Tuesday, August 29, 2023

भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांचे भविष्य : राष्ट्रीय समाज पक्ष

भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांचे भविष्य : राष्ट्रीय समाज पक्ष

आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुसंख्यांक हिंदू समाजाला ज्ञानाची, शिक्षणाची कवाडे खुली करून दिली, त्या पुणे शहरात उद्या दिनांक २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या अनुषंगाने आमचे मित्र 'धनगर माझा'चे संपादक श्री. धनंजय तानले यांचा फोन आला, रासपच्या वर्धापन दिनानिमित्त लेख लिहिलाय का? मला लेख लिहायचा आहे, पण माझ्या व्यस्त कामातून मी लिहलेला नाही, पण तुमच्यासाठी मी जरूर लेख लिहीन असा त्यांना शब्द दिला. मी विटा - मायणी प्रवासात होतो, माझ्या दुचाकीचा बिघाड झाल्याने मायणी ता- खटाव येथे दुरुस्तीला घेऊन गेलो. तेथे असणारे निलेश मिस्त्री यांना बोललो, तुम्ही गाडी दुरुस्त करा, मला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त धनगर माझाच्या वाचकांसाठी लेख लिहायचा आहे. त्यावर मिस्त्री बोलत होते, आता जानकर साहेबांनी फिरायची आवश्यकता नाही. त्यांनी अनेक निवडणुका लढल्या, त्यांनी समाजाला जागृत केले. त्यांच्या पक्षातून चांगले उमेदवार लढले. जानकर साहेब हे स्वाभिमानी नेतृत्व आहे. त्यांनी व्यासपीठ उभे करून दिले आहे. आता युवकांनी पुढे येऊन जानकर साहेबांना साथ दिली पाहिजे. रासपचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जुन्या पुढाऱ्यांच्या नादाला लागू नये. मटण, पैसे अशा प्रलोभनाला बळी न पडता आपल्या सन्मानासाठी स्वतःच अस्तित्व दाखवण्याची संधी केवळ जानकर साहेबामुळे आली आहे. या संधीच सोन करायचं हे युवकांच्या हातात आहे. जानकर साहेब बोलतात त्याप्रमाणे करतात. येत्या निवडणुकीत जानकर साहेबांच्या पक्षाचे आमदार निवडून दिले तर खरोखरच ते म्हणतात तसे मुख्यमंत्री कुणाला करायचे जानकर साहेब ठरवतील.

भारतात धनगर समाजातून अनेक लोकांनी राजकीय पक्ष जन्माला घातले, काही दिवस चालवले, पुढे थांबले, स्वतःच संपले. अलीकडेच कर्नाटक राज्यात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतलेले सिद्धरामय्या जनता दलात कार्यरत असताना, त्यांचे पक्षप्रमुखांशी बिनसले. पुढे त्यांनी जनता दलातून बाहेर पडून, स्वतःचा पक्ष काढण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वडील एस. आर. बोम्मई यांचा प्रगतीपर जनता दल सिद्धरामय्या यांनी स्वतःकडे घेऊन एक स्थानिक नगरपालिका निवडणुक लढली. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, आपण पक्ष चालवू शकत नाही. तो पक्ष जेमतेम फक्त आठ महिने चालला. सिद्धरामय्यानी तो पक्ष गुंडाळून ठेवला. पुढे ते बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी पार्टी अशा वेगवेगळ्या पक्षांच्या शोधात गेले. असे करत शेवटी ते काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले. प्रवेश केल्यानंतर त्यांना दोन वर्षे पक्षात स्थान दिले नाही. हळूहळू सिद्धरामय्या यांनी काँग्रेस पक्षात बस्तान बसवत कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची दोन वेळा शपथ घेतली. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर धनगर समाज बांधवांच्या प्रेमाखातर ते महाराष्ट्रातही आले होते. तत्पूर्वी ते सांगलीमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराला आले होते. सिद्धरामय्यांना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी धनगर समाज खुणावतोय पण राष्ट्रीय नेतृत्व करण्यासाठी जे कौशल्य लागतं ते त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते मर्यादित ठरत आहेत. इकडे महाराष्ट्रात रासपची स्थापना झाल्यानंतर भाजपचे सर्वात मोठे नेते, विरोधी पक्षनेता, सर्वाधिक खात्याचे मंत्री असणारे अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमधून बाहेर पडून लोकराज्य पार्टी काढली. लोकराज्य पक्ष फक्त दोन वर्षे चालला. अण्णासाहेब डांगे यांच्याकडे सूतगिरणी, शिक्षण संस्था आहे, तरीही त्यांनी पक्ष बंद करून राष्ट्रवादीत प्रवेश केला. आपल्या रोखठोक विधानासाठी प्रसिद्ध असणारे अनिल अण्णा गोटे यांनी लोकसंग्राम पक्ष काढला. त्यांनी धुळे शहरातून आमदारकी जिंकली. पुढे त्यांचा प्रवास भाजपमध्ये झाला. आता ते राष्ट्रवादी पक्षात कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक पार्ट्या जन्माला आल्या, पण त्यातली एकही पार्टी टीकलेली नाही. वर्ष दोन वर्षासाठी पक्ष काढतात, दबावगट तयार करतात, त्यांचा सत्तेत भागीदारी मिळवणे हा हेतू नसतो, केवळ झोळी बनवून आपल्या झोळीत काय तरी मिळावे यासाठी ते काम करतात. बाकीच्या राज्यात तर न लिहलेच बरं.

असे सर्व असताना भारताच्या विशाल भूमीत दिनांक ३१ मे २००३ रोजी महाराणी अहिल्यामाता होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची घोषणा केली. तत्पूर्वी महादेव जानकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 'आपला प्रतिनिधी, आयपीएस, आयएस अधिकारी शोधयात्रा' काढली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे २९ ऑगस्ट २००३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची अधिकृत नोंदणी झाली. सहा महिन्यातच कोणतीही साधन, माहिती, अनुभव नसताना महाराष्ट्रात १२ आणि कर्नाटकातून १ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष निवडणुकीला सामोरा गेला. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व दाखवले. पुढे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवून अनेक मतदारसंघात दखलपात्र मते मिळवली. रासपने पुढे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, सार्वत्रिक विधानसभा निवडणुका स्वतःच्या ताकतीवर लढल्या, सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली. २००९ च्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत रिडालोस प्रयोग केला. मराठवाडा विभागात अहमदपूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाने प्रथमच खाते उघडले. राष्ट्रीय समाज पक्षाचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती झाली. रासपने पश्चिम महाराष्ट्रात दौंड विधानसभा मतदारसंघात विजय मिळवत आपले अस्तित्व राखले. दरम्यान ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी निवडणुका लढवून अनेक ठिकाणी यश मिळवले. गुजरात राज्यात प्रधानमंत्री निवडून गेलेल्या बडोदा लोकसभा मतदार क्षेत्रात येणाऱ्या बडोदा महानगरपालिकेत भाजप काँग्रेसला समोरासमोर थेट लढत देऊन रासपने आपले आठ नगरसेवक जिंकून आणले. पुढे जानकर साहेब लोकांच्या इच्छेखातर आमदार झाले. मंत्री झाले. राज्यमंत्रीपद, जिल्हा नियोजन समिती, शासकीय कमिटी यावर रासपच्या शिलेदारांची वर्णी लावली. पुढे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने विधानसभा निवडणुकीत जास्तीच्या जागा देण्याचे आमिष दाखवून राष्ट्रीय समाज पक्षाला शांत केले. महाराष्ट्राच्या भूमीतून दिल्ली लक्ष्य करून निघालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला महाराष्ट्रातच संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्कालीन रासपाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांनी महादेव जानकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बाहेर लोकसभा निवडणुकीत दक्षिण व उत्तर भारतातील सहा राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठ्या ताकतीने उमेदवार उभे केले. महादेव जानकर साहेब यांनी देशभरात उमेदवारांचा प्रचार केला. लक्षणीय मते मिळवली, राष्ट्रीय समाज पक्षाचे देशात अस्तित्व सिद्ध केले. पुढे विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन जागा देऊ केल्या, त्याही विश्वासघात करून पळवल्या. एकमेव गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रासपचा उमेदवार कारागृहात जानकर साहेबांचा फोटो, चिन्ह घेऊन रणमैदानात लढला. विजय मिळवला. भाजपने रासपला कायमचे मारून टाकण्यासाठी प्रयत्न केला, पण महादेव जानकर यांच्या नेतृत्वात गंगाखेडच्या विजयाने राष्ट्रीय समाज पक्षाला नवसंजीवनी मिळाली. 

