे, भिमराव मोहिते, पांडुरंग पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष आण्णासाहेब वावरे, शहर उपाध्यक्ष देवानंद मोटे, देविदास खेडकर, काशलिंग जानकर, शहर सचिव शहाजी शिंदे, माध्यम प्रतिनिधी ऋषिकेश जरग, शशीकांत मोरे, चैतन्य जरग, गोरक्षनाथ कोकरे, सागर माने, संतोष दोलताडे, समाधान मोटे, अमोल कोळेकर आदी शेकडो नागरिक उपस्थित होते.
अन्य मान्यवर व छायाचित्र :
👍👏👌
ReplyDelete