"स्वातंत्र्यानंतरही पळसगाव पारतंत्र्यातच"
भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली तरी माणगाव तालुक्यातील पळसगाव खुर्द धनगरवाडी मात्र आजही पारतंत्र्यातच दुःख भोगत आहे.
२०११ पासून या गावातील ग्रामस्थांचा पाठपुरावा चालू आहे. २९ मार्च २०११ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने सदर गाव प्रकाशमय करण्याबाबत प्रकल्प मंजूर केला. तसेच सदर प्रकल्पाचे भूमिपूजन स्थानिक आमदार मा.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते दिनांक १९-११-२०१४ रोजी करण्यात आले. सदर प्रकल्प पळसगाव धनगरवाडी या गावासाठी ''मंजूर करून सुद्धा हा प्रकल्प पळसगाव धनगरवाडीला अंधारात ठेवून पुढे ३ कि.मी.अंतरावर असलेल्या व गेली ४० ते ४५ वर्षापासून विद्युत असलेल्या जोर या गावी वळविण्यात आला. या मागच्या षडयंत्र आतापर्यंत पळसगाव धनगरवाडीच्या लोकांना कळू शकले नाही. परंतु ही पळसगाव धनगरवाडी हे गाव संपूर्ण मागासवर्गीय असल्यामुळेच याठिकाणी हा संपूर्ण छळ मोठ्या प्रमाणात चालला आहे. एवढे मात्र नक्की.
७ जुलै २०१५ रोजी माणगांव येथे झालेल्या आमसभेमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकार्र्यानी आश्वासन दिले होते की, येणार्र्या सप्टेंबर २०१५ च्या गणेश उत्सवाच्या आत तुमचे गाव संपूर्ण प्रकाशमय करून देण्यास आम्ही कटिबधद आहोत. गणेश उत्सवाला एक महीना उरला तरी कोणतीही हालचाल MSEB कडून पळसगाव धनगरवाडीत निदर्शनास येत नाही.
...........................................
इंदापूर येथील पत्रकार धनजंय पार्टे यांनी ३० जानेवारी २०११ रोजी आमदार भरत गोगावले यांच्याशी संर्पक साधला असता त्यावेळीची प्रतिक्रिया
"दूर डोंगरात असेलेले कमी लोकवस्तीचे हे गाव तसे संर्पकात नव्हते. मात्र, याविषयी आवाज उठविल्यानंतर या गावाचे प्रश्न ध्यानी आले आहेत. उद्याच शिष्टमंडळासह आपण भेट देणार असून गावकर्र्याशी चर्चा करणार आहोत. "-आमदार भरत गोगावले, ३०-०१-२०१५
............................................
सदर धनगरवाडीतील शिव मल्हार मंडळाचे अध्यक्ष बाळाराम ढवळे व सचिव संतोष ढवळे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार. महादेव जानकर साहेब यांना सदरचे निवेदन २९ जुलै २०१५ रोजी दिले. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मा.भगवान ढेबे साहेब यांना निवेदन दिले. राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष भगवान ढेबे साहेब यांनी सदर निवेदनाची दखल घेत पळसगाव धनगरवाडीत जाऊन प्रत्यक्ष जाउन भेट घेतली. भगवान ढेबे साहेब यांनी 1 आॅगस्ट रोजी अधिक्षक अंभियंता पेण मंडल पेण यांची भेट घेत कार्यकारी अभियंता रोहा विभाग, रोहा यांना तात्काळ अधिक्षक अभियंता पेण मंडल पेण यांच्या दालनात बोलावून तातडीची बैठक घेण्यात आली. पळसगाव धनगरवाडीला ६९ वर्ष अंधारात ठेवण्याच्या षडयंत्राचा समाचार घेतला. तदनंतर अधिक्षक अभियंता, पेण यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समिती, रायगड यांच्याकडे सन २०१५-१६ अंतर्गत अंदाज पत्रकासहीत अहवाल पाठवून पळसगाव धनगरवाडीतील सदर कामांसाठी जिल्हा नियोजन व विकास समिती २०१५-१६ अंतर्गत प्रशासकीय मंजुरी व निधी मंजुरीसाठी अंदाज पत्रकासह ७ लाख ९५ हजार निधी मंजूर करून वितरीत होणेकामी दिनांक १ ऑगस्ट २०१५ रोजी जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती रायगड, अलिबाग यांच्याकडे शिफारस केली. तसेच २९ मार्च २०११ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड रोहा-रायगड यांचे कार्यकारी अंभियता यांच्या सहीने माणगाव उपविभाग अंतर्गत पळसगाव धनगरवाडी या गावासाठी २४,६३,४५० इतका निधी मंजूर झाला त्यानुसार स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत मोठ्या-थाटामाटात १९ -११- २०१४ रोजी भूमिपूजन उद्घघाटन सोहळा संपन्न झाला आणि विद्युत मंडळाच्या कामास सुरुवात झाली. परंतु पळसगाव धनगरवाडीच्या गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन धनगरवाडीला जाणूनबूजून तशीच अंधारात ठेवत पुढे ३ कि.मि.अंतरावर प्रकाशझोतात असलेल्या जोर या गावी वळवण्यात आला.याविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष भगवान ढेबे यांनी २९ मार्च २०११ रोजी रोहा विभागीय कार्यालयाकडून पळसगाव धनगरवाडी साठी २४, ६३, ४५५ मंजूर होऊनसुधदा पळसगाव धनगरवाडी येथे विद्युतीकरण का झाले नाही ? या मागे कोणाचे षडयंत्र आहे, व कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकल्प पळसगाव धनगरवाडीला उपेक्षित ठेऊन जोर या गावी का वळवण्यात आला? याचा लेखी खुलासा राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष भगवान ढेबे यांनी सात दिवसांच्या आत सादर करण्याची मागणी केली आहे.
२० ऑगस्ट २०१५ रोजी अधिक्षक अभियंता कार्यालय पेण येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान ढेबे साहेब, राष्ट्र भारतीचे ए.एस.पुकळे यांनी भेट घेतली असता सदर पळसगाव धनगरवाडी येथील प्रकल्पाची चौकशी करून सखोल माहीती सात दिवसांच्या आत देऊ असे लेखी पत्र भगवान ढेबे साहेब यांना दिले आहे.
- आबासो पुकळे
पेण- माणगाव येथून - २० ऑगस्ट २०१५

'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
ReplyDeleteकृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-आबासो पुकळे
धन्यवाद आबासो पुकळे साहेब व राष्ट्र भारती...
Deleteआपण उठविलेला आवाज नक्कीच आमच्या हिताचा ठरला.. याचप्रमाणे आपण प्रस्थापितांच्या दावनीतून शोशित-पिडित-वंचितांना मुक्त करून न्याय मिळवून द्यावा हि विनंती ... धन्यवाद ..