मी जानकर साहेबांना विसरू शकत नाही; येथून पुढच्या निवडणुका रासपच्या चिन्हावरच लढणार : आ. रत्नाकर गुट्टे, गटनेता रासप
जन संपर्क कार्यालयात बोलताना रासप आमदार रत्नाकर गुट्टे. बाजूस डावीकडून एस एल अक्कीसागर, सुनिल गुट्टे उजवीकडे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, काशिनाथ शेवते, राजेभाऊ फड. |
गंगाखेड : यशवंत नायक ब्यूरो
आजपर्यंतच्या निवडणुका रासपच्या चिन्हावर लढवल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरच निवडणुका लढवू, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभेचे गटनेते आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले. जिल्हा परिषदेवर रासपचा झेंडा फडकवू. आम्ही कोणासोबत युती करायला जाणार नाही. आज काल खूप चर्चांना उधाण आले आहे. काहीजण बोट घालायला शोधत आहेत. रत्नाकर गुट्टे हा छोटा कार्यकर्ता आहे, पण कोणाला बोट घालायला संधी देत नाही. मी विसरू शकत नाही. कारण मी जेलमध्ये होतो निवडणूक आधीपासूनच सहा सात महिने जेलमध्ये होतो. मी मतदार संघापासून सात आठ महिने दूर होतो. मला कोणताही राजकीय वारसा नव्हता. माझे वडील साधे ग्रामपंचायत सदस्य नव्हते. मी कॉलेजला निवडणूक लढवली होती आणि जिंकलोही होतो. जानकर साहेब मंत्री होते. रात्रीच्या तीन-तीन वाजेपर्यंत माझ्यासाठी वाड्यावर वस्त्यांवर गेले. पूर्ण महाराष्ट्राचे रासप येथे आले होते. कितीही चर्चा केल्या तरी, मी विसरू जानकर साहेब यांना विसरू शकत नाही. भाजप प्रदेशांनी एक स्टेटमेंट दिले, आमचे उमेदवार म्हणून. जानकर साहेबांना मी एका तासाच्या आत फोन केला. जानकर साहेबांना मी विसरू शकत नाही. पंकजाताईंची मदत झाली. मी पॉलिटिक्समध्ये कमी पडतो. माझ्यामध्ये राजकारण अजिबात नाही. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. निवडणुकीत लोक म्हणू लागले, जेलमध्ये असलेला माणूस निवडून येतो का? माझ्या कार्यकर्त्यांनी मला निवडून आणले.
No comments:
Post a Comment