राष्ट्रीय समाज पक्षावर अनेक संकट आली, रासपने अनेक चढ उतार पाहिले. राष्ट्रीय समाज पक्षाची 2003 सालापासून कठीण परिस्थितीतून सुरुवात झाली. अनेक खचखळगे आडवे आले, त्यातूनही सावरत स्वयंभूपणे राष्ट्रीय समाज पक्ष चालत राहिला. स्वाभिमानाची, दिल्लीची भाषा बोलत राहिला. विश्वासू सर्वसामान्य जनतेच्या साथीवर, स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बळावर, आपली स्वतंत्र मानवतावादी विचारधारा घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष ताट मानाने लोकशाही भारतात २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारतात धनगर समाजात अनेकांनी पक्ष काढले. लोकशाही राजकरणात टिकले नाहीत. एकमात्र महादेव जानकर असे नेते आहेत, पुरेस साधन नसताना केवळ मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय समाज पक्षाला वेगळ्या उंचीवर पोहचवले आहे. महादेव जानकर आणि एकूणच राष्ट्रीय समाज पक्ष रानामाळातून संसदभवनाच्या दिशेने प्रवास सुरू आहे. भारताच्या राजकारणाला वेगळी दिशा रासपच्या माध्यमातुन देऊ पहात आहेत. जगजेत्या सिकंदराला हरवणाऱ्या धनगरपुत्र चंद्रगुप्त मौर्याचा वारसा सिद्ध करायच्या प्रयत्न करत आहेत. सम्राट अशोकाने निर्माण केलेला सुवर्णमय भारत घडवू इच्छितात. टिव्ही वरचा नेता न बनता, थेट जनतेच्या हृदयात जागा निर्माण करणारे महादेव जानकर जन स्वराज यात्रेच्या माध्यमातुन थेट जनतेत जात आहेत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. दडपलेल्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत. दिल्ली काबीज करण्याची भाषा बोलत आहेत. संधी एकदाच येते त्याप्रमाणे लोकसभेत आपला उपेक्षितांचा आवाज बुलंद करण्यासाठी तमाम लोकांनी राष्ट्रीय समाज पक्षास ताकद देऊन स्वतःचे लोकशाहीतील मूल्य वाढवावे. लोकशाही देशात सत्ता मिळवण्यासाठी मते मिळवावी लागतात. निवडणुकीत मते मोजतात, पैसा मोजत नाहीत. दाखलपात्र समाजाला दखलपात्र समाज बनण्यासाठी रासपला मतांचे पाठबळ देऊन सत्तेत बसवण्याची योग्य वेळ आलेली आहे. अमेरिकेत मतदारद्वारे बदल होतो. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष होतात. मग भारतात देखील मतदारांनी मनावर घेतले तर सत्तेचे चित्र बदलू शकतात. भारतीयांनी देखील केवळ 'मत'दान न करता मताधिकारद्वारे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षास सत्तेत जाण्याचा मार्ग बनवावा. येणारी प्रत्येक निवडणुक खूप महत्वाची आहे. तुमचे आमचे भविष्य ठरवणारी आहे. राष्ट्रीय समाज पक्ष अधिक जोमाने वाढावा, लोकसभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे संसद सदस्य, विधानसभेत विधीमंडळ सदस्य निवडून जावेत यासाठी शुभेच्छा. जय भारत..!

- आबासो पुकळे, माजी उपसंपादक दैनिक केसरी.

(२८/८/२०२३)

Sunday, August 27, 2023

उद्या पासून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा

उद्या पासून बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो 

एकेकाळी महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने एकला चलो चा नारा देऊन क्षेत्र पंढरपुरातून माढा लोकसभा मतदारसंघात जन स्वराज यात्रेची सुरुवात केली. अहमदनगर, मुंबईतील सहा लोकसभा मतदार क्षेत्र व परभणी, सांगली या लोकसभा मतदार क्षेत्रातून जन स्वराज यात्रा फिरली. जन स्वराज यात्रेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. उद्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांच्या नेतृत्वात जन स्वराज यात्रा निघत आहे. महादेव जानकर यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा होत असल्याने राजकीय समीकरणे बिघडणार आहेत. लाखोंच्या फरकाने विजय होणाऱ्या सुप्रिया सुळेंना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी एकाकी लढत देऊन चांगलेच जेरीस आणले होते. बारामती लोकसभा क्षेत्रावर दबदबा असणाऱ्या शरद पवार यांच्या कन्येविरुद्ध थेट लढत देऊन महादेव जानकर यांनी रणमैदान गाजवत राजकिय समीकरणे बिघडवली होती. माढा, परभणी, मिर्झापूर, बारामती असे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाची नावे घेत महादेव जानकर यांनी थेट कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे पुन्हा विचार केला जात आहे. मात्र ते कोणत्या मतदारसंघात लढणार याची उत्सुकता लागली आहे. महादेव जानकर यांच्या बारामती दौऱ्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत दंड थोपटणार का अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात चालू आहे.

दक्षिण भारतात काल दिनांक २६ ऑगस्ट २३ पासून महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून कर्नाटक राज्य शाखेतर्फे गुलबर्गा लोकसभा मतदार क्षेत्रातून जनस्वराज यात्रेस प्रारंभ झाला आहे. कलबुर्गी, विजापूर, बागलकोट, धारवाड, बेळगाव लोकसभा मतदार क्षेत्रातून कर्नाटक राष्ट्रीय समाज पक्ष राज्य शाखेतर्फे ही जन स्वराज यात्रा निघत आहे. २९ ऑगस्ट रोजी कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात पुणे येथे पोहचणार आहे. कर्नाटकात ज्येष्ठ नेते शिवलिंगप्पा किन्नुर, नॉर्थ कर्नाटक प्रभारी सुनिल बंडगर, कर्नाटक प्रभारी सुनिल किन्नुर, धर्मांन्ना तोंटापूर, देवेंद्र चिरगळल्ली, रविचंद्र डोंबाळी, शरनप्पा पुजारी आदी नेतृत्व करत आहेत.

महाराष्ट्रात वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त रासपचे कार्यकर्ते पदाधिकारी उत्साहित झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेतृत्त्वात महादेव जानकर यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक लक्षवेधी केली होती. त्यामुळे या मतदारसंघात महादेव जानकर यांच्याकडे प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जाते. 2014 नंतर पहिल्यांदाच महादेव जानकर यांचा जनस्वराज यात्रेच्या निमित्ताने झंजावात पाहायला मिळणार आहे. बारामतीतूनही जनस्वराज यात्रा पुणे लोकसभा मतदारसंघात गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे समारोप होणार आहे.



Wednesday, August 23, 2023

यशवंत नायक – ऑगस्ट 2023

यशवंत नायक – ऑगस्ट 2023






*वाचक मित्रानो, 🙏*

*या अंकात काय वाचाल...*

पान १

_*इस देश पर राज करने का जन्मसिद्ध अधिकार मेरा है, इन गोरे अंग्रेजो का नाही, इन गोरे अंग्रेजों को राजसत्ता से हटाना, मेरा जीवन का मुख्य उद्देश है- राष्ट्रवीर संगोळी रायण्णा*_

पान -२

_*गोरे अंग्रेज चले गये, अब इस देश पर काले अंग्रेज राज कर रहे, ऐसा किसी ज्ञानीने कहा है, इन काले अंग्रेजोंको राजसत्ता से हटाना मेरा जीवन का मुख्य उद्देश है - राष्ट्रनायक महादेव जानकर*_

पान -३

_*संगोळी रायण्णा इस देश - राष्ट्र का आद्य स्वातंत्र्य- स्वराज नायक है. इसलीये आद्य क्रांतिवीर स्वातंत्र्यवीर संगोळी रायण्णा समाधीस्थळ नंदगड राष्ट्रीय स्मारक होना ही चाहिये...*_

*मुख्य बातम्या – पान 1* 

@ गंगाखेड (यशवंत नायक ब्यूरो) : *राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे केले थाटामाटात स्वागत*

> *आमदार रत्नाकर गुट्टे मला सोडून जाणार नाहीत, ते राष्ट्रीय समाज पक्षातूनच मंत्री होतील : महादेव जानकर* 

> *मी जानकर साहेबांना विसरू शकत नाही येथून पुढच्या निवडणुका रासपच्या चिन्हावरच लढवणार : रत्नाकर गुट्टे*

> *सुनील गुट्टे रासपच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर*

@ मुंबई (ए. पी. यशवंत) : *देशाची सत्ता मिळवायची असल्याने संघर्ष तर करावाच लागेल : आमदार महादेव जानकर*

> *मुंबई महानगरपालिका प्रचारासाठी प्रत्येक ठिकाणी पोहचणार*

> *लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात रासपची संभाव्य उमेदवारांची यादी तयार*

पान : २ 

@ तिरुपती- आंध्र प्रदेश (यशवंत नायक ब्युरो) : *आंध्र प्रदेशातील 25 जागा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार: महादेव जानकर*

> *तिरुपती येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक*

@ पुणे (यशवंत नायक ब्यूरो) : *पुण्यात खड्ड्यातील पाण्यात होड्या सोडल्या; रासपचे आंदोलन*

@ कर्जत (यशवंत नायक ब्यूरो) : *घराणेशाहीतील प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देण्यासाठी जनतेला पुढे यावे लागेल : महादेव जानकर*

> *मतदारांनी आपले मतदान विकले नाही पाहिजे : महादेव जानकर*

@ बदायु - उत्तर प्रदेश (यशवंत नायक ब्यूरो मुंबई द्वारा) : *सहसवान विधानसभा मतदार संघात रासपचे कार्यकर्ता संमेलन*

> *शेकडो मुस्लिम बांधवांनी केला राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश*

पान : ३ 

@ कुडाळ सिंधुदूर्ग (यशवंत नायक ब्यूरो) : *महाराष्ट्रात सत्ताधारी तर विरोधक कोण हे समजत नाही ..? महादेव जानकर यांची कोकणातून टोलेबाजी*

> *भिडेवर शासनाने कारवाई करावी : महादेव जानकर*

@ राळेगणसिद्धी (यशवंत नायक ब्यूरो) : *महादेव जानकर यांचे कार्य कौतुकास्पद : अण्णा हजारे*

@ तिरुपती (यशवंत नायक ब्यूरो : *राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे अधिवेशन पार पडले*

> *अधिवेशनात जनगणनेसह ४२ ठराव मांडले*

@ मुंबई (यशवंत नायक ब्यूरो) : *रासप नेते महादेव जानकर यांनी घेतले प्रा. हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन*

>  *प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे उपेक्षितांच्या चळवळीचा मार्गदर्शक हरपला*

@ बुलढाणा (यशवंत नायक ब्यूरो) : *रासपच्या प्रयत्नास यश; सिंदखेड राजा ते जळगाव बससेवा सुरू*

@ मुंबई (यशवंत नायक ब्यूरो) : *जन स्वराज यात्रा रोखल्याच्या निषेधार्थ घाटकोपर येथे रासपची निदर्शने*

@ अमरावती (यशवंत नायक ब्यूरो) : *रासपचा विचार महात्मा फुलेवादाचा : काशिनाथ शेवते, प्रदेशअध्यक्ष रासप.*

@ उस्मानाबाद (यशवंत नायक ब्यूरो) : *चार गावांची पाणी पुरवठा योजना सुरू करा अन्यथा तेर धरणात जलसमाधी आंदोलन ; राष्ट्रीय समाज पक्षाने दिला इशारा*

पान : ४

@ राहुरी (यशवंत नायक ब्यूरो) : *जाती धर्मावर जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत, तर तरुणांना रोजगार दिला पाहिजे :  महादेव जानकर*

@ धारवाड कर्नाटक (यशवंत नायक ब्यूरो) : *जनता विरोधी सरकारने  जन स्वराज यात्रा रोखली : एस एल अक्कीसागर यांचे टीकास्त्र*


@ हैदराबाद - तेलंगणा (यशवंत नायक ब्यूरो) : *तेलंगणा लोकसभेच्या 17 व विधानसभेच्या ११९ जागा स्वबळावर लढवणार : शुरनर*


> *हैदराबाद येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली*


@ घनसावंगी, जालना (यशवंत नायक ब्यूरो) : *शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक, माता भगिनी पर्यंत रासपची भुमिका पोहचवा : महादेव जानकर*


जय राष्ट्रीय समाज बोलो..!     २९ ऑगस्ट पुणे चलो..!

राष्ट्रीय समाज पक्षाचा २० व्या वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया

_*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल

*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*

*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*

_सिद्ध - सागर

कार्यकारी संपादक

Saturday, August 19, 2023

जन स्वराज यात्रा रोखल्याच्या निषेधार्थ घाटकोपर येथे रासपची निदर्शने

जन स्वराज यात्रा रोखल्याच्या निषेधार्थ घाटकोपर येथे रासपची निदर्शने



मुंबई : (३०/८/२३)यशवंत नायक ब्यूरो काल चर्चगेट येथून वाजत गाजत शकेडो गाड्यांच्या ताफ्यासह निघालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेस सांताक्रूझ व अंधेरी परिसरात राज्य सरकारने पोलीस बळाचा वापर करत रोखल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. आज सकाळी घाटकोपर येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने केली.  काहीकाळ निषेधाच्या आणि जानकर साहेब यांच्या जयजयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. घाटकोपर येथील कामराज नगर परिसरात शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली.

