रानकवी ना. धो. महानोर, थोर विचारवंत प्रा. हरी नरके यांना रासेफ, यशवंत नायक परिवार कडून श्रद्धांजली ..!
रानकवी ना. धो. महानोर थोर विचारवंत प्रा. हरी नरके |
मुंबई : दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी रासेफ परिवार तर्फे रानकवी ना. धो. महानोर, थोर विचारवंत प्रा. हरी नरके सर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. प्रा. हरी नरके सर यांना श्रद्धांजली वाहताना रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर म्हणाले, प्रा. हरी नरके सर ही फार मोठी व्यक्ती होती. संशोधक, व व्यासंगी लेखक होते. य. दी. फडके यांच्या बरोबर त्यांनी महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय लिहले. राष्ट्रीय बहुजन समाजात पन्नास वर्षांपूर्वी लेखक नव्हते. कमी वयात नरके यांच्यामुळे महात्मा फुलेंचे सर्व साहित्य लिहिले गेले. हरी नरके यांच्या जाण्यामुळे मोठी हानी झालेली आहे. ना. धो. महानोर मोठे साहित्यक होते. केशवसुतांच्या तोडीचे होते. प्रा. नरके सर यांनी जानकर साहेब व रासपला मार्गदर्शन केलेले आहे. अनेकवेळा ते आपल्या मंचावर आलेले आहेत.
ना. धो. महानोर यांनी काव्यातून, शब्दातून लेखनातून मराठी भाषेला समृद्ध केले. त्यांनी मराठी साहित्यात स्वत:चे स्थान निर्माण केले, अशा शब्दांत बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी श्रध्दांजली वाहिली. दरम्यान प्रबोधनकार गोविंदराव शुरनर यांनी अहिल्यामाई होळकर यांच्या स्मृतीदिन निमित्त विचार मांडले. यावेळी रासेफचे महाराष्ट्र राज्य महासचिव जयसिंग राजगे सर, प्रबोधनकार गोविंदराव शुरनर, बाबुराव पांढरे, रासेफचे खजिनदार राजेंद्र कोकरे, यशवंत नायक परिवार तर्फे आबासो पुकळे, किसन मदने, दशरथ बंडू घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment