समाजसेवी संस्था, अधिकारी वर्गाची पुकळेवाडीच्या दिशेने लागली रीघ...!
श्री. शंभू महादेवाच्या डोंगर रागांनी तयार झालेल्या नैसर्गिक द्रोणीत वसलेल्या पुकळेवाडी ता- माण या छोटेश्या गांवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून समाजसेवी संस्थाचे पदाधिकारी, शासन, प्रशासनातील अधिकारी वर्गाची अक्षरशा रीघ लागली आहे. पुकळेवाडीच्या मातीत श्रमदान करण्यासाठी हाजारो हात राबताहेत . त्या हाजारों बंधू भगिनींच्या हातात हात घालून काम करण्यासाठी, माणदेशाची भोगोलिक ओळख 'पाणीदार माणदेश' करण्यासाठी दिनांक १३ मे २०१८ रोजी पुकळेवाडी येथे रीघ लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सर्वसाधारणतः रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस असतो पण, सतत कष्ट करणे, संघर्षमय जीवन जगणे हा माणदेशी माणसासाठी नित्याचेच. पुकळेवाडी असो किंवा माणदेशातील अन्य गावे असोत यांना कसली आलीया ....सुट्टी ? विशेष म्हणजे सुट्टीचा दिवस हा पुकळेवाडी गावाचा महाश्रमदानाचा दिवस असतो. सुट्टीनिमीत्त महाश्रमदानाचे औचीत्य साधून नेरूळ (नवी मुंबई) येथील श्री सदगुरु नागरी सहकारी पतसंस्था मुंबई यांच्याकडून पुकळेवाडी ता- माण येथे श्रमकरी, गांवकरी यांच्यासाठी भोजनाचे आयोजन केले होते. या भोजनाच्या तयारीची धावपळ चालू असतानाच पुकळेवाडीच्या मातीला आणि गावक-यांना वंदन करण्यासाठी लोधावडे ता-माण गावचे सुपुत्र तथा विद्यमान पुणे उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख साहेब व त्यांच्या समवेत वैभव मोरे, नथुराम जाधव, स्वप्नील काटकर, बंटी गायकवाड, ऋषी जगताप, अक्षय जाधव, गणेश माने व टिम गावात पोहचले आणि श्रमदानात सहभागी झाले. तसेच तालुक्यात प्रसिद्ध पुकळेवाडी जि/प शाळेस भेट देऊन ग्रामस्थ, शिक्षकांचे पुणे उपजिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी कौतुक केले.
क्षणभर जातो न जातो तोच 'म्हसवड मेडीकल आसोसिएशनचे सर्व डाॅक्टर व त्यांच्या समवेत रासपा माण खटाव विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे' श्रमदानासाठी पुकळेवाडीत दाखल झाले. 'सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मेहेर गांधी, म्हसवड शहर अध्यक्ष राजेश शहा, सत्यजीत दोशी (अकलूज) व त्यांच्या समवेत सेवा दलाचे युवक उपस्थित झाले.
श्रमदानात आघाडीवर असलेल्या पुकळेवाडी गावाचे कौतुक करण्यासाठी माणदेशाच्या भुमीकन्या माण तालुका तहसिलदार तथा नुकतीच उपजिल्हाधिकारीपदी बढती मिळालेल्या सुरेखाताई माने, पुकळेवाडी गावाला सॅल्युट करण्यासाठी, कोणत्याही परिस्थीत पुकळेवाडी गावांत 'वाटर कप' आणायचाचं असा आत्मविश्वास बळगणारे 'पाणी फाॅडेंशन'चे समन्वयक डाँ. प्रदीप पोळ हेही आवर्जुन उपस्थित राहीले. पाठोपाठ माणदेशाचा कायमचाच दुष्काळ संपवण्याचा संकल्प करून माण तालुक्यासाठी १४० यांत्रिक मशिनी व पुकळेवाडी गांवासाठी २ मशीनी उपलब्ध करून देणारे भारतीय जैन संघटनेचे माण तालुका अध्यक्ष भरतेश गांधी व संघटनेचे पदाधिकारी /कार्यकर्ते यांनी पुकळेवाडी भूमीत प्रवेश केला.
एक दिवस अगोदरच मुंबईहून पुकळेवाडीच्या दिशेने रवाना झालेले श्री सदगुरू नागरी सहकारी पतसंस्थचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र कलाकर संघाचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र लिगाडे, उपाध्यक्ष हणमंत गरड, सचिव महादेव बाबा पुकळे(मास्तर), बाबुराव विठोबा पुकळे, खजिनदार गणेश मोटे, व्यवस्थापक रामचंद्र राजाराम पुकळे, संचालक नामदेव मोहीते, मनिषा लिगाडे, साक्षी लिगाडे, संजय सिदरूख, महादेव आण्णा पुकळे सर हे शनिवारी मध्यरात्रीच पुकळेवाडीत दाखल झाले होते. पुकळेवाडी ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून श्री. लिगाडे परीवाराने श्रमदानात घेतलेला सहभाग हा उपस्थितांचा उत्साह वाढवणारा होता. या सर्वांचे पुकळेवाडी पाणी फाउंडेशन, ग्रामस्थांनी आगळ्यावेगळ्या स्टाईलने जोरदार स्वागत केले. दि. ८ एप्रिल पासून पुकळेवाडीच्या दिशेने सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली आहे. विशेषतः वरील सर्व मान्यवरांनी भेट देऊन पुकळेवाडी ग्रामस्थांचा उत्हास वाढवत मनोबल वाढवले. हेच मनोबल पुकळेवाडी गावाचा कायापालट करून जाणार हे मात्र ठामपणे सांगावेच लागेल.
✍ आबासो पुकळे, श्री क्षेत्र सिध्दनाथ गड, पुकळेवाडी.
दिनांक- १४ मे २०१८.

'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
ReplyDeleteकृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-आबासो पुकळे