महादेव जानकर यांचे कार्य कौतकास्पद: समाजसेवक अण्णा हजारे

महादेव जानकर यांचे कार्य कौतकास्पद : समाजसेवक अण्णा हजारे

राळेगणसिद्धी: यशवंत नायक ब्यूरो 

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे कौटुंबिक सुखाचा त्याग करून 'राष्ट्र हेच माझे कुटुंब आहे, असे समजून राज्यात व देशात वंचित घटकाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी करीत असलेले राजकीय कार्य कौतुकस्पद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा पुणे- अहमदनगर महामार्गावर शिरूर जवळील बेलवंडी फाटा येथे आल्यावर शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी यात्रेचे ढोल वाजवून महादेव जानकर यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर आ. महादेव जानकर यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

घराणेशाहितील प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देण्यासाठी जनतेला पुढे यावे लागेल

घराणेशाहितील प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देण्यासाठी जनतेला पुढे यावे लागेल : रासप सुप्रीमो महादेव जानकर 

मतदारांनी आपले मतदान विकले नाही पाहिजे : महादेव जानकर

कर्जत : (२३/७/२३)यशवंत नायक ब्यूरो 

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाशी सत्ताधाऱ्यांना काहीच देणे घेणे नाही, आपली सत्ता आणि आपली खुर्ची कशी टीकेल यावर सध्या राजकारणात जास्त भर दिसत आहे. खासदार आमदार विकणार नाही अशी अपेक्षा मतदार करीत असेल तर मतदारांनी देखील आपले मतदान विकले नाही पाहिजे अशी धरणा अगोदर निर्माण करण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे. प्रस्थापितांना, सत्ताधाऱ्यांना धक्का द्यायचा असेल तर मतदारांनी सुज्ञ राहून मतदान करावे. मत अधिकारद्वारे सत्तेत परिवर्तन घडवून लोकशाही जागृत ठेवावी, असे आवाहन रासपचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. कर्जत येथे जन स्वराज यात्रेत उपस्थितांसमोर आ. महादेव जानकर बोलत होते. 

पुढे बोलताना आ.जानकर म्हणाले, रासप पक्षाची स्थापना कर्जत जामखेड मतदारसंघात झाली. आज या भूमीत सभा होत आहे याचे समाधान आहे. पण येथील जनता आपल्याला सहकार्य करीत नाही ही शोकांतिका देखील आहे. जन स्वराज यात्रा सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधण्यासाठी काढली आहे. अनेक राजकीय पक्षांनी सत्तेत येण्यासाठी गरीबी हटावचा नारा दिला पण आज सत्तेत आल्यावर तोच गरीब हटला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु या सत्ताधाऱ्यांना आपण निवडणुकीत काय बोलतो याचे भान राहिले नाही. जनतेसाठी हा महादेव जानकार काम करत आहे. सर्वसामान्य माणसांना बळ देण्याचे काम रासप करत आहे.

घराणेशाही आणि प्रस्थापित राजकारण्यांना धक्का द्यायचा आहे, पण यासाठी जनतेला पुढे यावे लागेल. कर्जतचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एकदा रासपवर विश्वास ठेवा. काम केले नाही तर समोर बसलेल्या जनतेस जाब विचारण्याचा हक्क आहे. दिल्ली काबीज करण्याचा ध्यास आहे. कारण भारताला बलशाली राष्ट्र बनवायचे आहे यासाठी महादेव जानकर जीवाची बाजी लावेल.

यावेळी फुलेपिठावर राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.प्रल्हाद पाटील, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष शरद दडस, रमेश व्हरकाटे, सोनू भिसे, विकास मासाळ, भानुदास हाके, सय्यद बाबा शेख, डॉ. शिवाजीराव शेंडगे, आत्माराम कुंडकर, मंदाकिनी बडेकर उपस्थित होते.

आंध्रप्रदेशातील २५ जागा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार : रासप नेते महादेव जानकर

आंध्रप्रदेशातील २५ जागा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार : रासप नेते महादेव जानकर



तिरुपती येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकरणीची बैठक


तिरूपती - आंध्रप्रदेश | यशवंत नायक ब्यूरो 

आगामी होऊ घातलेल्या सार्वत्रिक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत, आंध्रप्रदेशातील २५ जागांवर राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार मैदानात उतरवून स्वबळावर लढवणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव यांनी केले. ७ ऑगस्ट २०२३ रोजी तिरूपती येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रिय कार्यकारणी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकित  तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक रासपचे प्रतिनिधि उपस्थित होते.

रासपचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर साहब यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली. रासप नेते महादेव जानकर मार्गदर्शन करताना म्हणाले, देशभरात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. आंध्र प्रदेशातील येणारी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार मैदानात उतरवू. पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी यांनी वन बूथ टेन युथ तयार करून संघटन मजबूत करावे. गावोगावी पक्षाच्या शाखा उघडाव्यात.

या बैठकीत रासपचे संस्थापक सदस्य  सिद्दप्पा अक्कीसागर, राष्ट्रिय महासचिव कुमार सुशील, तेलंगाना प्रभारी  गोविंदराम शूरनर, राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे, कर्नाटक प्रभारी सुनिल बंडगर, तामिळनाडूचे के एस गौतम, लायन डी. राजा, आंध्रप्रदेशचे नारायण कुरूबा, के एस. नजुंनदास, मनमोहन जी, पी. एन. वेंकट रमना, के रेड्डी शेखर, ए. डी अजंने, कर्नाटक प्रभारी सुनिल बंडगर उपस्थित होते.

कर्नाटकातून राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापदिन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने जाणार : शिवलिंगप्पा किन्नूर

कर्नाटकातून राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापदिन कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने जाणार : शिवलिंगप्पा किन्नूर 

कलबूर्गी: पत्रकार परिषदेत शिवलिंगप्पा किन्नूर, जिल्हाध्यक्ष देवेंद्र चीलग्गर, बाजूस कल्याण कर्नाटक रासप पदाधिकारी.

कलबुर्गी पासून विजयपुरा, बागलकोट, हुबळी - धारवाड - बेळगाव पर्यंतच्या सर्व तालुका ठिकाणी सभांचे आयोजन

कलबुर्गी : यशवंत नायक ब्युरो 

येत्या २९ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन महाराष्ट्र राज्यात पुणे येथे साजरा केला जाणार आहे, अशी माहिती रासपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. काल शुक्रवारी शहरातील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत श्री. किन्नूर बोलत होते. 

दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेला व बसवण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कलबुर्गी येथील सुमारे १ हजारांच्या संख्येने जन स्वराज यात्रा निघणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन स्वराज यात्रेत राज्यभरातून पाच हजारांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत.

जनतेच जन स्वराज उभारण्यासाठी रासप पक्षाने कलबुर्गी ते विजयपुरा, बागलकोट, हुबळी - धारवाड आणि नंदगड (बेळगाव) पर्यंतच्या सर्व तालुका प्रमुख ठिकठिकाणी सभा घेणार आहोत. जन स्वराज यात्रेत कमीत कमी २ लाखांहून अधिक लोक सहभागी होणार असल्याचे सांगितले. कर्नाटकातील जनतेनं २९ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या महाअधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवलिंगप्पा कीन्नुर यांनी केले.

ते पुढे म्हणाले, राज्यातील मागासवर्गीयांच्या ओबीसी, एमबीसी परीक्षेचे अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात यावी. ओबीसी आणि एमबीसी गरीबांना निवारा द्यावा. बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात यावे आणि कर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. देशातील औद्योगिक कामगारांना समान सुविधा दिल्या पाहिजेत. शेतकरी व महिलांना जास्तीत जास्त बजेट देऊन मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कल्याण कर्नाटक आरक्षणाचा ३७१(जे) अर्ज ओबीसी आणि एमबीसींच्या व्यवस्थेत अन्यायकारक आहे. हे देखील त्वरित दुरुस्त करावे. KKRDB अंतर्गत सर्व गावांना पुरेसे अनुदान देण्यात यावे. या भागातील महिलांसाठी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शौचालय इमारती बांधण्यासाठी पुरेसे अनुदान जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.





Wednesday, August 16, 2023

आमच्याकडे मतांचे बळ असून, सत्तेत स्थान का नाही? : प्रबोधनकार गोविंदराव शुरनर

 रासेफतर्फे महाराणी अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन..!

