Sunday, August 27, 2023

उद्या पासून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा

उद्या पासून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो 

एकेकाळी महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने एकला चलो चा नारा देऊन क्षेत्र पंढरपुरातून माढा लोकसभा मतदारसंघात जन स्वराज यात्रेची सुरुवात केली. अहमदनगर, मुंबईतील सहा लोकसभा मतदार क्षेत्र व परभणी, सांगली या लोकसभा मतदार क्षेत्रातून जन स्वराज यात्रा फिरली. जन स्वराज यात्रेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. उद्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांच्या नेतृत्वात जन स्वराज यात्रा निघत आहे. महादेव जानकर यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा होत असल्याने राजकीय समीकरणे बिघडणार आहेत. लाखोंच्या फरकाने विजय होणाऱ्या सुप्रिया सुळेंना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी एकाकी लढत देऊन चांगलेच जेरीस आणले होते. बारामती लोकसभा क्षेत्रावर दबदबा असणाऱ्या शरद पवार यांच्या कन्येविरुद्ध थेट लढत देऊन महादेव जानकर यांनी रणमैदान गाजवत राजकिय समीकरणे बिघडवली होती. माढा, परभणी, मिर्झापूर, बारामती असे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाची नावे घेत महादेव जानकर यांनी थेट कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे पुन्हा विचार केला जात आहे. मात्र ते कोणत्या मतदारसंघात लढणार याची उत्सुकता लागली आहे. महादेव जानकर यांच्या बारामती दौऱ्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत दंड थोपटणार का अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे.

दक्षिण भारतात काल दिनांक २६ ऑगस्ट २३ पासून महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून कर्नाटक राज्य शाखेतर्फे गुलबर्गा लोकसभा मतदार क्षेत्रातून जनस्वराज यात्रेस प्रारंभ झाला आहे. कलबुर्गी, विजापूर, बागलकोट, धारवाड, बेळगाव लोकसभा मतदार क्षेत्रातून कर्नाटक राष्ट्रीय समाज पक्ष राज्य शाखेतर्फे ही जन स्वराज यात्रा निघत आहे. २९ ऑगस्ट रोजी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात पुणे येथे पोहचणार आहे. कर्नाटकात ज्येष्ठ नेते शिवलिंगप्पा किन्नुर, नॉर्थ कर्नाटक प्रभारी सुनिल बंडगर, कर्नाटक प्रभारी सुनिल किन्नुर, धर्मांन्ना तोंटापूर, देवेंद्र चिरगळल्ली, रविचंद्र डोंबाळी, शरनप्पा पुजारी आदी नेतृत्व करत आहेत.

महाराष्ट्रात वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त रासपचे कार्यकर्ते पदाधिकारी उत्साहित झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेतृत्त्वात महादेव जानकर यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक लक्षवेधी केली होती. त्यामुळे या मतदारसंघात महादेव जानकर यांच्याकडे प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जाते. 2014 नंतर पहिल्यांदाच महादेव जानकर यांचा जनस्वराज यात्रेच्या निमित्ताने झंजावात पाहायला मिळणार आहे. बारामतीतूनही जनस्वराज यात्रा पुणे लोकसभा मतदारसंघात गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे समारोप होणार आहे.



No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...