Tuesday, August 27, 2024

नांदेड येथे रासपाची आढावा बैठक संपन्न

नांदेड येथे रासपाची आढावा बैठक संपन्न

नांदेड (२५/८/२४) : रोजी रविवारी ठीक दुपारी १२.३० वाजता बंदखडके कोचिंग क्लासेस छत्रपती नगर, पुर्णा रोड नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर मार्गदर्शन करताना म्हणाले, येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्याच्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी बुथ बांधणीच्या कामाला लागावे. २९ ऑगस्ट रोजी अकोला येथे पक्षाच्या वर्धापनदिना‌ला प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ते जास्तीच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे म्हणाले, पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमाला अकोला येथे नांदेड जिल्ह्यातून जास्तीजास्त कार्येकर्ते येतील, असे आश्वासन दिले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षापदी सौ अरूणा साखरे, नांदेड महानगराध्यक्षपदी दिपकराव कोटलवार, महानगर सचिवपदी गंगाधर होळकर यांना नियुक्तीपत्र  दिले. बैठकीचे आयोजन जिल्हामहासचिव प्रा. चंद्रकांत रोडे यांनी केले होते.

निफाड व सिन्नर विधानसभा मतदार क्षेत्राचा रासपकडून आढावा

निफाड व सिन्नर विधानसभा मतदार क्षेत्राचा रासपकडून आढावा


निफाड (१६/८/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे निफाड विधानसभा क्षेत्र निरीक्षक एड. आशुतोष जाधव, सिन्नर विधानसभा क्षेत्र निरीक्षक सुवर्णाताई जऱ्हाड पाटील यांनी नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण आव्हाड, उत्तर महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष धीरज पाटील यांच्या उपस्थितीत निफाड येथे आढावा बैठक घेतली. निरीक्षकांनी निफाड व सिन्नर विधानसभा स्वबळावर लढणार असल्याचे सांगीतले. सुवर्णाताई जऱ्हाड पाटील यांनी बैठकीमध्ये बुथ बांधणी करणे, पक्ष संघटन मजबूत करण्यास सांगितले. बैठकीस तालुका अध्यक्ष नवनाथ पारखे, विधानसभा अध्यक्ष दत्ता बिडकर, तालुका संपर्कप्रमुख शंकर बाबा साबळे उपस्थित होते. डॉ वसीम कादरी, डॉ.अनिल सोनवणे इंजि. धनंजय नागरे, रामदास बारगळ, संजय माळी, लखन मोरे, किरण माळी, संजय पारखे, ज्ञानेश्वर बिडगर,  बाळासाहेब टरले, दगू गडाख, बाळासाहेब सोनवणे, नवनाथ कोपनर, रमेश पडवळ, शकुंतला साबळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला.

महिलावरील अत्याचार विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाची निदर्शने

महिलावरील अत्याचार विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाची निदर्शने 

शाहूवाडी (२३/८/२४) : कोलकता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार, बदलापूर येथे दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनीशी झालेली दुर्दैव घटणा, शिये येथे अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून या घटनेच्या निषेधार्थ 'राष्ट्रीय समाज पक्षाच्या'वतीने मलकापूर जिल्हा कोल्हापूर येथे शाहूवाडी तालुका अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. संबंधित घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रासप पदाधिकाऱ्यांनी केली. नराधमांना फाशी द्या, गोळ्या घाला, तुडवून मारा अशा प्रकारची घोषणा देऊन प्रतीकात्मक पुतळ्यास फाशी देऊन दहन करण्यात आले.

यावेळी तालुका उपाध्यक्ष पांडुरंग पांढरे, संपर्क प्रमुख शिवाजी कोळी, युवक तालुकाध्यक्ष महेश सावंत, विधानसभा अध्यक्ष प्रकाश मुळे, पन्हाळा तालुकाध्यक्ष योगेश सकटे, संपर्कप्रमुख संजय सकटे, शाहूवाडी महिला आघाडी तालुका अध्यक्षा स्वाती बिरांजे व ग. रा. वारंगे कॉलेजच्या विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.

राष्ट्रीय समाज पक्ष नंदुरबार विधानसभा स्वबळावर लढवणार

राष्ट्रीय समाज पक्ष नंदुरबार विधानसभा स्वबळावर लढवणार 

नंदुरबार (११/८/२४) : नंदुरबार विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष लढणार आणि जिंकणार, असे मत नंदुरबार जिल्हाध्यक्ष गणेश गावित यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गट आणि गणप्रमुखांचा लवकरच बूथ प्रमुख यांचा मेळावा घेऊन, पुढील रणनीती ठरवणार. राष्ट्रीय समाज पक्षाची नंदुरबार जिल्हा आढावा बैठक पार पडली. बैठकीस राज्य सचिव डॉ. प्रल्हाद पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य सय्यदबाबा शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदराव बाचकर, उपाध्यक्ष शशिकांत मतकर, महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिताताई बागुल, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे आदी उपस्थित होते

चांदवड विधानसभा रासपला जिंकायचीच आहे

चांदवड विधानसभा रासपला जिंकायचीच आहे 

चांदवड (१०/८/२४) : नाशिक जिल्ह्यातील चांदवड विधानसभा ही राष्ट्रीय समाज पक्षाला जिंकायचीच असून, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन विधानसभा निरिक्षक नानासाहेब जुंधारे यांनी केले आहे. येणाऱ्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचा भव्य मेळावा घेऊ. प्रत्येकाने आपापल्या आघाडीचे प्रत्येक गावामध्ये किमान पाच पदाधिकारी तयार करावे, असं विधानसभा निवडणूक निरीक्षक श्री. जुंधारे यांनी सांगितले. मार्केट कमिटी सभागृह चांदवड या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाची विधानसभा निवडणुक नियोजन बैठक पार पडली. बैठकीस प्रदेश सचिव प्रल्हाद पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य सय्यदबाबा शेख, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, उपाध्यक्ष शशिकांत मतकर, उत्तर महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष धीरज पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ अरुण आव्हाड, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा चांडवड विधानसभा निरिक्षक नानासाहेब जुंधारे, नाशिक शहराध्यक्ष विलास पलंगे, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत तालुकाध्यक्ष गणेश घुमनर यांनी केले गणेश नाकोडे, दौलत वाघ,पिंटू गाडे, नवनाथ जाधव, सुखदेव वाघ, संतोष वागमोडे, तुषार राजनोर, निलेश वाघमोडे, गोरख हुलनार, प्रशांत ठोंबरे आदि पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ. आव्हाड यांनी केले. आभार धीरज पाटील यांनी मानले.

राष्ट्रीय समाज पक्ष शिरूर हवेली मतदारसंघ स्वबळावर लढविणार

राष्ट्रीय समाज पक्ष शिरूर हवेली मतदारसंघ स्वबळावर लढविणार

शिरूर हवेली (४/८/२४) : आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. बैठकीस पश्चिम महाराष्ट्र समन्वयक विधानसभा निरीक्षक सचिन गुरव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजीशेठ शिंगाडे, जिल्हाप्रमुख किरण गोफणे, जिल्हाध्यक्ष विनायकमामा रुपनवर, ज्येष्ठ नेते रामकृष्ण बिडगर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, महिला तालुका अध्यक्ष चेतना पिंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र पुणेकर, कार्याध्यक्ष गोरख दुबे, उपाध्यक्ष वाल्मीक करे कार्याध्यक्ष सतीश तागड, गोरख पुणेकर, शिरूर शहराध्यक्ष शिकंदर पटेल, युवती महिला तालुका अध्यक्ष एड. अपेक्षा कुऱ्हाडे, विकास पवार, गोकुळ पिंगळे, चंद्रकांत मलगुंडे, प्रियंका कुराडे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्ष स्वाभिमानाची २१ वर्ष

राष्ट्रीय समाज पक्ष 
स्वाभिमानाची २१ वर्ष 

ना राजकीय वारसा, ना पैसा! केवळ स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ते सत्यात उतरविण्यासाठी कितीही मेहनत घ्यायची तयारी. या जोरावरच एका मेंढपाळाच्या मुलाने आपला पक्ष महाराष्ट्रच नव्हे तर देशातील चार राज्यात दखलपात्र पक्ष बनवला. एवढेच नव्हे तर, देशातील २३ राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाने आपले कमी किंवा जास्त प्रमाणात अस्तित्व निर्माण केले आहे. दुसऱ्याच्या महलात राहण्यापेक्षा स्वत:ची झोपडी महत्वाची, "आयएम नॉट डिमांडर , वी आर ए कमांडर," हे वाक्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या तोंडात नेहमी असते. आयुष्यात सर्वात महत्वाचे काय असेल तर तो "स्वाभिमान". तो कोणत्याही परिस्थीतीत जपला गेलाच पाहिजे हे आज वरच्या वाटचालीत त्यांनी नेहमी दाखवून दिले आहे. सर्वसामान्यांच्या हातात सत्ता आणण्यासाठी सुरू झालेली त्यांची लढाई २१ वर्षात पोहचली आहे. राज्यातीलच नव्हे तर, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगणाऱ्या देशातील प्रत्येक युवकांसाठी रासपची ही २१ वर्षाची स्वाभिमानाची लढाई एक प्रेरनास्थान बनली आहे. राज्याच्या सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये या लढाईची नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंद होणारी अशीही संघर्ष कहाणी आहे. 

महादेव जानकर : स्वाभिमानी राष्ट्रीय नेता

मोदी सरकारच्या काळात देशातील अनेक दिग्गजांना नमते घ्यावे लागले. देशातील महत्वाच्या राजकीय स्थित्यंतराच्या काळात महादेव जानकर यांनी आपला स्वाभीमान नेहमीच जपला. त्यामुळेच अनेक बडया हस्ती लोकसभेच्या तिकिटासाठी रांगेत थांबले असताना, महादेव जानकर यांना महायुतीने बोलावून उमेदवारी बहाल केली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचारासाठी आले, महादेव जानकर हे माझे भाऊ आहे, अस संबोधले. असा हा नेता संघर्षातून तयार झालेला आहे. महादेव जगन्नाथ जानकर देशाच्या राजकारणातील लाखात एक असे व्यक्तिमत्त्व आहे. सुशिक्षित, उच्च ध्येय, दूरदृष्टी, स्पष्ट लक्ष्य, सातत्यपूर्ण कार्यक्रम, राजकीय ध्येयवाद, अथक परिश्रम, त्याग, संघर्ष तसेच ज्ञान आणि नीतीचा उत्कृष्ट संगम आहेत. राज्याचे मंत्रिपद भोगलेल्या या नेत्याला गर्वाने कधीच शिवले नाही. आजही ते कार्यकर्त्याच्या गराड्यातच त्यांच्यातीलच एक होऊन मिळून जातात. अशा या राष्ट्रीय नेत्याचा जन्म नेहमी भटकंतीवर असणाऱ्या माता गुणाबाई आणि पिता जगन्नाथ यांच्या पोटी सातारा तालुक्यातील वाढे गावातील एका रानमाळावर झाला. गावी, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत इंजिनिअर झाले. कॉलेज जीवनापासून नेतृत्व करणारे महादेव जानकर १९९३ साली ‘यशवंत सेना प्रमुख’ बनले. चांगली नोकरी करून सुखाचा संसार थाटण्याचे सोडून, तारुण्य सुलभ भावनेचा त्याग करून, ‘समाजाचा संसार’ थाटण्याचा निर्धार महादेव जानकर यांनी केला. ‘घरी जाणार नाही, नातेसंबंध ठेवणार नाही, लग्न करणार नाही आणि ‘राष्ट्रीय समाज’ला सत्ता, संपत्ती, सन्मान मिळवून देण्यासाठी आजन्म कार्यरत राहीन,’ अशी भीष्म प्रतिज्ञा ‘महादेव’ यांनी घेतली. एका खडतर प्रवासाचा आरंभ महादेव जानकर यांनी सुरू केला. १९९३ ते आजतागायत या शपथेस जागले आहेत. २९ ऑगस्टला त्यांच्या या राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रवासाला २१ वर्षे पुर्ण होत आहेत.

 सर्व समाज घटकांबाबाबत ममत्व बाळगून यशवंत सेनेत कार्यरत असताना ते मान्यवर कांशिराम यांच्याकडे आकर्षित झाले. कांशिरामांना भेटायला गेले. त्यांची प्रतिज्ञा ऐकून तेही प्रभावित झाले. ‘हमे तो हम जैसा एक और पागल मिल गया,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. पहिल्या भेटीतच त्यांनी महादेव जानकरांना मुलगा मानले. प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्याबरोबर असायचे. त्यांचे केडर कँप प्रशिक्षण घेतले. समाजाची व सिस्टमची माहिती जाणून घेतली. बहुजन समाज पक्षातून (बीएसपी) त्यांनी पहिल्यांदा नांदेडची लोकसभा लढली. त्यावेळी बीएसपीच्या उमेदवारांमध्ये त्यांना राज्यात सर्वाधिक मते मिळाली होती. प्रस्थापित पक्षात हे नेते आपले आणि आपल्या समाजाचे स्थान शोधत असताना महादेव जानकर यांनी आपला राजकीय पक्ष स्थापन करून केवळ धनगरच नव्हे तर तमाम उपेक्षित, दुर्लक्षित, दलित, मागास ‘राष्ट्रीय समाजा’साठी स्थान शोधत आहेत. ब्राह्मण, मराठा ते जैन, मुस्लिम अल्पसंख्य समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतात. ‘एकात्म राष्ट्र निर्माण’ हे त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. त्यामुळे महादेव जानकर यांच्यासारखी दुसऱ्या कोणा राजकीय नेत्याची वाटचाल नाही. 

राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना

"राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाति, राष्ट्र ही धर्म हमारा, राष्ट्र बने बलशाली यह भाषासूत्र हमारा !" ही रासप पक्षाची सामाजिक- राजकीय विचारधारा आहे. सत्यशोधन! समाज प्रबोधन!! आणि राष्ट्र संघटन!!! ही त्यांची त्रीसूत्री आहे. राष्ट्र सर्वापरी मानणारा समाज-राष्ट्रीय समाज हा पक्षाचा सामाजिक आधार आहे. ब्राह्मण, मराठा ते जैन, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, ख्रिश्चन पासून भारतात राहणाऱ्या सर्वदूर पसरेल्या बहुभाषिक राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानले जातात. राजकारण हेच समाजकारणासाठी सर्वात मोठे साधन मानून महादेव जानकर कार्यरत आहेत. सर्वसामान्यांच्या हतात सत्तेची दोर असेली पाहिजे या हेतूनेच त्यांनी ३१ मे २००३ रोजी चौंडी येथे पक्षाची घोषणा केली. पुढे २९ ऑगस्ट २००३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय समाज पक्ष नोंदणीकृत पक्ष झाला. उपेक्षित, दुर्लक्षित बहुजन समाजाला ओबीसी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक समाजाला सत्तेत घेऊन जाणे, हे त्यांनी मुख्य लक्ष्य केले. त्यातून ते राज्यात बहुसंख्य बहुजनांचा नेता म्हणून पुढे आले. धनगर समाजातून कामाला सुरुवात केली तरी त्यांनी पक्षाला व त्यांच्या कार्याला कोणत्याही एका जातीच्या चौकटीत अडकविले नाही. समतावादी समाज व्यवस्थेचे प्रेषक असल्यामुळे मराठा, माळी, साळी, कोळी, वाणी, वंजारी, मुस्लिम अशा सर्वच बहुजन समाजाने त्यांना साथ दिली. पक्षाचा पहिला आमदार मराठा समाजाचा. नंतरही मराठा समाजाचा आला, हेच त्यांच्या विचारधारेचे यश आहे. त्यातून संपूर्ण देशभरात महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे. 


२३ राज्यांत रासपचे अस्तित्व

पक्ष स्थापनेनंतर रासपाने ग्रामपंचायत ते विधानसभा, लोकसभा निवडणुका लढविल्या आणि जिंकल्याही. २००९ साली पक्षाचा एक आमदार निवडून आणला. स्वत: महादेव जानकर यांनी सर्वप्रथम १९९८ साली नांदेड लोकसभा लढविली, तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. २००६ साली सांगली लोकसभा पोटनिवडणूक लढविली. राष्ट्रीय समाज पक्षाने २००४ सालच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतून संसदीय लढाईत प्रवेश केला. महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये जागा स्वबळावर लढविली. पहिल्याच निवडणुकीत दीड लाखापेक्षा जास्त मते मिळवून महाराष्ट्रात दहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरला. पुढे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दीड लाखापेक्षा जास्त मते मिळवून राज्यात आठव्या क्रमांकाचा पक्ष ठरला. २००९ साली रासपने महाराष्ट्र - कर्नाटक - आसाम - गुजरात - बिहार अशा ३४ जागा स्वबळावर लढविल्या. स्वत: महादेव जानकर यांनी माढा येथून शरद पवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढवून लाखभर मते मिळवली. रासप दोन लाखांपेक्षा जास्त मते मिळवून महाराष्ट्रात पाचव्या नंबरचा पक्ष बनला. नंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एक आमदार निवडून आला. २०१४ साली महादेव जानकर यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात साडेचार लाखांपेक्षा अधिक मते मिळवून आपली ताकद दाखवून दिली. पुढे ते २०१५ ला विधानपरिषदेचे आमदार बनले. 

महाराष्ट्रा बरोबर अन्य राज्यांतही पक्ष विस्तारत चालला आहे. गुजरात राज्यातून पक्षाचे १८ नगरसेवक निवडून आले. मते मिळवण्यात गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सातव्या क्रमांकाचा पक्ष ठरला. गुजरात विधानसभा निवडणुकीत वडोदरा - सयाजीगंज मतदारसंघातून राज्याचे पक्षाध्यक्ष राजेश आयरेंनी कडवी झुंज दिली. तृतीय क्रमांकाची मते मिळवली. दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यांत पक्ष जोमाने वाढू लागला आहे. गोवा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, बिहार, उत्तराखंड, हरियाना, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यांत पक्ष मूळ धरू लागला आहे. उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही; परंतु १.२ टक्के मते पक्षाने संपूर्ण राज्यात मिळविली आहेत. अकेला चला... कारवा बनता गया! हे महादेव जानकर यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे. 

रानोमाळ ते कॅबिनेटमंत्री 

रानामाळातून विधानभवन- कॅबिनेट मंत्रिपद असा महादेव जानकर यांचा प्रवास आहे. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचे पशू, दुग्ध व मत्स्य खात्याचे मंत्री झाले. याचवेळी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्त्याला राज्यमंत्री दर्जाच्या पदावर बसविले. शेकडो सर्वसामन्य कार्यकर्त्याना विविध शासकीय समित्यांवर वर्णी लावली. मंत्रिपदाच्या जोरावर अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या खात्यांतर्गत महामंडळ नफ्यात, तसेच प्रकाशझोतात आणण्याची कर्तबगारी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात करून दाखविली आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडून या क्षेत्रांच्या वृद्धीसाठी विविध नवीन निर्णय घेतले. उत्कृष्ट दुग्धोत्पादन देणाऱ्या गोवंशीय व म्हैसवर्गीय पशूंचे संवर्धन पशुपालकांकडून होण्यासाठी प्रोत्साहन दिले. कुक्कुटपालन, तसेच अंडी उत्पादन वाढण्यासाठी आर्थिकसाह्याच्या योजना राबविल्या. महादेव जानकर यांच्या काळात नीलक्रांती धोरणातून राज्यात मत्स्योत्पादनात वाढ केली गेली. चांदा ते बांदा योजनेंतर्गत चंद्रपूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी व्हेनामी कोळंबीच्या बीज उत्पादन केंद्र (हॅचरी), खेकडा हॅचरीज, जिताडा मासा हॅचरीज व संवर्धन, खारे व गोड्या पाण्यातील पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन, मासेमारी जेट्टींचे आधुनिकीकरणाबाबत निर्णय घेतला गेला. शेतकऱ्यांच्या दारात गायी- म्हशीमध्ये कृत्रिम रेतन सेवा उपलब्ध करून देणे, संतुलित पशुखाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा पुरविणे, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व पूरक पशुखाद्य पुरवठा, वैरण विकास कार्यक्रमांतर्गत बहुवार्षिक गवत लागवड, मुरघास व कडबा कुट्टी यंत्रवाटप, गाव पातळीवर लसीकरण, गोचीड निर्मूलन व वंध्यत्व निदान आदींचा समावेश, दुधाळ जनावरांचे वाटप, तसेच दुग्धव्यवसायासाठी संस्थात्मक उभारणीचे काम केले. चारायुक्त शिवार योजना, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, पशुपालक उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेसाठी अभ्यासगटाची स्थापना, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने अनुसूचित क्षेत्र/आदिवासी क्षेत्रासाठी स्वयम योजना, विदर्भ, मराठवाड्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत दूध उत्पादन वाढीकरिता दुग्धविकास प्रकल्प, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, कामधेनू दत्तक ग्राम योजना, दूध योजना व शीतकरण केंद्राचे खासगी सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनरुज्जीवन व अत्याधुनिक गोठा अशा विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याचे प्रयत्न झाले. विशेष म्हणजे दूध दरात पाच रुपयांची वाढ करून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनाचा कणा असलेला पशुपालन व्यवसायास उभारी देण्यास मदत केली. पक्ष आणि कार्यकर्ते यांना जनतेत सन्मानास पात्र बनविले. त्यांचा हा प्रवास दैदीप्यमान आहे. 