आमच्याकडे मतांचे बळ असून, सत्तेत स्थान का नाही ? : प्रबोधनकार गोविंदराव शुरनर

मुंबई : आमच्याकडे मतांचे बळ असून, सत्तेत स्थान का नाही? असा सवाल प्रबोधनकार गोविंदराव शुरनर यांनी केला आहे. राष्ट्रीय समाज एम्पलॉयज फेडरेशन (रासेफ) आयोजीत अहिल्यामाई होळकर २२८ वा स्मृतीदीन अभिवादन कार्यक्रमात प्रबोधनकार गोविंदराव शूरनर बोलत होते. 

श्री. शूरनर पूढे म्हणाले, 1989 पर्यंत आम्हाला अहिल्यामाई होळकर यांच्याबद्दल काहीही माहीत नव्हते. बीएससी फर्स्ट वर्षाला असताना शिक्षणावर पाणी फिरलेले. पार्ट टाइम जॉब, पूर्णवेळ समाजकार्य चालू होते. मंडल चळवळ चालू झाली. महामानव कांशीराममुळे इतिहास कसा वाचायचा, कसा लिहायचा हे शिकलो. अहिल्यामाईंची महाराष्ट्रात पुण्यतिथी होत होती. 1994 ला जानकर साहेब भेटले. शाहू जयंतीला होळ गावातून चोंडीपर्यंत रॅली काढून १३ ऑगस्टला समारोप केला. अक्कीसागर साहेब यांनी रॅलीचा संपूर्ण महाराष्ट्रात मार्ग ठरवला. जानकर साहेब उत्तर प्रदेशात आजारी होते. पुढे जानकर साहेब पुसदला रॅलीत सामील झाले. 

आमचे महापुरुष उपेक्षित आहेत, कारण त्याकाळात लेखन करणारे आपले नव्हते. इंदौर, महेश्वर येथ जाऊन अहिल्यामाईचे जीवनावरील हिंदीतले पुस्तकं मिळवले. अहिल्यामाईवर लिहलेले पुस्तकं बामसेफचे लोक घेत नव्हते. पुढे बहुजन संघटकमध्ये पुस्तकावर एक लेख छापला. पुढे सर्वजण वाचू लागले. लोकमाता ही त्याकाळी पदवी होती. मातेने लोक कल्याणकारी राज्य केलेले आहे. महिलांसाठी उद्योग सुरू केले. ज्या समाजात वाचन संस्कृती नाही तो समाज प्रगती करू शकत नाही. माणसं मारून राज्य करण्यापेक्षा, मन जोडून राज्य केलेल चांगले सम्राट अशोकाने आम्हाल वारसा दिला. सरकारी पैसा सरकारच्या कामासाठी वापरयचा लोकमातेची शिकवन आहे. शिक्षकाचा शिक्षण अधिकारी झाल्यावर शिक्षणाधिकारी होतो. मग मल्हारराव होळकर सुभेदार असल्याचे सांगतात पण मल्हारराव होळकर राजे होते. दिल्लीच्या बादशहाला हादरवून सोडणारा राजा मल्हाराव होळकर आहेत. 

यावेळी रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर, महाराष्ट्र महासचिव जयसिंग राजगे सर, जेष्ठ नेते बाळकृष्ण लेंगरे मामा,  बाबुराव पांढरे, राजेंद्र कोकरे, दशरथ घुले, यशवंत नायकचे उपसंपादक आबासो पुकळे आदी उपस्थित होते.

रानकवी ना. धो. महानोर, थोर विचारवंत प्रा. हरी नरके यांना रासेफ, यशवंत नायक परिवार कडून श्रद्धांजली ..!

रानकवी ना. धो. महानोर, थोर विचारवंत प्रा. हरी नरके यांना रासेफ, यशवंत नायक परिवार कडून श्रद्धांजली ..!

रानकवी ना. धो. महानोर        थोर विचारवंत  प्रा. हरी नरके

मुंबई : दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी रासेफ परिवार तर्फे रानकवी ना. धो. महानोर, थोर विचारवंत प्रा. हरी नरके सर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. प्रा. हरी नरके सर यांना श्रद्धांजली वाहताना रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर म्हणाले, प्रा. हरी नरके सर ही फार मोठी व्यक्ती होती. संशोधक, व व्यासंगी लेखक होते. य. दी. फडके यांच्या बरोबर त्यांनी महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय लिहले. राष्ट्रीय बहुजन समाजात पन्नास वर्षांपूर्वी लेखक नव्हते. कमी वयात नरके यांच्यामुळे महात्मा फुलेंचे सर्व साहित्य लिहिले गेले. हरी नरके यांच्या जाण्यामुळे मोठी हानी झालेली आहे. ना. धो. महानोर मोठे साहित्यक होते. केशवसुतांच्या तोडीचे होते. प्रा. नरके सर यांनी जानकर साहेब व रासपला मार्गदर्शन केलेले आहे. अनेकवेळा ते आपल्या मंचावर आलेले आहेत.

ना. धो. महानोर यांनी काव्यातून, शब्दातून लेखनातून मराठी भाषेला समृद्ध केले. त्यांनी मराठी साहित्यात स्वत:चे स्थान निर्माण केले, अशा शब्दांत बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी श्रध्दांजली वाहिली. दरम्यान प्रबोधनकार गोविंदराव शुरनर यांनी अहिल्यामाई होळकर यांच्या स्मृतीदिन निमित्त विचार मांडले. यावेळी रासेफचे महाराष्ट्र राज्य महासचिव जयसिंग राजगे सर, प्रबोधनकार गोविंदराव शुरनर, बाबुराव पांढरे, रासेफचे खजिनदार राजेंद्र कोकरे, यशवंत नायक परिवार तर्फे आबासो पुकळे, किसन मदने, दशरथ बंडू घुले आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे अधिवेशन पार पडले

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे अधिवेशन पार पडले 

तिरुपती : (७/८/२३) राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथे पार पडले. या अधिवेशनास राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेवजी जानकर साहेबांनी उपस्थितांना संबोधित केले. अधिवेशनात ४२ ठराव संमत करण्यात आले. 

अधिवेशनास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीरजी, श्रीनिवास गौडजी, AIMIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, केसाना शंकरराव, सेवानिवृत्त जस्टिस व्ही. ईश्वरैय्याजी, अशोक जिवतोडे, सचिन राजुरकरजी, राष्ट्रिय एम्प्लॉइज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्दप्पा अक्कीसागर, माजी आमदार आशिष देशमुख, परमेश्वर राऊत, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव कुमार सुशील, रासपाचे राष्ट्रीय संघटक बाळासाहेब लेंगरे, राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, महाराष्ट्र ओबीसी महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती मानकरताई, रासपचे विदर्भ अध्यक्ष रमेश पिसे तसेच देशभरातील ओबीसी नेते व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जाती धर्मावर जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत तर तरुणांना रोजगार दिला पाहिजे : महादेव जानकर

जाती धर्मावर जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत तर तरुणांना रोजगार दिला पाहिजे : महादेव जानकर

राहुरी : जन स्वराज यात्रेत बोलतांना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर. फुले पिठावर ज्ञानेश्र्वर सलगर, कुमार सुशील, काशिनाथ शेवते, डॉ. प्रल्हाद पाटील, रविंद्र कोठारी.

राहुरी : यशवंत नायक ब्यूरो 

सध्याच्या राजकारण्यांनी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करून, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू केले आहे. मात्र जाती धर्मावर जनतेचे प्रश्न सुटणार नाहीत तर तरुणांना रोजगार दिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले आहे. आ. जानकर राहुरीत बोलत होते.

