Wednesday, August 16, 2023

जाती धर्मावर जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत तर तरुणांना रोजगार दिला पाहिजे : महादेव जानकर

जाती धर्मावर जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत तर तरुणांना रोजगार दिला पाहिजे : महादेव जानकर

राहुरी : जन स्वराज यात्रेत बोलतांना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर. फुले पिठावर ज्ञानेश्र्वर सलगर, कुमार सुशील, काशिनाथ शेवते, डॉ. प्रल्हाद पाटील, रविंद्र कोठारी.

राहुरी : यशवंत नायक ब्यूरो 

सध्याच्या राजकारण्यांनी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू केले आहे. मात्र जाती धर्मावर जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत तर तरुणांना रोजगार दिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले आहे. आ. जानकर राहुरीत बोलत होते.

राष्ट्रीय समाज पक्षाची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार क्षेत्रात जन स्वराज यात्रा सुरू होती. राहुरी शहरांमध्ये यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आ. जानकर म्हणाले, आमदाराचं पोरगं आमदार, खासदाराचे पोरगं खासदार, मोठ्यांची पोरं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य करणार, हे कुठपर्यंत चालणार.? आता हे चालणार नाही, आता गरिबाचं पोरगं देखील आमदार- खासदार झालं पाहिजे, याकरता आपला राष्ट्रीय समाज पक्ष आहे. हा पक्ष एकट्याचा नसून, हा सर्वसामान्य तळागाळातील लोकांचा आहे, म्हणून घराणेशाहीला झुगारून रासपात सामील व्हावे.

सत्ताधाऱ्यांनी जे करायला पाहिजे होते ते केले नाही. काँग्रेस बीजेपी जे देऊ शकले नाहीत, ते यापुढे राष्ट्रीय समाज पक्ष देईल म्हणून आम्ही सर्व लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्धार केला असल्याचे आ. जानकर यांनी सांगितले. राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन आणि जर मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकले नाही तर आपण मंत्रालयावर मोर्चा घेऊन या..! आणि त्या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेल, असा इशारा यावेळी आ. जानकर यांनी दिला.

महात्मा फुले विचारपिठावर रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य कार्यकारणी सदस्य सय्यद शेख, डॉ. प्रल्हाद पाटील, राज्य सचिव रवींद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, पश्चिम महाराष्ट्र युवा नेते अजित पाटील, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जऱ्हाड, शहाजी कोरडकर, नंदकुमार खेमनर, मुनीर शेख, सुनील शिंदे, रंभाजी खेमनर, शशिकांत मतकर, संतोष काळे, काकासाहेब तमनर, कपिल लाटे, बापूसाहेब देवकाते, जबाजी बाच्क, विलास सौंदरे, अण्णासाहेब सरोदे, संदीप काकड, बिलाल शेख, रेखा नरवडे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थीतांचे शिवाजी खेडेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...