"क्रांतीसिंह नाना पाटील"
ज्या पंचक्रोशीत दिड दिवस शाळा शिकलेला साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी, २५ वर्ष पोलिसांना गुंगारा देऊन पोलिस रेकॉर्डवर गुन्हेगार ठरलेला परंतु मराठी मातीत जन्मलेला मराठी मुलखाचा खराखुरा न्यायाधिश बोरगांवचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर जन्माला आले त्याच क्रांतीकारी भुमित सत्यशोधक चळवळीचा अनुयायी क्रांतीसिंह नाना पाटिल नावाच भारतीय रत्न ३ ऑगस्ट १९०० रोजी जन्माला आले.
सातारा जिल्ह्यात तुफान सेनेन ब्रिटिशांच्या कायदा पायदळी तुडवत गोरगरीबांसाठी प्रति सरकारची घोषणा करून प्रति सरकारचा कारभार सुरु केला. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, सामान्य जनतेला त्वरीत न्यायदान करणार प्रति सरकारचा दबदबा भारतभर पसरला. सातारा जिल्ह्यात वडजल या गावात नाना पाटिल यांचा कार्यकर्ता तुकाराम पुकळे ऊर्फ तुक्या यांनी एका अन्याय करण्यार्र्याच्या पायात पत्र्या ठोकल्या.धुळे, माढा या भागात नाना पाटिल यांच्या पत्री सरकारचा कार्यकर्ता तुकाराम पुकळे उर्फ चेचम्या तुक्या तुफान सेनेत अग्रभागी असायचा.सावकारशाही, गुंडशाही, शेतकर्र्यांची पिळवणूक, टगेशाहीला चाप बसवला तो नाना पाटिल यांच्या पत्री सरकारनेच.
स्वतंत्र भारताच्या संसदेत पहिल्यांदा मराठीत भाषण करणारे खासदार नाना पाटिल होते. सातारा जिल्ह्याच्या कड्याकपारीत भारतीय स्वातंत्र्याची मशाल पेटवणारा धगधगता स्वातंत्र्य सैनिक क्रांतीसिंह नाना पाटिल यांनी एकदा दिलेला न्यायदान अंतिम असायचा. नाना पाटिल यांनी केलेला कायदा मोडायची कुणाची हिंमत होत नव्हती. सत्यशोधक पद्धतीने विवाह करावा यासाठी ते आग्रही असायचे.
सातारा जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयाला क्रांतीसिंह नाना पाटील यांच नाव देण्यात आल आहे. बहुजन समाजाला जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणणार्र्या किल्ले मच्छींन्द्रगडच्या सुपुत्रास, थोर देशभक्तास जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
- आबासो पुकळे, पुकळेवाडी ता-माण
Aug 3, 2015 ·
'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
ReplyDeleteकृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-आबासो पुकळे