राष्ट्रीय समाज पक्षाची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार क्षेत्रात जन स्वराज यात्रा सुरू होती. राहुरी शहरांमध्ये यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आ. जानकर म्हणाले, आमदाराचं पोरगं आमदार, खासदाराचे पोरगं खासदार, मोठ्यांची पोरं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य करणार, हे कुठपर्यंत चालणार.? आता हे चालणार नाही, आता गरिबाचं पोरगं देखील आमदार- खासदार झालं पाहिजे, याकरता आपला राष्ट्रीय समाज पक्ष आहे. हा पक्ष एकट्याचा नसून, हा सर्वसामान्य तळागाळातील लोकांचा आहे, म्हणून घराणेशाहीला झुगारून रासपात सामील व्हावे.

सत्ताधाऱ्यांनी जे करायला पाहिजे होते ते केले नाही. काँग्रेस बीजेपी जे देऊ शकले नाहीत, ते यापुढे राष्ट्रीय समाज पक्ष देईल म्हणून आम्ही सर्व लोकसभेच्या जागा लढवण्याचा निर्धार केला असल्याचे आ. जानकर यांनी सांगितले. राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नासंदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेल आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन आणि जर मुख्यमंत्र्यांनी देखील ऐकले नाही तर आपण मंत्रालयावर मोर्चा घेऊन या..! आणि त्या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेल, असा इशारा यावेळी आ. जानकर यांनी दिला.

महात्मा फुले विचारपिठावर रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राज्य कार्यकारणी सदस्य सय्यद शेख, डॉ. प्रल्हाद पाटील, राज्य सचिव रवींद्र कोठारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, पश्चिम महाराष्ट्र युवा नेते अजित पाटील, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जऱ्हाड, शहाजी कोरडकर, नंदकुमार खेमनर, मुनीर शेख, सुनील शिंदे, रंभाजी खेमनर, शशिकांत मतकर, संतोष काळे, काकासाहेब तमनर, कपिल लाटे, बापूसाहेब देवकाते, जबाजी बाच्क, विलास सौंदरे, अण्णासाहेब सरोदे, संदीप काकड, बिलाल शेख, रेखा नरवडे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थीतांचे शिवाजी खेडेकर यांनी आभार मानले.

शेतकरी, शेतमजूर, युवक, कामगार, माताभगिनी पर्यंत रासपची भूमिका पोहचवा : महादेव जानकर

शेतकरी, शेतमजूर, युवक, कामगार, माताभगिनी पर्यंत रासपची भूमिका पोहचवा : महादेव जानकर

घनसावंगी : (६/८/२३) यशवंत नायक ब्यूरो 

शेतकरी, शेतमजूर, कामगार युवक, माता भगिनी यांच्यापर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका गेली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. घनसावंगी जिल्हा - जालना येथे जन स्वराज यात्रेत मार्गदर्शन करताना आ. जानकर बोलत होते.

आ. जानकर पुढे म्हणाले, प्रमूख पदाधिकाऱ्यांनी अठरापगड जाती जमातीच्या सर्वच समाजाच्या लोकांना राष्ट्रीय समाज पक्षात स्थान देण्यात यावे. जन स्वराज यात्रेचे सर्वजाती धर्माच्या लोकांनी परभणी लोकसभा मतदारसंघात स्वागत केले. आजचे जेवण मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांने दिले. शेतकरी, शेतमजूर, कामगार युवक, माता भगिनी यांच्यापर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका गेली पाहिजे. गावागावात तळागाळापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोहोचले पाहिजे. सारेच काम पैशावर होत नाही. पक्ष मोठा असतो. पक्षावर प्रेम करायला शिका, तरच उद्याचे दिवस चांगले येतील. जनतेची सामाजिक, आर्थिक प्रगती व्हावी. जनतेला हुशार बनवावे, यासाठी जनस्वराज यात्रा आहे.  राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जनस्वराज यात्रेचा प्रचार प्रसार करावा. रासप अध्यक्ष महादेव जानकर हैदराबाद येथे जाणार असल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न होईल,असे जाहीर करून आंध्रप्रदेश राज्याच्या दौऱ्यावर रवाना झाले.

या सभेत राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, अश्रुबा कोळेकर, ओमप्रकाश चीतळकर, प्रा. विष्णू गोरे, अशोक लांडे, गजानन वायसे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे कळंबोलीत महारानी अहिल्यामाई होळकर यांच्या २२८ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे कळंबोलीत महारानी अहिल्यामाई होळकर यांच्या २२८ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

अभिवादन करतांना राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते (छायाचित्र : ऋषिकेश जरग) 

महारानी अहिल्यामाई होळकर यांचा आदर्श राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून रासपची वाटचाल सुरू : शरदभाऊ दडस

कळंबोली : यशवंत नायक ब्युरो

महारानी अहिल्यामाई होळकर आदर्श राज्यकर्त्या होत्या. त्यांचा आदर्श राज्यकारभार डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रनायक महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन रासपचे विदयार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्ष कळंबोली शहर शाखा यांनी महाराणी अहिल्यामाई होळकर यांचा २२८ वा स्मृतिदिन कार्यक्रम कामगार नाका येथे आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात श्री. दडस बोलत होते.

श्री. दडस पुढे म्हणाले, महाराणी अहिल्यामाई होळकर यांच्या जन्मगावी  चोंडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली. जिस समाज का दल है! उस समाज का बल है!!  जानकर साहेबांनी रासपचे दल तयार केले म्हणून आपल्याकडे राजकीय बळ आहे. आपण भीक मागणारे नसून देणारे आहेत याचा विचार करायची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष संघर्ष करत आहे. महात्मा फुले यांचा विचार अहिल्यामातेचे आदर्श राज्य प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद लोकसभा व विधानसभेत वाढवावी लागेल. 

महारानी अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहत अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे सुदामशेठ जरग, महात्मा फुले वाचनालय अध्यक्ष गोरख वाघमारे, विठ्ठल शिनगारे, भिमराव मोहिते, पांडुरंग पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष आण्णासाहेब वावरे, शहर उपाध्यक्ष देवानंद मोटे, देविदास खेडकर, काशलिंग जानकर, शहर सचिव शहाजी शिंदे, माध्यम प्रतिनिधी ऋषिकेश जरग, शशीकांत मोरे, चैतन्य जरग, गोरक्षनाथ कोकरे, सागर माने, संतोष दोलताडे, समाधान मोटे, अमोल कोळेकर आदी शेकडो नागरिक उपस्थित होते.

अन्य मान्यवर व छायाचित्र :






Tuesday, August 15, 2023

कळंबोलीत रासपतर्फे संगोळी रायन्ना जयंती निमित्त अभिवादन..!

कळंबोलीत रासपतर्फे संगोळी रायन्ना जयंती निमित्त अभिवादन..!

संगोळी रायन्ना यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर. (छायाचित्र : ऋषिकेश जरग)

संगोळी रायन्ना भारतीय स्वातंत्र्य लढाईतील असली स्वातंत्र्यवीर : सुदर्शन अक्कीसागर

कळंबोली : भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे अनेक महानायक उपेक्षित राहिले आहेत. भारतीय इतिहासकारांनी त्यांची जाणीवपूर्वक उपेक्षा केली आहे. परकीय ब्रिटिशांनी संगोळी रायन्ना यांची फाईल तयार केली, पण आपले म्हणवणाऱ्या लोकांनी फाईल घाळ केली. नकली लोकांना जादा महत्व देऊन त्यांच्या नावे इतिहास खपवला जात आहे. संगोळी रायन्ना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असली स्वातंत्र्यवीर आहेत, असे उदगार राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव सुदर्शन अक्कीसागर यांनी काढले. राष्ट्रीय समाज पक्ष कळंबोली शहर शाखा कार्यालयात आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना यांची २२५ वी जयंती साजरी करण्यात आली. अभिवादनप्रसंगी श्री. अक्कीसागर बोलत होते.