कार्यकर्त्यांना सर्वस्व मानणारे नेतृत्व 

महादेव जानकर कार्यकर्त्यापासून नेता बनले. लोकशाही भारतात अजून राजतंत्र आहे, घराणेशाही आहे आणि ही घराणेशाही सर्व देशातील सर्व छोट्या-मोठ्या पक्षात दिसून येते. राष्ट्रीय समाज पक्ष मात्र याला अपवाद आहे. संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी २०१८ साली राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद श्री. एस. एल. अक्कीसागर यांच्याकडे मोठ्या विश्‍वासाने आणि सन्मानाने सोपविले. श्री. एस. एल. अक्कीसागर मूळचे कर्नाटक राज्याचे आहेत. त्यांची जन्मभूमी जबलपूर मध्य प्रदेश आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे आणि हे सर्व महादेव जानकर यांच्या स्वतंत्र, स्वाधीन आणि कुशल नेतृत्वाधीन झाले आहे. 

समान शिक्षण व जातिनिहाय जनगणना अजेंडा

देशामध्ये सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे, हा महादेव जानकर यांचा मुख्य अजेंडा आहे. आमची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार आणि धनदांडग्यांची इंग्रजी शाळांमध्ये. समान दर्जाचे शिक्षण नसलेल्यांना नोकऱ्यांच्या परीक्षेत मात्र एकत्र पळवणार, अशी आपली शिक्षण पद्धती आहे. ती बदलली गेली पाहिजे. तुम्ही एसीत शिका, आम्ही साध्या शाळेत; परंतु सर्वांना अभ्यासक्रम एकच पाहिजे. बोर्ड एकच पाहिजे. तरच सर्वसामान्यांची पोरं सध्याच्या स्पर्धेच्या जगात टिकतील, असा जानकर यांचा विश्‍वास आहे. आपली मुलंही नोबेल पारितोषिक विजेती बनली पाहिजेत, अशी शिक्षण पद्धती आणणे आवश्यक असल्याचेही ते म्हणतात. 

देशामध्ये जातिनिहाय जनगणना न झाल्याने समाजाच्या विकासाचे निश्‍चित असे धोरण ठरवता येत नाही. सर्व समाजाला विकासाच्या प्रक्रियेत समान वाटा मिळत नाही. त्यासाठी जातिनिहाय जनगणना हा एकमेव पर्याय आहे. ती झालीच पाहिजे, हा राष्ट्रीय समाज पक्षाचा आगामी काळात मुख्य अजेंडा असणार असल्याचे जानकर सांगतात. 

जन्मभूमीच्या विकासात योगदान 

राजकीयदृष्ट्या सातारा जिल्ह्यापेक्षा विदर्भ - मराठवाड्यातील लोकांनी महादेव जानकर यांना साथ दिली. भरभरून प्रेम केले, तरीही जन्मभूमी म्हणून त्यांचे साताऱ्याच्या विकासाकडे नेहमीच लक्ष राहिले आहे. देशात कुठेही फिरत असलो तरी साताऱ्यावर नेहमी लक्ष असतेच, असे महादेव जानकर आवर्जून सांगतात. विदर्भ- मराठवाड्यासाठी असलेल्या योजनांमध्येही त्यांनी सातारा जिल्ह्याचा आग्रहाने समावेश करून घेतला आहे. मत्स्य व्यवसायासाठी कण्हेर, राजेवाडी, तारळी धरणावर प्रोजेक्‍ट देण्यात आले. माणमध्ये सोलर प्रोजेक्‍ट आणण्यासाठी प्रयत्न केले. भाडेतत्त्वावर जमिनी देऊन शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मालक ठेऊन हे प्रोजेक्‍ट करण्याचा त्यांचा मनोदय आहे. माणमध्ये रेल्वे आणण्यासाठीही त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. माण तालुक्‍यात मुंबई - बंगळूर कॉरिडॉर अंतर्गत औद्योगिक वसाहत उभारण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. मंत्री असताना वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी महत्त्वाच्या बैठका घेतल्या. जलयुक्त शिवार योजना, पाणंद रस्ते योजना याची जिल्ह्यात विशेषत: माण तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या उद्योगांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला. दुष्काळी भागाला पाइपलाईनने पाणी देण्याची भूमिका त्यांनी मांडली. या पद्धतीमुळे आता माणच्या दुष्काळी भागात पाणी आले. त्यामुळे शेतकरी बागायती पीक घेऊ लागले आहेत. 

........... 

राष्ट्रीय समाज पक्षाची वाटचाल 

पक्ष नावाची घोषणा : ३१ मे २००३ (चौंडी, अहमदनगर, महाराष्ट्र) 

नोंदणीकृत स्थापना : २९ ऑगस्ट २००३ ( दिल्ली) 

आजवरच्या निवडणुकातील सहभाग 

पहिली निवडणूक : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक -२००४ 

एकुण उमेदवार : १३ एकूण मिळालेली मते : १४६५७६ 

महाराष्ट्र , कर्नाटक, 

.................. 

महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २००४ 

उमेदवार : ३८ एकूण मिळालेली मते : १४४७५३ 

............

सांगली लोकसभा पोटनिवडणूक २००६ 

.................. 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २००९ 

एकुण उमेदवार : ३२ एकूण मिळालेली मते : २१५०४२ 

महाराष्ट्र, गुजरात, आसाम 

................... 

सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ 

उमेदवार : २६ विजयी उमेदवार: ०१ (अहमदपूर) श्री. बाबासाहेब पाटील

एकुण मिळालेली मते : १८७१२६ 

.................. 

सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०१२ 

उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : १७२१ 

............... 

सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक २०१३ 

एकूण उमेदवार : ०१ मिळालेली मते : ३६३३ 

.............. 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१४ 

एकूण उमेदवार : ०५ मिळालेली मते : ७५८५८४ 

महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू , कर्नाटक, उत्तर प्रदेश 

................... 

सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ 

उमेदवार : ०६ विजयी उमेदवार : ०१ (दौंड) श्री.राहूल कुल 

एकूण मिळालेली मते : २५६६६२ 

.................. 

सार्वत्रिक तमिळनाडू विधानसभा निवडणुक २०१६ 

एकूण उमेदवार : ०४ एकूण मिळालेली मते : ८७६८ 

............... 

सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०१७ 

एकूण उमेदवार : १२ एकुण मिळालेली मते : ४१८३४ 

.............. 

सार्वत्रिक राजस्थान विधानसभा निवडणुक २०१८ 

एकूण उमेदवार : ०३ एकुण मिळालेली मते : ७८१२ 

.................. 

सार्वत्रिक गुजरात विधानसभा निवडणुक २०१८ 

एकूण उमेदवार : ०४ एकुण मिळालेली मते : ९५८३३ 

............... 

सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक २०१८ 

एकूण उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : ७३२७ 

............... 

सार्वत्रिक मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक २०१८ 

एकूण उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : ४३११ 

................. 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९ 

एकुण उमेदवार : ११ एकूण मिळालेली मते : २५८५४२ 

महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान 

.................. 

सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९ 

उमेदवार : ०१ विजयी उमेदवार : ०१ (गंगाखेड) आमदार डॉ. श्री.रत्नाकर गुट्टे 

एकुण मिळालेली मते : ८११६९ 

.................. 

सार्वत्रिक बिहार विधानसभा निवडणुक २०२० 

एकूण उमेदवार : ०५ एकूण मिळालेली मते : १०४१४ 

.............. 

उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुक २०२० 

उमेदवार : ०१ (३६७ - मल्हणी) 

................ 

सार्वत्रिक दिल्ली विधानसभा निवडणुक २०२० 

एकुण उमेदवार : ०३ एकूण मिळालेली मते : २४८१ 

............. 

सार्वत्रिक तमिळनाडू विधानसभा निवडणुक २०२१ 

एकूण उमेदवार : ०२ एकूण मिळालेली मते : ७३६१ 

........... 

सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०२२ 

उमेदवार : ३० एकूण मिळालेली मते : ९५९६३ 

............. 

सार्वत्रिक तेलंगणा विधानसभा निवडणुक २०२३ 

एकूण उमेदवार : ०१ एकूण मिळालेली मते : १९०७ 

................ 

सार्वत्रिक मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक : २०२३ 

एकूण उमेदवार : ०२ एकूण मिळालेली मते : ३५९७ 

............. 

सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक : २०२३ 

एकूण उमेदवार : ०५ एकूण मिळालेली मते : १४६८९ 

................ 

सार्वत्रिक लोकसभा निवडणुक : २०२४ 

एकूण उमेदवार : २० एकूण मिळालेली मते : ८५६७८९ 

महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू , कर्नाटक , मध्यप्रदेश, बिहार , दिल्ली , उत्तर प्रदेश 

.............. 

अकोल्यात २१ वा वर्धापन दिन 

राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला वर्धापन दिन २००४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष केंद्रीय कार्यालय, मुंबई येथे पार पडला. त्यानंतर आजवर राज्य व देशातील विविध ठिकाणी पक्षाचे २० वर्धापन दिन थाटात पार पडले. २१ वा वर्धापनदिन पक्षासाठी विशेष महत्वाचा आहे. तो २९ ऑगस्ट २०२४ ला दुपारी साडेबाराला अकोला येथील मराठा मंगल कार्यालयात पार पडणार आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील विविध राज्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुक येऊ घातली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या सोबत तन, मन, धन देऊन सहकार्य करावे. वर्धापदिनानिमित्त यशवंत नायक परिवाराकडून पुढील यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..!

रासपाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांचा कर्नाटक, तेलंगणा दौरा

रासपाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांचा कर्नाटक, तेलंगणा दौरा 

बेंगलोर : अनुप रेवन्ना यांच्या विवाहसोहळ्यात डावीकडून एस. एल. अक्कीसागर, भुवाजी अर्जुनभाई देसाई (राजस्थान), उत्तर प्रदेश माजी राज्यमंत्री सतिश पाल.

बेंगलोर, यादगीर : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य तथा भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्किसागर हे दिनांक १९ ऑगस्ट २०२४ पासून कर्नाटक, तेलंगणा दौऱ्यावर होते. बेळगावहून अक्कीसागर हे बेंगलोरच्या दिशेने रवाना झाल्याबाबत यशवंत नायकशी बोलताना सांगितले होते. कर्नाटकचे माजी मंत्री तसेच शेफर्डस इंडियन इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष मा. एच. एम. रेवन्ना यांचे सुपुत्र सिने अभिनेता अनुप रेवन्ना यांच्या विवाहसोहळ्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचे खास प्रतिनिधी म्हणून श्री. अक्कीसागर उपस्थित राहिले. विवाहसोहळ्यास देशभरातील विविध स्तरातील अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार, शेफर्डस इंडियन इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष एच. विश्वनाथ, केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल, राजस्थानचे आमदार रतन देवासी, माजी राज्यमंत्री सतिश पाल, अर्जुनभाई देसाई, कनक पिठाचे स्वामी श्री निरांजनांदपुरी, सिद्धरामानंदपुरी सहित अनेक मान्यवर उपस्थित होते. यजमान रेवन्ना यांच्यापासून अनेक नेत्यांनी आणि समाज बांधवानी मा. महादेव जानकर यांची आठवण काढली. श्री. अक्कीसागर यांनी कर्नाटक व देशभरातील लोकांशी सामाजिक व राजकीय चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष आणि रासेफ संबंधी चर्चा करण्यात आली. देशभरातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक जणांनी नेतृत्व महादेव जानकर आणि पक्षांबद्दल कुतूहूल व्यक्त केले, अनेक लोक पक्षात येण्यास इच्छुक झाले. 