ब्रिटिशांच्या जोखडातून भारत भूमीला मुक्त करण्यासाठी उमाजीराजे नाईक, यशवंतराव होळकर, महारानी झलकारीबाई, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, नागू महादू कातकरी, राणी भिमाई यासारखे अनेक स्वातंत्र्य योद्धे लढले. इतिहास मंडणाऱ्यानी वेगळ्याच पद्धतीने इतिहास मांडला. संगोळी रायन्ना यांची जयंती राष्ट्रीय समाज पक्षतर्फे होत असल्याने अभिमानास्पद आहे. महादेव जानकर साहेब, राष्ट्रीय समाज पक्षाने उपेक्षित महानायक यांना उजेडात आणण्याचे कार्य केले. संगोळी रायन्ना समाधीस्थळी पोहचणारी पहिला राजकीय पक्ष रासप आहे. श्री. अक्कीसागर यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक सांस्कृतिक घडत आलेल्या घटनांचा समाचार घेऊन पुरोगामी व हिंदुत्ववादी यांचा चेहरा उघडा पाडला.

सुरुवातीला संगोळी रायन्ना यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रासपचे हितचिंतक सुदामशेठ जरग, विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शरदभाऊ दडस, कळंबोली शहर अध्यक्ष आण्णासाहेब वावरे, शहर उपाध्यक्ष देवानंद मोटे, काशलिंग जानकर, शहर सचिव शहाजी शिंदे, चैतन्य जरग, आकाश राजगे, दिलीप राऊत, सागर माने, नारायण वीरकर, युवा कार्यकर्ते प्रतीक जरग व अन्य मान्यवर उपस्थित होते. संगोळी रायन्ना जयंतीनिमित्त पेढे वाटून भारतीय स्वातंत्र्य दिवस व संगोळी रायन्ना यांच्या नावे घोषणा देत जयजयकार केला. कळंबोली शहरात संगोळी रायन्ना जयंती साजरी करून रासपच्या शिलेदारांनी इतिहास घडवला, असे मत यशवंत नायक उपसंपादक आबासो पुकळे यांनी व्यक्त केले. संगोळी रायन्ना जनतेसाठी लढत होते. जवळच्याच लोकांनी फसवून दगा केला तरीही देशांसाठी संगोळी रायन्ना फासावर जाणारे थोर क्रांतीकारक आहेत, असे विचार शरद दडस यांनी व्यक्त केले.

पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्ष २० व्या वर्धापन दिन कार्यक्रमास मोठया संख्येने सहभागी व्हा : सुदामशेठ जरग

येत्या २९ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम गणेश कलामंच पुणे येथे आयोजित केला आहे. कळंबोली शहरातून मोठ्या संख्येने रासपच्या मावळ्यांनी स्वतंत्र गाडी करून जायचे आहे. भव्य दिव्य असा कार्यक्रम करायचा असल्याने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन ज्येष्ठ नेते सुदामशेठ जरग यांनी केले आहे.


संगोळी रायन्ना जयंती प्रसंगी विविध क्षणचित्रे व मान्यवर

संगोळी रायन्ना प्रतिमेस पुष्पहार घालताना विचारवंत सुदर्शन अक्कीसागर व दिलीप राऊत 

 दीपप्रज्वलन करताना आन्नासाहेब वावरे बाजूस सुदर्शन अक्कीसागर.

संगोळी रायन्ना प्रतिमेस अभिवादन करताना काशलिंग जानकर 

संगोळी रायन्ना प्रतिमेस अभिवादन करताना शहाजी शिंदे 

संगोळी रायन्ना जयंती प्रसंगी विचाराची देवाणघेवाण करताना रासपचे शिलेदार.

प्रतिमेस अभिवादन करताना देवानंद मोटे 


प्रतिमेचे पूजन करताना सुदामशेठ जरग 


संगोळी रायन्ना प्रतिमा 


प्रतिमेस अभिवादन करताना चैतन्य जरग 



प्रतिमेस अभिवादन करताना यशवंत नायक उपसंपादक आबासो पुकळे.


शरदभाऊ दडस यांनी डिजिटल फलक तयार करून 
पोलीस निवारा कळंबोली गार्डन येथे प्रचार प्रसार करण्यासाठी लावण्यात आले.


Sunday, August 13, 2023

देशाची सत्ता मिळवायची असल्याने संघर्ष हा करावाच लागेल : आ. महादेव जानकर

देशाची सत्ता मिळवायची असल्याने संघर्ष हा करावाच लागेल : आ. महादेव जानकर 

मुंबई महानगरपालिका प्रचारासाठी प्रत्येक ठिकाणी पोहचणार 

मुंबई | (३०/०८/२३) ए. पी. यशवंत

टीका टिपणी करून काही होणार नाही. आपण आपली ताकद वाढवली पाहिजे. शांत डोक्याने चालले पाहिजे. आजपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही. कोर्ट पोलीस कचेरी यात वेळ जाऊन कार्यकर्ता बरबाद होतो. आपल्याला देशाची सत्ता ताब्यात घ्यायची आहे, त्यामुळे संघर्ष हा करावाच लागेल. त्यांनी आपल्याला रोखले तर आपण त्यांना सत्तेत जाण्यापासून रोखू,असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केले. मुंबईतील ६ लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित जन स्वराज यात्रेत वायबी सेंटर सभागृहात मार्गदर्शन करताना आ. महादेव जानकर बोलत होते.

आ. जानकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष सर्व समाजाची पार्टी आहे. गुजरातमध्ये मुस्लिम, ब्राह्मण,जैन, मराठा, ठाकूर, परमार समाजाचे नगरसेवक रासपातुन जिंकले. काँग्रेसला हटवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो. मी स्वतः भाजपपासून दूर गेलो तर भाजप सत्तेत राहणार नाही, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला.

मी मीडियावर अवलंबून असणारा नेता नाही. कोणी छापो अगर न छापो, माझं काम मी करत राहतो. हवेत फिरणारा मी नेता नाही. जनतेत जाऊन काम करणारा नेता आहे. मुंबई महानगरपालिकेत २२७ वार्ड फिरणार आहे. सोबत कोण येऊ न येऊ आपला स्वतंत्र मार्ग आहे. वाराणसी, मेहसाणा, गांधीनगर, बंगळूर, इटावा, कोलार आदी मतदारसंघात जन स्वराज यात्रेचे नियोजन करावे. आम्ही जिंकणारी माणसे आहोत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक जिंकण्यासाठीची तयारी करा. एक सभा झाली तर तेथील आमदार पडला पाहिजे, अशी तयारी ठेवावी लागेल. शनिवार रविवारी जन स्वराज यात्रेचे नियोजन न करता इतर वारी देखील यात्रेचे नियोजन करावे, तरच 543 मतदारसंघात जन स्वराज यात्रा पोहोचेल. जर मी लोकांना पैसे दिले तर माझ्यामागे ईडी लागेल. लोकांकडून पैसे घेतले तर ईडी कशी माझ्यामागे येईल? असा टोला लगावला.

महाराष्ट्रात संभाव्य उमेदवारांची यादी तयार

राष्ट्रीय समाज पक्षाची 48 लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगून महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी केल्याचे स्पष्ट केले. यावेळी बाळासाहेब लेंगरे, काशिनाथ शेवते, रविंद्र कोठारी, तोसिफ शेख, भाऊसाहेब वाघचौरे यांचा संभाव्य उमेदवार म्हणून नामोल्लेख केला. 