यादगीर : येथे एस. एल. अक्कीसागर समवेत तेलंगणा प्रांत अध्यक्ष रमाकांत करगतला व अन्य

त्यानंतर पुढे अक्कीसागर हे यादगिर येथे रासपचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष देवानंद कोळी यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले. कर्नाटक रासपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. मा. अक्कीसागर यांच्या उपस्थितीत यादगिरी येथे राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटक राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. बैठकीत अक्कीसागर यांच्यासमोर कर्नाटक रासप पदाधिकारी यांनी आपली बाजू आणि अपेक्षा व्यक्त केली. पक्षाची विचारधारा आणि तत्व अजेंडा बद्दल माहिती नीट मिळत नसल्याची तक्रार नोंदवली. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत आपली दखल घेत नसल्याचे सांगितले. पक्ष वर्धापन दिन कार्यक्रमाबद्दल विचारपूस झाले नसल्याचे सांगितले. सर्वांचे म्हणणे ऐकून अक्कीसागर म्हणाले, सर्वापेक्षा राष्ट्र मोठे मानणाऱ्या सर्व जाती धार्मियांचा राष्ट्रीय समाज हा आहे. सर्वांनी अकोला येथे पक्ष वर्धापन दिन कार्यक्रमास येण्याचे आवाहन केले. कर्नाटक राज्य राष्ट्रीय समाज पक्ष विस्तार करण्याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी कर्नाटकात मा. सिद्धरामय्या यांच्या नंतर महादेव जानकर यांच्याकडे नेता म्हणून पाहिले जात असल्याची तशी लोकांमध्ये चर्चा असल्याचे दिसून आले. या बैठकीस सिद्धराज किन्नुर, धर्मन्ना तोंटापुर, बसवराज दोडामणी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कर्नाटक दौरा आटोपून अक्कीसागर तेलंगणा राज्य दौऱ्यावर निघाले असता, नांदूर जिल्हा विकाराबाद तेलंगणा येथील नियोजित बैठक पाऊसामुळे वेळेत होऊ शकली नाही. तेलंगणा राज्य अध्यक्ष रमाकांत करगतला सदर ठिकाणी पाऊस आणि वाहतूक ठप्पमुळे दुपारी १ वाजता येण्याऐवजी ३ : ३० वाजता यादगीर येथे पोहचले. नांदूर येथे लोक अक्कीसागर यांची वाट पाहत होते. पुढे हैदराबाद येथील बैठक ही ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. नांदूर व हैदराबाद येथील बैठक सप्टेंबर महिन्यात एस. एल. अक्कीसागर यांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले. तेलंगणा रासप कार्यकारिणीची बैठक यादगीर येथेच घेण्यात आली.

एस. एल. अक्कीसागर समवेत कर्नाटक प्रांत अध्यक्ष धर्मन्ना तोंटापुर, तेलंगणा प्रांत अध्यक्ष रमाकांत करगतला व अन्य रासप नेता.


मोहोळ विधानसभा मतदार क्षेत्रात रासपचा उमेदवार असणार

मोहोळ विधानसभा मतदार क्षेत्रात रासपचा उमेदवार असणार

मोहोळ (२६/७/२४)  : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित मिशन महाराष्ट्र राज्य विधानसभा -2024 अंतर्गत मोहोळ येथे पदाधिकारी बैठक पार पडली.  बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांनी मार्गदर्शन केले. रासपच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार क्षेत्रात निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार उभा करणार आहे. लवकरच मोहोळ येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी नियोजन बैठक घेण्यात आली.  यावेळी मोहोळ विधानसभा निरीक्षक परमेश्वर पुजारी, मोहोळ तालुका अध्यक्ष अनिल महाळनोर, मोहोळ शहराध्यक्ष बंडू देवकते, तालुका युवक अध्यक्ष संजय गाढवे, जिल्हा सचिव अभिमान काळे, जिल्हा सरचिटणीस  नागेश हजारे, ज्येष्ठ नेते भुजंग मळगे, राम लांडगे, सुनील मोरे  हनवते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

परंडा विधानसभा मतदार क्षेत्रात स्वबळावर निवडणूक लढवण्यास राष्ट्रीय समाज पक्ष तयार

परंडा विधानसभा मतदार क्षेत्रात स्वबळावर निवडणूक लढवण्यास राष्ट्रीय समाज पक्ष तयार

भूम (२६/७/२४) : धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे मत विधानसभा निरीक्षक एड. विकास पाटील यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक लढवण्याची इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवू.

भुम येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार व काशिनाथ शेवते प्रदेशाध्यक्ष, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, अश्रुबा कोळेकर साहेब - राज्य कार्यकारिणी सदस्य, प्रा. विष्णू गोरे-  मराठवाडा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार राष्ट्रिय समाज पक्षाची परांडा विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक मानली जात आहे. या बैठकीत जय मल्हार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक उद्योजक तथा नेते नानासाहेब मदने विधानसभा निवडणूक लढवण्यास ईछूक आहेत व पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी. पक्षाने उमेदवारी दिल्यास ते निवडणूक जिंकून येतील अश्या पद्धतीने सर्व पदाधिकारी यांच्या विचाराने परंडा विधानसभा निरीक्षक ॲड विकास पाटील यांच्याकडे मागणी केली. 

यावेळी एड. विकास पाटील जिल्हाध्यक्ष व निरीक्षक भूम परांडा विधानसभा यांनी वरिष्ठ यांचेकडे प्रस्ताव पाठवतो असे सांगण्यात आले. व सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पक्षाचे काम कशा पद्धतीनें पुढील काळात करायचे, कोणकोणत्या माध्यमातून पदाधिकारी रचना व कामाची विभागणी करून गावागावात वाडी वस्तीवर, शाखा विविध कार्यक्रम या माध्यमातून गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता ही संकल्पना राबवून पक्ष कशा पद्धतीनें पोहोचेल याची काळजी घेतली पाहिजे.  या बैठकीत श्रीराम हाके यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. संतोष हराळ यांची युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बैठकीस नानासाहेब मदने, पंडित मारकड जिल्हा उपाध्यक्ष, गणेश जगदाळे मराठवाडा यूवक उपाध्यक्ष, गजानन सोलंकर भूम तालुका अध्यक्ष, हनुमंत वणवे तालुका उपाध्यक्ष, नानासाहेब देशमुख परंडा तालुका उपाध्यक्ष, बंडू लोखंडे तालुका संपर्क प्रमूख भूम, एड. किशोर डोंबाळे विधि व न्याय आघाडी तालुका अध्यक्ष, रवींद्र शिंदे तालुका युवक अध्यक्ष परंडा, तानाजी महानवर तालुका यूवक अध्यक्ष भुम, पिंटू देवकते कामगार आघाडी तालुका अध्यक्ष, डॉ अविनाश हांगे, युवराज हाके, सेवक हराळ, साबळे, मा सरपंच सुरेश हाके, भागवत रंगनाथ लोखंडे, उपस्थित होते.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रासपने आजमवले बळ

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात रासपने आजमवले बळ 

अक्कलकोट (२५/७/२४ ) राष्ट्रीय समाज पक्षाच्या अक्कलकोट तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत विधानसभा निरीक्षक अजित पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. अक्कलकोट विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने आपले राजकीय बळ आजमावून पाहिले. 

बैठकीत राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट तालुका पदाधिकारी निवडी व बूथ पदाधिकारी मेळावा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट शहरात गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होईल. आणि सदर मेळाव्यानंतर अक्कलकोट विधानसभा ताकतीने लढविण्याकरिता, तारीख निश्चित करून पक्षाचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट शहरात भव्य मेळावा घेऊन, विधानसभेची घोषणा केली जाईल. त्या अनुषंगाने नियोजन पर बैठक संपन्न झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तानाजी शिंगाडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष विकास आलदर, सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुरके यांच्या सहित आजी-माजी जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक तालुकाध्यक्ष व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीत सन्मानजनक जागा न दिल्यास रासपची ताकद दाखवून देऊ : महादेव जानकर

महायुतीत सन्मानजनक जागा न दिल्यास रासपची ताकद दाखवून देऊ : महादेव जानकर 

वर्धा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा

वर्धा (२८/०७/२४) : रोजी वर्धा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आपला पक्ष महाराष्ट्रातील महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे ६० जागाची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मागणी करण्यात आली आहे. सन्मानजनक जागा नं मिळाल्यास पूर्ण २८८ जागा लढण्याची तयारी सुरू आहे. नवे मित्र शोधण्याची गरज नाही, असा खणखणीत इशारा जानकर यांनी दिला. 

श्री. जानकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाच्या गाव तिथे शाखा बांधा. फलक लावा. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत, नगर पालिका निवडणूक लढवायची असून चारही विधानसभा क्षेत्रात उमेदवार देणार आहोत. त्यासाठी सक्षम उमेदवार शोधा. आपले सर्व उमेदवार निवडून येणार नाहीत. पण महायुतीस आपली ताकद दिसेल. देशातील सात राज्यात रासपचे मोठे काम आहे. त्या राज्यात लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. सन्मानजनक मते मिळाली. महाराष्ट्रात आपले ७८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. काही जिल्ह्यात महानगर पालिका, नगर पालिका व पंचायत सदस्य आहेत. यापुढे केवळ फलकावर फोटो नकोत. ओबीसी, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय यांच्यासाठी पक्षाचे दार उघडे आहे. उपेक्षित बहुसंख्यांक राष्ट्रीय समाजाला याच पक्षात मान सन्मान मिळतो. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी अहंकार बाळगत नाही. त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पालख्या वाहणे सोडून द्या. मी स्वतः विधानसभा निवडणूक लढणार नाही. पक्षाचा उमेदवार ज्या मतदारसंघात उभा आहे, तिथे प्रचारास जाणार. एक नाही तर तीन सभा घेईल. कामाला लागा. केवळ ६० दिवस शिल्लक आहे. वेळेवर धावपळ नकोच.