येणारे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष आहे. जनतेत मिसळणारे, जनतेत राहणारे नेते रासपला घडवायचे आहेत. महाराष्ट्रात निश्चितपणे बदल घडवू. उत्तर भारतीयांनी पक्षाचे नेतृत्व करावे. या देशावर जनतेचे राज आले पाहिजे, यासाठी जन स्वराज यात्रा सुरू आहे. यापूर्वी अनेक यात्रा काढल्यामुळे पक्ष इथपर्यंत पोहचला. राष्ट्रीय समाज पक्षाला देशाची सत्ता पाहिजे. आमच्या योजना आम्ही बनवू. आम्ही 1000 कोटी रुपयांची योजना दिली पण ती योजना राबवण्यासाठी त्याच समाजाचा मंत्री पाहिजे. लवकरच दिल्लीच्या रामलीला मैदानावर दहा लाख लोकांचा मेळावा घेऊ. चौंडीमध्ये महारानी अहिल्याबाई होळकर जयंतीस ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले, त्यादिवशी मी चोंडी सोडली. आता दिल्लीच्या अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमाला पंतप्रधान येतील, असा मनोदय आमदार महादेव जानकर यांनी बोलून दाखवला. या सभेत ईशान्य भारत प्रभारी रामभाई पाल, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्र्वर सलगर, जिवाजी लेंगरे, राम पाल, अजित पाटील, सुवर्णा जऱ्हाड व मुंबई शहर पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते.

Friday, August 11, 2023

मी जानकर साहेबांना विसरू शकत नाही; येथून पुढच्या निवडणुका रासपच्या चिन्हावरच लढणार : रत्नाकर गुट्टे, आमदार रासप

मी जानकर साहेबांना विसरू शकत नाही; येथून पुढच्या निवडणुका रासपच्या चिन्हावरच लढणार : आ. रत्नाकर गुट्टे, गटनेता रासप

जन संपर्क कार्यालयात बोलताना रासप आमदार रत्नाकर गुट्टे. बाजूस डावीकडून एस एल अक्कीसागर, सुनिल गुट्टे उजवीकडे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, काशिनाथ शेवते, राजेभाऊ फड.

गंगाखेड : यशवंत नायक ब्यूरो 

आजपर्यंतच्या निवडणुका रासपच्या चिन्हावर लढवल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरच निवडणुका लढवू, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभेचे गटनेते आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले. जिल्हा परिषदेवर रासपचा झेंडा फडकवू. आम्ही कोणासोबत युती करायला जाणार नाही. आज काल खूप चर्चांना उधाण आले आहे. काहीजण बोट घालायला शोधत आहेत. रत्नाकर गुट्टे हा छोटा कार्यकर्ता आहे, पण कोणाला बोट घालायला संधी देत नाही. मी विसरू शकत नाही. कारण मी जेलमध्ये होतो निवडणूक आधीपासूनच सहा सात महिने जेलमध्ये होतो. मी मतदार संघापासून सात आठ महिने दूर होतो. मला कोणताही राजकीय वारसा नव्हता. माझे वडील साधे ग्रामपंचायत सदस्य नव्हते. मी कॉलेजला निवडणूक लढवली होती आणि जिंकलोही होतो. जानकर साहेब मंत्री होते. रात्रीच्या तीन-तीन वाजेपर्यंत माझ्यासाठी वाड्यावर वस्त्यांवर गेले. पूर्ण महाराष्ट्राचे रासप येथे आले होते. कितीही चर्चा केल्या तरी, मी विसरू जानकर साहेब यांना विसरू शकत नाही. भाजप प्रदेशांनी एक स्टेटमेंट दिले, आमचे उमेदवार म्हणून. जानकर साहेबांना मी एका तासाच्या आत फोन केला. जानकर साहेबांना मी विसरू शकत नाही. पंकजाताईंची मदत झाली. मी पॉलिटिक्समध्ये कमी पडतो. माझ्यामध्ये राजकारण अजिबात नाही. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. निवडणुकीत लोक म्हणू लागले, जेलमध्ये असलेला माणूस निवडून येतो का? माझ्या कार्यकर्त्यांनी मला निवडून आणले.

तेलंगणात लोकसभेच्या १७ व विधानसभेच्या ११९ जागांवर रासप स्वबळावर लढणार : शुरनर

तेलंगणात लोकसभेच्या १७ व विधानसभेच्या ११९ जागांवर रासप स्वबळावर लढणार : शुरनर

तेलंगणा प्रभारी गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे यांचा सत्कार करताना स्थानिक रासप पदाधिकारी.

हैदराबाद येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक 

हैदराबाद- तेलंगणा | यशवंत नायक ब्यूरो 

तेलंगणातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ११९ जागा व लोकसभेच्या १७ जागांवर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. तेलंगणा राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष आपले अस्तित्व दाखवणार आहे. येथिल स्थानिक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. अनेक उमेदवार रासपातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत अशी माहिती रासपचे तेलंगणा प्रभारी गोविंदराव शुरनर यांनी यशवंत नायकशी बोलताना दिली. श्री. शुरनर हे हैदराबाद येथून बोलत होते. दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी राष्ट्रीय समाज पार्टीचे कार्यकर्ता मिंटिगचे आयोजन केले होते. या बैठकित तेलंगना रासप पदाधिकारी व अतिथी राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा उपस्थित होते. 

तेलंगाना प्रभारी राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करून स्वबळावर निवडणुक लढवाव्यात. पदाधिकारी यांनी वनबूथ टेनयूथसह प्रत्येक गावात शाखा तयार कराव्यात. या बैठकित बीआरएस पार्टीचे नगरसेवक नागेस कुरमा यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले. बैठकीसाठी तेलगाना युवा रासप नेते जयपाल कुरमा, नरसिमलु नविन, राकेश‌जी, बरगद्दा नागेश, सुभाष मासाळ उपस्थित होते. दि. २९ ऑगस्ट २०२३ ला राष्ट्रिय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिवस महाराष्ट्र पुणे येथे साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमास राज्यातील सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. नारायणखेड जिल्ह्याचे रहिवाशी असलेले रासपचे युवा नेते जयपाल कुरुमा खास रासप नेत्यांची भेट घेण्यासाठी आले होते.

Wednesday, August 9, 2023

रासप नेते महादेव जानकर यांनी घेतले प्रा. नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

रासप नेते महादेव जानकर यांनी घेतले प्रा. नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

 प्रा. हरी नरके यांच्या पर्थिवाचे अत्यंदर्शन घेऊन आ. महादेव जानकर यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंत्री अतुल सावे व अन्य मंडळी उपस्थीत होते.

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो 

समता परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, थोर विचारवंत लेखक प्रा. हरी नरके यांचे आज हृदयविकाराने दुःखद निधन झाले. प्रा. नरके सर यांच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी थोर विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या पार्थिवाचे सायन हॉस्पिटल मुंबई येथे अंत्यदर्शन घेतले.

अर्नाळा जिल्हा - पालघर येथील राष्ट्रीय समाज पक्ष शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थीत असताना माजी मंत्री महादेव जानकर, प्रा. हरी नरके व संजय सोनवणी

प्रा. नरके सर यांच्या निधनाने राष्ट्रीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आयोजित कटगुण येथील आधुनिक भारताचे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. हरी नरके सर यांनी भूषविले होते.

भारतीय स्वातंत्र्याचे आद्य प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर या संजय सोनवणी लिखित पुस्तक प्रकाशनवेळी प्रा.नरके, महादेवजी जानकर, अक्कीसागर व प्रकाश खाडे

दिनांक ११ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षतर्फे राज्यभर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. नरके सर हे चळवळीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे मनाला वेदना होत आहेत.

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...