रासपचे संघटक राजू गोरडे यांनी राजकीय स्थिती मांडली. लोकसंख्येच्या तुलनेत विदर्भात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे विदर्भ अध्यक्ष प्रा. तौसिफ़ शेख यांनी सांगितले. मेळाव्यात प्रा. राजेंद्र बाणमारे व अरुण लांबाडे यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. नितीन सुळे, पद्माकर कांबळे, राजू भगत, सचिन डहाके, नजीर शेख, नागोराव सेवासे, प्रताप पाटील, धनराज लोखंडे, अंजली मजिठीया, अंजली शिरपूरकर, साक्षी गिरडकर, रामेश्वर लांडे, सुभाष कडे, चंद्रशेखर भेंडे यांनी संयोजन केले. पक्षाची महिला, शेतकरी, युवा आघाडी स्थापन करण्याचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला. या मेळाव्यास राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख, अकोला जिल्हा अध्यक्ष दादाराव ढगे, अकोला जिल्हा युवक अध्यक्ष केशव मुळे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष सुरज ठाकुर, राज्य कार्यकारिणी सदस्य शिवदास अक्कलवार, विदर्भ महासचिव संजय कन्नावार, विदर्भ सचिव गणेश मानकर, वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख राजु भाऊ गोराळे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय समाज पक्षाला समाधानकारक, सन्मानजनक जागा न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष निश्चितपणे भाजपची डोकेदुखी वाढवणार, असे जनमानसात चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा एकमेव पक्ष

राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा एकमेव पक्ष


बीड (२२/७/२४) : प्रतिनिधी गुरुपौर्णिमा निमित्त पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे श्री साईबाबा मंदिर या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित राहून रासपचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी साईबाबांचा आशीर्वाद घेतला. भक्तांना मार्गदर्शन केलं.

राष्ट्रीय समाज पक्षात सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र काम करतात. त्यामुळे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा हा एकमेव पक्ष आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन पक्षाचे गाव गाड्यावर काम वाढवले. सर्वसामान्य माणसांना न्याय राष्ट्रीय समाज पक्षाने दिला. गाव ते शाखा व घर तिथे कार्यकर्ता ही मोहीम हाती घेतली. 70 टक्के पक्षाची बांधणी झाली आहे, त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवणार आहे. सर्वसामान्य लोकांचा प्रस्थापित पक्षावर कुठलाही विश्वास राहिलेला नाही. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाला ताकद द्यावी. राष्ट्रीय समाज पक्षांच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं पाहिजे. मोठे लोक आपले काम करत नाहीत, आणि आपण निवडणुका जवळ आले की त्यांचाच ऐकतो, त्यामुळे यावेळेस आपणास बदल करण्याची संधी आलेली आहे असे मत जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब मतकर यांनी कार्यकर्त्यांच्या समोर व्यक्त केले आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. 

यावेळी श्रीमती कविता राईस तालुका अध्यक्ष रासपा पाटोदा, श्रीमती सुरेखा बेद्रे तालुका उपाध्यक्ष पाटोदा, श्रीमती अनिता महारनवर तालुका सचिव पाटोदा, श्री विकास घुगे अमळनेर सर्कल प्रमुख, श्री अशोक शिंगटे अमळनेर गणप्रमुख, श्री बाळासाहेब आसराची सानप सौताडा गणप्रमुख, श्री मिसाळ गहिनीनाथ व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष परशुराम काशीद, तालुका अध्यक्ष पाटोदा आसाराम महानोर युवक तालुका अध्यक्ष पाटोदा कल्पेश भोंडवे, एड. बाळासाहेब सोलनकर, भाऊसाहेब दिंडे आष्टी तालुका अध्यक्ष, आष्टी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भिसे, पत्रकार अंकुश गवळी, संस्थेचे चालक श्री.धनवटे, तसेच सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाची विदर्भ पदाधिकारी यांची नागपूरात बैठक

राष्ट्रीय समाज पक्षाची विदर्भ पदाधिकारी यांची नागपूरात बैठक

अकोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा २१ वा वर्धापनदिन होणार साजरा

नागपूर (२०/७/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भातील पदाधिकारी यांची बैठक आमदार निवास नागपुर येथे दुपारी दोन वाजता पार पडली. राज्य कार्यकारणी सदस्य नानासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाचे बैठकीत निर्णय घेण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचा विसावा वर्धापनदिन मराठा समाज भवन येथे 29 ऑगस्ट 2024 रोजी पार पडणार आहे. वर्धापन दिनाच्या तयारीसाठी जोमाने कामास लागण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर तोसिफ शेख यांनी केले.

राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन विदर्भात होत आहे त्यामुळे त्यासाठी विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व अध्यक्ष महासचिव संयोजक संघटक यांनी प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात मिळावे घ्यावेत. राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा महात्मा फुलेवादाची आहे. या देशातील उपेक्षित राष्ट्रीय समाजाला ओबीसी, अतीमागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याची भूमिका रासपची आहे. या देशात जातीने या जनगणना करावी अशी सर्वप्रथम मागणी राष्ट्रीय समाज पक्षानेच केली होती. जनगणनेची मागणी आता सर्वच राजकीय पक्ष करत आहेत.  1931 ला ब्रिटिशांनी जनगणना केली होती. तेव्हापासून आतापर्यंत सर्वच प्रस्थापित सत्ताधारी सरकारने दुर्लक्ष केले आहे. 

2011 मध्ये देशात संयुक्त लोकशाही आघाडीचे सरकार असताना देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी देशातील प्रत्येक राज्यात जनगणना करण्यात येईल ही भूमिका संसदेमध्ये ठेवण्यात आली होती तसे अध्यादेश सुद्धा केंद्र सरकारने काढले होते पण त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री महादेव जानकर 2018 पासून सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. दिल्लीच्या जंतर-मंतरवर राष्ट्रीय समाज पक्षाचे संसद भवनाबाहेर जनगणना व्हावी, यासाठी आंदोलन पार पडले. त्यावेळी देशातील विविध राज्यातील लोकांचा सहभाग होता. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जातीनिहाय जनगणना तातडीने सुरू करण्यात ही मागणी रेठून धारावी, शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळावा, हमीभाव न देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांना व कंत्राटी कामगारांना सरकारी सेवेत कायम करावे, स्थानिक मागण्यांना जोर देण्यात यावा. रासप पक्ष वंचित समाज घटकांना, ओबीसींना न्याय देणार आहे, त्यामुळे ओबीसीसाठी रासप पक्ष पर्याय आहे, असे मत विदर्भ महसचिव संजय कन्नावर यांनी मांडले. विदर्भ संयोजकपदी प्रा. राजू गोरडे, नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दत्ता मेश्राम यांची निवड करण्यात आली. उपस्थितांचे आभार दादाराव ढगे यांनी मानले. बैठकीला विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

शेफर्ड इंडीया इंटरनॅशनलची राष्ट्रीय सभा तिरुपती येथे संपन्न

शेफर्ड इंडीया इंटरनॅशनलची राष्ट्रीय सभा तिरुपती येथे संपन्न 

तिरुपती(१७/७/२४) : आंध्रप्रदेश राज्यात सुप्रसिद्ध आध्यात्मिक शहर तिरुमला तिरुपति येथे आंध्रप्रदेश कुरुबा, कुरुमा, कुरूवर संगम तथा शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेतर्फे राष्ट्रीय सभा आयोजित केली होती. या सभेस मुख्य अतिथी म्हणून महादेव जानकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या सभेत देशभरातील मान्यवरांनी विचार मांडले. सभेसाठी केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल, फग्गन सिंह कुलस्ते सांसद मध्यप्रदेश, एच एम रेवन्ना पूर्व मंत्री कर्नाटक, आर कृष्णय्या राज्यसभा सदस्य, बास्तिपति नागराजा सांसद कुरनूल आंध्रप्रदेश, के राजशेखर बसावराज हिंतल सांसद कोप्पल कर्नाटक, सागर राईका पूर्व सांसद गुजरात, चंद्रकांत कवलेकर पूर्व उपमुख्यमंत्री गोवा राज्य, जब्बाला श्रीनिवासुलु राज्य अध्यक्ष आंध्रप्रदेश आदी मान्यवर व राज्य व देशभरातील शेफर्ड समाज घटकातील प्रतिनिधि उपस्थित होते.




देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश कार्यालयाचे उद्घघाटन

देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश कार्यालयाचे उद्घघाटन 

मुंबई (४ जुलै २४) :  महापालिका मार्ग, आझाद मैदान, फोर्ट मुंबई येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य एस. एल. अक्कीसागर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे विधीमंडळ गटनेते आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे, रासपचे राष्ट्रीय संघटक ज्येष्ट नेते गोविंदराव शुरनर, राष्ट्रीय खजिनदार मोहन माने, महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष काशीनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार होते, मात्र पुढील कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत, त्यांनी सकाळीच फोन करून शुभेच्छ्या दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येणार आहेत, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली.




याप्रसंगी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जानकर साहेब हे समाजातील वंचीतांकडे सातत्याने लढा देत आहेत. धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल सर्वांच्या पाठीशी जानकर साहेब ताकदीने उभे राहतात. समर्पित अशा प्रकारचे नेतृत्व असल्यामुळे मी त्यांना शुभेच्छ्या देण्याकरिता या ठिकाणी आलोय. मला आनंद होतोय की आज त्यांच्या कार्यालयाचे उद्घघाटन झालेय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, हरणाई उद्योग समूहाचे रणजितसिंह देशमुख व अन्य नेत्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या नवीन कार्यालयाला भेट देऊन पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांना शुभेच्छ्या दिल्या.

विदर्भातून विधानसभा निवडणुकीत रासपच्या जास्तीत जास्त जागा निवडूण आणा : महादेव जानकर

विदर्भातून विधानसभा निवडणुकीत रासपच्या जास्तीत जास्त जागा निवडूण आणा : महादेव जानकर

मेळाव्यात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, बाजूस एड. कोल्हे, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे,  कुमार सुशील पाल व अन्य.

बाळापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा 

बाळापूर (६ जुलै २०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/ राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आकोल्यातील बाळापूर येथे फुंकले. आपल्या पक्षाला या विभागातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब उपस्थित होते.

फुलेपिठावर राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील पाल, विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख, अकोला जिल्हाध्यक्ष गणेश मानकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य एड. कोल्हे, प्रदेश सदस्य प्रा. गिलवरकर, अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले पाटील, वाशिम जिल्हाध्यक्ष माधव दळवी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे, अकोला जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा किरण ताई, बुलढाणा जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा तारामती जायभाये, अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, युवक अध्यक्ष केशव मुळे, महानगर अध्यक्ष इमरान मिर्झा, बाळापूर तालुका अध्यक्ष प्रमोद काळे, मुर्तिजापुर शहर अध्यक्ष यश, बाळापूर शहर अध्यक्ष सोफयान सर आदी मान्यवर उपस्थित होते.

आता पुढच्या निवडणुकीसाठी माझी बारामतीसाठी तयारी चालली आहे. बारामती मतदारसंघातूनच पुढचा निकाल लागणार आहे. मी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो. नांदेड, सांगली, माढा, बारामती आणि परभणी या मतदारसंघातून लोकसभा लढलो. मात्र, पाचही ठिकाणी माझा पराभव झाला. पण माझं मतदान लाखांनी वाढत चाललं आहे. कमी होत नाही. माझा रनरेट वाढत चालला आहे”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

जानकर पुढं म्हणाले, “पक्षालाही (रासप) मान्यता मिळत चालली आहे. आज आपल्या पक्षाचा विधानसभेत आमदार आहे. विधानपरिषदेत आमदार आहे. विदर्भात आम्ही कमी आहोत. मात्र, विदर्भातील वर्धा आणि गडचीरोलीमध्ये काही जिल्हा परिषद सदस्य आहेत. वर्ध्यामध्ये एक जिल्हा परिषद सदस्य तर गडचीरोलीमध्ये ७ जिल्हा परिषद सदस्य आहेत. अमरावती, अकोला असेल किंवा वाशिम आणि बुलढाणा या ठिकाणी आपण शून्य आहोत. लोणारमध्ये एक नगरपालिका लढवली होती. पण तेथे यश मिळालं नाही”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

बहुसंख्येने आलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भातील पदाधिकरी कार्यकर्ते यांचे स्वागत करून महादेव जानकर साहेब यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग आकोल्यातील बाळापूर येथे फुंकले. आपल्या पक्षाला या विभागातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले व विदर्भातील प्रमुख शहरात आपण स्वतः सभा घेण्याचे बोलून दाखवले. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे आश्वासन देत, पूर्ण ताकदीने आपण आपले उमेदवार उभे करू असा निश्चय त्यांनी बोलून दाखवला. मेळाव्याचे सूत्रसंचालन विदर्भ अध्यक्ष डॉ. तौशिफ शेख यांनी केले.

ओबीसीकडे राजकीय दल नसल्याने देशाच्या व्यवस्थेत ओबीसी बेदखल : महादेव जानकर

ओबीसीकडे राजकीय दल नसल्याने देशाच्या व्यवस्थेत ओबीसी बेदखल : महादेव जानकर 

अमृतसर येथे ९ व्या अधिवेशनात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर

अमृतसर पंजाब येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन पार पडले

अमृतसर/पंजाब (७/८/२०२४) |✍️पी. आबासो : भारतात बहुसंख्यांक लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीकडे देशाच्या राजकारणात ताकदवान दल नसल्याने देशाच्या व्यवस्थेत ओबीसी बेदखल आहेत, अशी खंत व्यक्त करत 'ओबीसींना दखलपात्र बनवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे दल स्वत:च्या हिंमतिवर उभे करत असल्याचे' प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले. मंडल दिनानिमित्त अमृतसर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात महादेव जानकर बोलत होते. यावेळी मंचावर महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे, माजी खा. राजकुमार सैनी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, अशोक जिवतोडे व अन्य उपस्थित होते. 

अधिवेशनास देशभरातून उपस्थित राहिलेल्या जनतेस मंचावरून अभिवादन करताना मान्यवर.

महादेव जानकर घणाघाती भाषणात म्हणाले, ओबीसी समाजावर सर्व ठिकाणी अन्याय झालेला आहे, जोपर्यंत ओबीसीचे संघटन मजबूत होणार नाही, तोपर्यंत देशातील कोणतीही राजकीय पार्टी आपल्याला विचारणार नाही, केवळ वापरून फेकून देतील. हे लक्षात ठेवले पाहिजे. मी सांगू इच्छितो, मंडल कमिशन कोणत्या काळात सुरू झाले आणि कोणत्या काळात लागू झाले?, इथे काँग्रेसचे किरसान नाहीत. व्ही. पी सिंगचे सरकार कोणी पाडले.? ओबिसी समाजाच्या जीवावर पार्लमेंटमध्ये बिल आणल तेव्हा सरकारचे समर्थन कुणी काढले? याचा विचार झाला पाहिजे. आजही आम्ही पंजाबमध्ये ओबिसीचे काम करत आहोत, पण इथेही ओबिसीला आरक्षण नाही. आजपर्यंत भारतावर कोणाचे राज होते? हेही आम्ही ठरवलं पाहिजे.

दोस्त हो, जोपर्यंत ओबीसींचा संघटन उभे राहत नाही, मोठं होत नाही, तोपर्यंत कोणताही मोठा राजकीय पक्ष आपल्याला विचारणार नाही, कोणतीही भागीदारी देणार नाही. संख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळाली पाहिजे, अशी आपली घोषणा असायला हवी. ओबीसीकडे दल नाही, म्हणून ओबीसी बेदखल आहे. दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी होत नाही, तोपर्यंत कोणतेही काम होणार नाही. डॉ. तायवाडे सर शाहू, फुले, आंबेडकर नंतर ओबीसीला जागृत करण्याचे काम चांगल करत आहेत. त्यांच्यासारखा माणूस संसदेत पाहिजे, तरच ओबीसीचे हीत जास्त होईल. एनडियाच्या सभेत ओबीसीला संविधानात्मक दर्जा मिळाला पाहिजे. ओबीसींच्या नावाने मत मागता, मग ओबीसीला संविधानात्मक दर्जा का नाही? असे मोदींना बोललो. ७० वर्ष झाले, ओबीसीला संविधानात्मक दर्जा दिला नाही, कोणी दिला नाही? कोणी रोखला होता..? आम्ही तर रोखला नाही? रोखणारे कोण होते आणि हटवणारे कोण होते याचा विचार आम्ही केला पाहिजे? 

आम्ही कोणत्याही पक्षाचा नाही. ओबीसी पक्ष घेऊन देशभर उभारत आहे. मी ओबीसी समाजातून येत आहे. काँग्रेस, भाजपचा नाही, हे सांगण्यासाठी आलो आहे. ओबीसी चे आमदार खासदार किती आहेत? न्याय पालिकेत काय अवस्था आहे. ६०% असुन सुध्दा आपण दुसऱ्याकडे पदाची भिक मागताय. मागून काही मिळणार नाही, स्वत: हिसकावून घ्यायची तयारी करावी लागेल. कपडा, घर, रोजगार कोणीही देईल, पण राजसत्ता कोणी देणार नाही, राजपाट घ्यायचा असेल तर स्वबळावर मिळवा, असे गुरू गोविंद सिंगांनी सांगितले आहे. आमचे आयएस, आयपीएस किती आहेत? ओबीसीचे मुख्यमंत्री बनतो, मंत्री बनतो,पण कुणाचा तरी बाहुला बनतो. ओबीसीचे मुलगा, मुलगी प्रत्येक क्षेत्रात पुढे येणार नाही, तोपर्यंत तुमचे ऐकले जाणार नाही. एससी, एसटी आमचे भाऊ आहेत, त्यांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत, पण ओबीसींना आजपर्यंत का मिळाले नाही, याचा विचार करावा. आम्ही प्रथम ओबीसी आहोत. जिथे बोलवा तिथे आम्ही येऊ. या देशावर ओबिसिंचे राज आले पाहिजे. आपल्याला देशाचे तकदीर बदलायचे आहे. जेव्हा आम्ही सत्तेत बसू तेव्हा महात्मा फुले, सावित्रीबाईं फुले यांना भारतरत्न देऊ शकू. शासन, प्रशासन, न्यायपालिका, प्रसार माध्यमांत सहभाग वाढला पाहिजे. क्रिमीलेयर हटवले पाहिजे. जोपर्यंत तुमचा मुलगा देशात पंतप्रधानाच्या खुर्चीत बसणार नाही, तोपर्यंत हे होणार नाही. आरएसएस काम करते म्हणून सत्ता येते. ओबीसीनी मिशनरी बनून काम केले पाहिजे.

Wednesday, August 21, 2024

रासप नेते एस. एल. अक्कीसागर उद्या तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर

रासप नेते एस. एल. अक्कीसागर उद्या तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर 

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर हे उद्या दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराव शूरनर यांनी दिली आहे. कर्नाटक व तेलंगणा राज्यात विविध बैठका राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या आहेत. 

दिनांक 19 ऑगस्ट रोजी कर्नाटकातील बेळगाव, धारवाड जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी/कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन सायंकाळी बेंगलोरच्या दिशेने रवाना झाले असल्याबाबत यशवंत नायकशी बोलताना भ्रणध्वनीवरून श्री. अक्कीसागर यांनी कळवले आहे. 20 ऑगस्ट रोजी बेंगलोर येथे नियोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर कल्याण कर्नाटकमध्ये यादगीर जिल्ह्यात दिनांक 21 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक होणार आहे. तसेच उद्या दिनांक (22 ऑगस्ट) रोजी सकाळी तेलंगणा राज्यात विकाराबाद जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक तंदूर शहरात नेहरूगंज  येथे दुपारी ३ : ३० वाजता होईल व पुढे हैदराबाद येथे तेलंगणा राज्य राष्ट्रीय समाज पक्षाची महत्वपूर्ण बैठक होईल. तेलंगणा प्रांत अध्यक्ष रमाकांत करगतला हे श्री. अक्कीसागर साहेब यांच्या समवेत तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर राहतील.

Tuesday, August 13, 2024

राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शरदभाऊ दडस यांचा आज वाढदिवस

राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शरदभाऊ दडस यांचा आज वाढदिवस


एकेकाळी कळंबोली नवी मुंबईत रासपतर्फे शिक्षकांचा गुणगौरव करत शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याचा घणाघात करुन शरद दडस यांनी शिक्षण सम्राटांना ठणकावले होते. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची फार मोठी हेळसांड झाली. सर्वसामान्य कुटुंबातील पालकांची 'फी'च्या नावाखाली पिळवणूक सुरू होती, याविरुद्ध सर्व राजकीय पक्ष गप्प होते, मात्र रासपच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शरद दडस यांनी पालकांची बाजू घेऊन शिक्षणातील बाजारू संस्थांना चांगलेच सुनावले होते. विद्यार्थी प्रवेश प्रकियातील अडथळे दूर करावेत, शासकीय योजनातील जाचक अटी रद्द व्हावेत यासाठी शरद दडस यांनी शासन प्रशासन दरबारी निवेदने, मोर्चे, आंदोलन, निदर्शने केली आहेत. महज्योती, सारथी, बारटी संस्थानी जास्तीत जास्त मदत ही दीन दुबळ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याना करावी यासाठी शरद दडस यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी प्रवासाची मोफत सवलत ही सर्वच स्तरातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना राज्य शासनाने सुरू करावी, असा मानस शरद दडस यांनी यशवंत नायक जवळ व्यक्त केला होता. 

आज घडीला बालकांच्या मोफत शिक्षण हक्क कायद्याच्या तीनतेरा वाजल्या आहेत. शासन स्तरावर आरटीईतून प्रवेश झालेल्या बालकांना अद्याप शाळेत प्रत्यक्ष प्रवेश मिळालेले नाहीत. 11 वी सह तंत्र शिक्षणातील इंजियरींग, डिप्लोमाचे, बीएडचे विलंबाने प्रवेश चालू आहेत. वेगवेगळ्या विद्यापीठातील परिक्षा वेळेवर होत नाहीत. दहावीत कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याना प्रवेश जागा शिल्लक नसल्याची भीती दाखवून मनमानी पद्धतीने अवाच्च्या सव्वा फी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांकडून सांगितली जात आहे. नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत सामाजिक आरक्षनाची भागीदारी निश्चित करणाऱ्या बिंदू नामावलीत भटक्या विमुक्त जमातींच्या जागा शून्य दाखवण्याचे महापाप राज्यातील शिक्षण संस्थानी केलेले आहे, नोकर भरतीत मागासर्गीयांच्या जागा कमी दाखवल्या आहेत, याविरुद्ध एकूणच राष्ट्रीय समाज पक्षाने लक्ष घालने आवश्यक बनले आहे. यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्ष ताकद पणाला लावून राष्ट्रीय समाजाचे प्रश्न मार्गी लावतील अशी आशा बाळगुया. शिक्षण वाचले तर राष्ट्र वाचेल. शिक्षण वाचवन्यासाठी बाजारू सम्राटांना लगाम लावण्याचे काम शरद दडस यांची राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी करेल, असा आशावाद वाटतो. 

राष्ट्रीय समाज पक्षाचा शिस्टाचार पाळणारा शिस्त प्रिय कार्यकर्ता ते विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष असा शरद दडस यांचा आजवरचा राजकीय प्रवास सुरू आहे, त्यांचे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक आयुष्य फुलत जाऊन सर्वच क्षेत्रात भरभराटी व्हावी यासाठी यशवंत नायक परिवाराकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!

- शेफर्ड ए. पी, मुंबई.

8- 8-2024

Friday, August 9, 2024

स्व.तात्याबा भैरु शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम पार

स्व.तात्याबा भैरु शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी शेळके वस्ती येथे कै. तात्याबा भैरू शेळके यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह. भ. प. गणेश महाराज डांगे यांचे सुश्राव्य असे कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. गणेश महाराज यांचे स्व. तात्याबा शेळके यांच्याविषयी आठवणी ऐकताना उपस्थित ग्रामस्थ भावनाविवश झाले. माता भगिनिंचे डोळे पाणावले. ग्रामस्थ, नातेवाईक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहिली. स्व. तात्याबा भैरू शेळके यांनी आपल्या कुटुंबावर सात्विक संस्कार दिले. शेळकेमामा यांचे सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात स्थान मोठे होते. जोतिबा देवाचे पुजारी होते. ज्या पित्यास कन्यारत्न आहेत ते पिता पुण्यवान आहेत. महाराजांनी शेळकेमामा यांच्या दोन्ही मुलांचे विशेष असे आभार मानले.  कौटुंबिक जीवनात वडिलांच्या पशच्यात आठवणीशिवाय काहीच उरत नाही. दुपारी 12 वाजून 05 मिनिटांनी पुष्पांजली वाहिली.


Thursday, August 1, 2024

महापराक्रमी पल्लव साम्राज्य स्मरणार्थ लवकरच तमिळनाडू राज्यात रासपची राज्यव्यापी रॅली

महापराक्रमी पल्लव साम्राज्य स्मरणार्थ लवकरच तमिळनाडू राज्यात रासपची राज्यव्यापी रॅली 

Speaking at the Tamil Nadu state executive meeting, Rashtriya Samaj Party founder national president Mahadev Jankar, flanked by former national president S. L Akkisagar.


राष्ट्रीय समाज पक्ष तमिळनाडू राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न 

चेन्नई (२५/५/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, भुतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत तमिळनाडू राष्ट्रीय समाज पक्ष राज्य कार्यकारिणीची बैठक चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. हॉटेल आबू पॅलेस आणि तामिळनाडू राज्य रासपा कार्यालय येथे या बैठकी पार पडल्या . राष्ट्रीय समाज पक्षाचा उल्लेख स्थानिक तमिळ भाषेत राष्ट्रीय समाज कच्छी असा बॅनरवर होता. राज्य कार्यकरणीची बैठक उत्साहात पार पडली.

रासपचे सर्वोच्च राष्ट्रीय नेते महादेव जानकर मार्गदर्शन करताना म्हणाले, तमिळनाडू राज्यात ३२ जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटन मजबूत झाले पाहिजे. राजकीय पक्षाचे संघटनात्मक काम करताना सर्व समाजाला सामील केले पाहिजे. राज्यातील २३४ विधानसभा क्षेत्रात पक्षाची ताकद निर्माण करावी. किमान २५ आमदार निवडून आणावेत. उपेक्षित राष्ट्रीय समाजाला लोकशाही भारतात सत्तेची फळे चाखायची असतील तर महिला आघाडी, युवक आघाडी, विद्यार्थी आघाडीचे संघटन वाढवले पाहिजे आणि सत्ता मिळवावी लागेल.

Rashtriya Samaj Party former national president SL Akkisagar guided the Tamil Nadu state executive meeting.

भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर म्हणाले, तमिळनाडू राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष रजिस्टर्ड आहे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एक महिला व एक पुरुष उमेदवार पक्षातर्फे रणागंणात लढले. तमिळनाडू राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा ग्राफ वाढत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. महापराकार्मी पल्लव साम्राज्य स्मरणार्थ लवकरच राज्यव्यापी रॅली आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पल्लव राज्य स्मृती स्थळास श्री.अक्कीसागर आणि सहकार्यानी भेट दिली. या सर्वप्रसंगी राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय सचिव एम. जी. मानीशंकर, तमिळनाडू राज्य अध्यक्ष डी. एन. राजा, युवक आघाडी अध्यक्ष रासपचे विधानसभेचे उमेदवार इंजी. गौतम सेंगुवून, उधगाई  सेंगुवून व अन्य उपस्थित होते.

आगामी काळात मोठ्या ताकदीने राष्ट्रीय समाज पक्ष उभारणार : महादेव जानकर

आगामी काळात मोठ्या ताकदीने राष्ट्रीय समाज पक्ष उभारणार : महादेव जानकर 

मार्गदर्शन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर व मंचावर अन्य रासप नेते मान्यवर.

दादर येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी, राज्य कार्यकारणी, मुंबई प्रदेश पदाधिकारी यांची संयुक्त बैठक 

मुंबई (३०/०६/२०२४) : देशातील डावे, उजवे, सर्व प्रकारचे राजकारण अनुभवले असून, आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष मोठ्या ताकदीने उभारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दादर येथे बोलताना केले. जानकर पुढे म्हणाले, मोठी धनशक्ती असणाऱ्या लोकांनी देखील आपले राजकीय पक्ष गुंडाळले आहेत, आपण मात्र सर्वसामान्य राष्ट्रीय समाजाला सोबत घेऊन लढत राहणार आहे. मान्यवर कांशीराम यांना पराजित करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील जिल्हाध्यक्षाला त्यांच्या विरोधात उभे करत होते, मात्र कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात स्वत:चे सरकार बनवलेच, असा उच्चार करून जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष देखील सत्ताधारी पक्ष बनवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील महायुती आघाडीचे राजकारणातील मोठमोठे गौप्यस्फोट देखील जानकर यांनी केले. आगामी काळात पक्षाच्या वाटचालीबद्दल भाष्य करताना महादेव जानकर यांनी आपले मन मोकळं केले. 

राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी यांच्या समवेत राज्य कार्यकारणीची बैठक दादर मुंबई येथे विविध विषयावर रविवारी आयोजित केली होती. बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारणी पदाधिकारी यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत राज्य कार्यकारणीतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन, गैरहजर पदाधिकारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच निष्क्रिय पदाधिकारी यांना पदमुक्त करण्याचे निवेदन राष्ट्रीय कार्यकारणी समोर ठेवण्यात आले. तसेच विदर्भातील नवीन पदाधिकारी यांना राज्य कार्यकारणीवर नियुक्ती करण्यात आले. विदर्भ उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे अध्यक्ष तोसिफ शेख यांची विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी वर्णी लागली. त्यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले. तसेच उर्वरित पदाधिकारी यांनाही नियुक्तीपत्रे देण्यात आली. 

राज्य मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी राज्यातील विभागीय अध्यक्ष यांना आपापल्या विभागातील जिल्ह्यातील कार्यकारणी याद्या प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे जमा करण्यास सांगितले व तसेच विभागाचा आढावा देण्यास सांगितले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एड. संजय माने पाटील यांनी त्यांच्या विभागातील जिल्हा अध्यक्ष व कार्यकारणी यांचा आढावा देऊन विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची ताकद असणाऱ्या मतदारसंघाची पक्षाकडे नावे सुचवली. पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष अजित पाटील यांनी युवक आघाडीचा आढावा दिला, तसेच अपूर्ण कार्यकारणी याद्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. खानदेश उत्तर महाराष्ट्र यांच्या तर्फे महिला आघाडीच्या सौ. अनिताताई वाघ यांनी नंदुरबार जिल्ह्याचा महिला आघाडीचा आढावा दिला. मुंबई विभागाचा आढावा मुंबई प्रदेश महासचिव संतोष ढवळे- धनवीकर यांनी आढावा सादर केला. कोकण, मराठवाडा या विभागातील राज्य व राष्ट्रीय कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित होते, मात्र विभागाचे अध्यक्ष गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी संयुक्त चाललेल्या बैठकीस उपस्थित राहून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शेवटच्या रांगेतील खुर्चीवर बसून सर्व पदाधिकारी यांचे मत जाणून घेतले. 'लोकसभा निवडणुकीतील परिणामांची चर्चा करून राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील यांनी राज्यातील कोणताही ग्रामीण क्षेत्रातील विधानसभा मतदारसंचाची बांधणी करू असे सांगितले.' यशाला अनेकजण धनी असतात, मात्र अपयाशाला कोणीही नसतात असे सांगून परभणी लोकसभेतील झालेल्या सर्व परिणामांची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच देशातील कोणत्याही एका मतदारसंघाची आपण जबाबदारी घेऊन तो संघटन बांधणी करणार असल्याचे जाहीर केले. तसेच सुकाणू समिती नेमण्याविषयी बैठकीत भाष्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन बैठकीत मार्गदर्शन केले. निष्क्रिय पदाधिकारी यांना तत्काळ पदावरून हटविण्याच्या सक्त सूचना केंद्रीय कार्यकारणी व राज्य कार्यकारणीस दिल्या. प्रदेशाध्यक्ष व महासचिव यांना पक्षाचा शिष्टाचार पाळण्याविषयी सांगितले. काम करण्यास उत्सुक असणाऱ्यानाच पद द्यावे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक नेमण्याचे निर्देश यावेळी दिले.

राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापनदिन विदर्भात साजरा करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. दिनांक ४ जुलैला मुंबईत राष्ट्रीय समाज पक्षाचे शासकीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. सदर बैठकीचे व्यवस्थापन मुंबई प्रदेश अध्यक्ष विठ्ठल यमकर व मुंबई प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांनी केले.

छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! कारण..

 छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! *कारण;*
*स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - गेल्यानंतर) आपल्या समाजाचे, बहूजन राष्ट्रीय समाजाचे काय स्थान असेल, यामुळे परेशान असणारा छ. शाहू राजा हा एकमेव राजा आहे.*



छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! कारण स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - गेल्यानंतर) आपल्या समाजाचे, बहूजन राष्ट्रीय समाजाचे काय स्थान असेल, यामुळे परेशान असणारा छ. शाहू राजा हा एकमेव राजा आहे.

इंदूरचे होळकर, ग्वालेरचे शिंदे, काश्मिरचे हरीसिंग, हैद्राबादचे निजाम वगैरे राजे - नवाब वगैरे आपल्या संस्थानाचा- - तनख्याचा विचार करीत होते. परंतु 'स्व' समाजाच्या किंबहूना 'स्व' राज्याच्या प्रश्नावर काहीसे उदासिन होते. असा इतिहास असताना 'शाहू राजा'चे वैशिष्ट मात्र आगळे-वेगळे आहे. 'स्व' संस्थानाच्या स्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात ' (ब्रिटीश गेल्यानंतर) 'स्व' समाजाचे, बहूजन राष्ट्रीय समाजाचे दलीत, शोषित, उपेक्षित दुर्लक्षित समाजाचे काय स्थान असेल यामुळे परेशान असणारा एकमेव भारतीय राजा म्हणजे छ. शाहू राजा होय. 


यशवंतराव घाटगे अर्थात छत्रपती शाहू महाराजा यांच्या जन्म राजा 26 जुन 1874 रोजी अप्पासाहेब घाटगे यांच्या पोटी कागल - कोल्हापूर येथे झाला. कोल्हापूर संस्थानचे छत्रपती 4थे शिवाजी यांची विधवा पत्नी आनंदीबाई यांनी मार्च 1884 मध्ये 

यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले. 2 एप्रिल 1894 रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे राज्यरोहण झाले, ते कोल्हापूरचे छत्रपती झाले. आपल्या वाढदिवसाच्यानिमित्त 26 जून 1894 रोजी छत्रपती शाहू राजा यांनी एक ऐतेहासिक जाहीरनामा काढला, तोच या देशातील मागासलेल्या समुदायांसाठी -  जाती जमाती धर्म अलुतेदार बलुतेदार वर्गासाठी (50% टक्केचा ब्राह्मण शेणवी, प्रभू आणि ज्यू पारसी वगळून ) पहिला आरक्षण जाहीरनामा - कायदा जाहीर केला. अंमलबजावणी केली. ब्रिटशकाळी भारताचे स्वातंत्र्य आणि सत्तेत सामाजिक भागीदारी हे दोन सर्वात मोठे मुद्दे होते. त्याकाळी छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक भागीदारी देणारा देशातील पहिला कायदा क्रांतिकारी ठरतो.  आज महाराष्ट्र आणि देशात सामाजिक आरक्षण मुद्दा किती महत्वाचा आणि गंभीर बनला आहे, हे मराठा ओबीसी या आरक्षण मुद्द्यावरून स्पष्ट झाले आहे. छत्रपती शाहू महाराज यांची 26 जून 2024 रोजी 150 वी जयंती आहे. हा दिवस एखाद्या सणासारखा सारखा साजरा करा, स्वतंत्र भारतातील एससी/ एसटी प्रतिनिधित्व राज्यघटनेद्वारे लागू करणारे आद्य शाहू राजा असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा वजा शब्द फुले माला अर्पण करीत आहोत.


महात्मा जोतीराव फूले पारतंत्र्यात 'स्व' समाजाचे 'स्थान' निर्माण करीत होते.  डॉ. भिमराव आंबेडकर ब्रिटीश काळात 'स्व' समाजाचे स्थान निर्माण काळात 'स्व' समाजाचे स्थान निर्माण करीत होते. ब्रिटीश गेल्यानंतर निर्माण झालेल्या 'सत्ता' पोकळीत सत्ता स्थानावर आपल्या समाजासाठी 'स्थान' आरक्षित करीत होते. त्यासाठी ब्रिटीश ब्राह्मण-बनीया आणि आपल्या अज्ञान आणि अलायक समाजाशी संघर्ष करीत होते. त्याचवेळी जनाब मोहमद अली जीना कार्यरत होते. 'स्व' समाजासाठी मुसलमानांसाठी केवळ आरक्षित स्थान नव्हे "पाकिस्तान' मागत होते. नव्हे त्यांनी पाकीस्तान निर्माण केले मिळविले. याच वेळेस तमाम हिंदू समाजासाठी भारतीय समाजासाठी,  मराठा- धनगर - ओबीसी - आदीवासी - दलित - अल्प संख्या समाजासाठी 'स्व' समाजासाठी अर्थात ब्राम्हण बनीया बड़ा - जमीनदार (नव-क्षत्रिय) वर्गासाठी 'स्व' राज मिळवीत आहोत असा दावा गांधी-नेहरू-पटेल करीत होते.

     परंतु गेल्या ५० वर्षाचा इतिहास काय सांगतो. तमाम हिंदू समाजासाठी भारतीय स्वातंत्र्यातून 'स्व' राज्य मिळाले का? 'स्व' राज्यातून राजसत्ता (राजकीय) अर्थसत्ता (आर्थिक) ज्ञानसत्ता शैक्षणिक आणि प्रतिष्ठा धार्मिक, सांस्कृतीक, सामाजिक मिळाली का?

     हिंदू समाजांतर्गत प्रगतिची 'समान' संधी मिळाली का? समाजाची सम-समान प्रगती झाली का ? याचे उत्तर केवळ नाही असेच येते. किंबहूना हिंदू समाजांतर्गत स्वातंत्र्यापूर्वी असलेली विषमता, किमान शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकिय (शासकीय प्रशासकीय) कमी झाली कि वाढली ? या प्रश्नाचे उत्तरं काय येते ?

     वरवर ठोकळपणे भारतीय समाजाच्या प्रगतीचे कोष्टक स्पष्टपणे "विषमताच स्पष्ट करते. नीट पाहील्यास गरीब आणि श्रीमंत यामध्ये फार मोठी तफावत दिसते. दारिद्र्य रेषेखाली जाणाऱ्याची संख्या 'स्व' राज्यात वाढलीच आहे. याचा अर्थ छ. शाहू महाराजांनी जी भीती शंका व्यक्त केली होती (२०व्या शतकाच्या सुरुवातीला) ती भीती शंका खरी ठरली.

     शाहू म्हणाले होते, "मी स्वराज्याच्या (स्वातंत्र्याच्या) विरोधी कदापि नाही. परंतु माझा समाज माझा मागासवर्गीय समाज (मराठा, धनगर, माळी, महार, मांग आदि) शैक्षणिक आणि राजकिय पातळीवर जागृत होत नाही. तोपर्यंत लोकमान्य टिळकांचे "स्वराज्य'" फक्त उच्च वर्णीयासाठी सिमीत राहील. जो पर्यंत माझा समाज शिकून सवरून शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या जागृत होत नाही तो पर्यंत स्वराज्याचे माझ्या समाजाच्या लेखी महत्व राहत नाही.

     तसेच ब्राम्हण, बनिया, ठाकूर विरहीत हिंदू समाजाने ज्यांच्यावर "विश्वास ठेवला ते विश्वासास पात्र ठरले नाहीत. गेल्या ५० वर्षात जे लोक प्रतिनिधी निवडून गेले, जे पक्ष सत्ताधारी होते, जे प्रशासनात नेमले गेले ते सर्व भारतीय समाजासाठी हिंदू समाजासाठी "विश्वास घातकी' असे नेतृत्व (राजकीय व बौध्दीक ) ठरल्याचे सिध्द होते. छत्रपती शिवाजी वारसास शाहू राजा यांनां शूद्र ठरविणारे वेदोक्त - पुरणोक्त प्रकरण, शाहू - टिळक संघर्ष आणि क्षात्र जगतगुरूची स्थापना हा केवळ थरारक इतिहास ठरतो. आरक्षण धोरणामुळे शिक्षण आणि त्यातून शासन प्रशासनात बहुजन राष्ट्रीय समाजाचा वाढता सहभाग पाहून शाहू यांना हिनवत लोकमान्य? बाल गंगाधर टिळक अथणी बेळगाव येथे म्हणाले, पार्लमेंटमध्ये जाऊन कुणाब्यांना काय नांगर चालवायचा आहे काय? कानपुर उत्तर प्रदेश येथे कुर्मी - कुणबी महासभेने  छत्रपती शाहू महाराज यांना सन्मानाने राजर्षी हीं पदवी देऊन गौरव केला होता. काँग्रेस प्रणित रानडे, टिळक, गोखले, केळकर यांनी शाहू महाराज यांचा प्रखर विरीध केला. गांधी गुरू गोखले यांनी शाहूना काँग्रेस प्रवेशाची ऑफर हीं केली होती. परंतु राजांनी ती स्पष्ट नाकारली. महात्मा फुले यांचा सार्वजनिक परिवर्तनाचा प्रबोधनाचा वैचारिक वारसा छत्रपती शाहू महाराज यांनी चालवीला. आपल्या राज्यात राबविला. 50% आरक्षणसहित सर्वाना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण कायदा दुसरा क्रांतकारक निर्णय होता. बालविवाह बंदी, विधवा विवाह, आंतर्जातीय -धर्मीय विवाह संमती कायदा, अप्रूश्यता प्रतिबंधक कायदा सारखे क्रांतिकारी कायदे शाहू राजांनी राबविले. शाळा, विद्यालय, आश्रमशाळा उभारल्या.  प्रबोधनकारी साहित्य निर्माणासाठी निधी पुरवीला. डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्मित मुकनायक या पत्रकाला 2000 रुपयाची देणगी दिली. (त्याकाळी खूप मोठी रक्कम. प्रबोधबाकर ठाकरे सहित अनेक ग्रंथाकारांना साहाय्य केले ) एवढेच नाहीतर माणगांव परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना येथून पुढे तुमचा आमचा पुढारी घोषित केले. राज्य घटनेतील सहभागातून हे नेतृत्व सिद्ध झाले. फुले - शाहू यांना - त्यांच्या खऱ्या विचाराला महाराष्ट्र आणि त्यांचे पुढारी आज विसरले आहेत, म्हणून सामाजिक आणि राजकीय गोंधळ चालू आहे. फुले - शाहू - आंबेडकर यांना - त्यांच्या खऱ्या विचाराला समजून उमजून पुढे चालणे, हीच या महापुरुषांना श्रद्धांजली ठरेलं.


शब्दांकन : मल्हारभारती अर्थात एस. एल. अक्कीसागर

(तब्बल 24 वर्षापूर्वी आपल्या यशवंत नायक : मार्च-एप्रिल 2000 या अंकात प्रस्तुत लेख पहिल्यांदा प्रकाशित झाला होता.  त्याचा पुनः संपादित - सुधारित लेख आम्ही या अंकातून पुन्हा प्रकाशित करीत आहोत. 26 जुन 2024 छत्रपती शाहू राजा 150 वी जयंती निमित्त यशवंत नायक परिवार तर्फे शुभेच्छ्या..!)

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...