Saturday, September 22, 2018

भारतीय स्वातंत्र्यासाठी झुंझ देणारे 'राष्ट्ररत्न संगोळी रायन्ना'

धारवाड  येथील संगोळी रायन्ना पुतळा
बंगळूर  येथील संगोळी रायन्ना पुतळा
"भारतीय स्वातंत्र्यासाठी झुंझ देणारे 'राष्ट्ररत्न संगोळी रायन्ना' एक झंजावात"

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची प्रेरणा देणारी ऐतिहासिक घटनांची पाने मराठी साहित्यात उलगडताना भारतीय स्वातंत्र्यासाठी २६ जानेवारी १८३१ रोजी फासावर लटकाव लागल अशा महान देशभक्त, थोर क्रांतिवीर राष्ट्ररत्न संगोळी 'रायन्ना' बद्दल भारतीय-मराठी जनतेला किमान एक ओळीचा स्फूर्तीदायक उल्लेख माहित का नसावा तसेच देशभक्तीचा टेंभा मिरवणारे लोक शैक्षणिक अभ्यासक्रमातून का शिकवत नाहीत ? हा एक मला पडलेला गंभीर प्रश्न नेहमीच सारखा डोक्यात येईचा. 
     

१५ ऑगस्ट १७९८ या दिवशी भारतीय भूमीला गुलामीतून मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्य मिळावे याकरिता ब्रिटिशांना हैराण करून सोडण्यासाठी, भारतीय मातृ भुमीच्या रक्षणासाठी, शेतकरी व सामान्य जणांना पिळणा-या कुलकर्णीशाही, सावकारशाही, शेठशाही यांच्या जाचातुन मुक्त करण्यासाठी संगोळी या गावात 'रायन्ना नायक' नावाच्या स्वातंत्र्य योध्दयाचा कुरबा/धनगर समुदायातील कुंटुंबात जन्म झाला. कित्तूरच्या साम्राज्याची राणी 'महाराणी चेन्नम्मा' असून त्यांचा सेनापती संगोळी गावचा 'रायन्ना नायक'. संगोळी रायन्ना ने गरिब व सामान्य प्रजेतून सैन्य निर्माण केले. रायन्नाला महाराणी चेन्नमा आपला पुत्र मानीत असत. कित्तूरच्या साम्राज्यावरील ब्रिटिशांनी स्वराज्याचा ध्वज उतरून युनियन जॅक फडकवला. राणी चेन्नमाने ब्रिटीशां विरूध्द युध्द पुकारले. दुर्देवाने राणी चेन्नमा पकडल्या गेल्या. रायन्नाने शेवटपर्यंत ब्रिटिशा विरुद्ध निकराची झुंज देत शर्थीचे प्रयत्न केले .संगोळी रायन्ना नायक अविवाहित होते. प्रजेला पिळणा-या कुलकर्णीशाही व त्याला साथ देणारी ब्रिटिशसत्ता विरूध्द बंड करत पेटून उठणारे संगोळी रायन्ना  दंडनायक होते. संगोळी गावचा दंडनायक असणारा रायन्ना नायक नदीवर आंघोळ करायला गेले असता कुलकर्ण्याने रायन्नाला अंतवस्त्र धुऊन देईला सांगितले, तेव्हा रायन्नाने ठणकावून सांगितले की, तुझ्यासारख्याचे धोतर धुण्यासाठी रायन्नाचा जन्म झालेला नाही.  मी तुझा खाजगी नोकर नाही.  माझा जन्म भारतीय भूमीची, प्रजेची सेवा करण्यासाठी झालेला आहे. तेव्हा स्वतःची कामे सांगणे बंद कर, अन्यथा वाईट परिणाम होतील. कुलकर्णी घाबरून पळून गेला. ब्रिटिश राजसत्ता व कुलकर्णीशाही विरुद्ध रायन्ना नायक दंड थोपटून उभा राहिला. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करून भारतीय भूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्रशिक्षित ब्रिटिशांना गनिमी काव्याने झुंज देऊन गोर्र्या कातडीच्या साहेबांच्या नाकी दम भरणारे रायन्ना नायक भारत मातेचे देशभक्त सच्चे वीर पुत्र ठरतात. 
     ब्रिटीशांना पळता भुई करून सोडणारे संगोळी रायन्ना नायक यांचा दरारा कित्तूर, खानापूर आदी भागात पसरला. रायन्ना नायक ने ब्रिटिशांनी सुरू केलेली मुंबई-पुणे पोस्टल सेवा बंद करून टाकली.खानापूर मिलीटरी कॅम्पवर जोरदार हल्ला करून झटगी, परिखंड आदी गावच्या चावडी जाळून टाकल्या,खजिने लुटले व प्रजाजनांना वाटले.  कित्तुर, देवरहळ्ळी, खुदानपूर या गावातील बाजारांवर हल्ला करून धन लुटले. बिडी, संपगावच्या तालुका कार्यालयावर हल्ला करून तिजोरी जप्त केली. यातून स्वातंत्र्य चळवळीसाठी पैसा उभा केला. सावकारशाहीला चाफ लावला, जनतेला महसूल न देण्यास भाग पाडले, महसूल गोळा करणा-या सरकारी चावड्या जाळून टाकल्या. १३ जानेवारी १८३० रोजी देसूर गावचा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचा ध्वज रायन्ना नायकने फडकविला.  ब्रिटिशां साम्राज्याला धाडसी कार्याच्या जोरावर धक्के देऊन ब्रिटिशांनावर जरब बसवणा-या 'राष्ट्ररत्न 'संगोळी रायन्ना'स पकडण्यासाठी इग्रंज सैन्याने जंग जंग पछाडले. सैनिकी कारवाई करूनदेखील रायन्ना ब्रिटीशांच्या तावडीत सापडत नव्हता.रायन्ना नायकने ब्रिटिश सरकारविरुद्ध उघड बंड पुकारले होते. रायन्ना नायक व त्यांचे साथीदार जुलमी कारभार चालवणा-यास कार्यालयात जावून जाब विचारत असे. शिक्षा देत असे किंबहुना न्यायासाठी काहीजणांना कंठस्नान घालण्यासाठीही रायन्ना नायकने कमी केले नाही. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राण तळहातावर घेवून लढणारा रायन्ना नायक प्रजेच्या गळ्यातील ताईत बनला होता. 

     क्रांतीविर राष्ट्ररत्न संगोळी रायन्ना नायक स्मृतीस्थळ नंदगड
भारतीय समाजाला फितुरी हा लागलेला कलंक असून दुदैवाने दगा होऊन निशस्त्र असताना बलाढ्य स्वातंत्र्य योध्दा 'संगोळी रायन्ना' ला जेरबंद केले गेले. ब्रिटीशांनी स्वातंत्र्य सेनानी संगोळी रायन्ना ला नंदगड येथे फासावर चढवले मात्र भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटीशांविरूध्द लढणारे रायन्नास फास काही लागत नव्हता. फासाचा दोर चारवेळा तुटला. रायन्नाने ब्रिटिशांना नंदगड गावाच्या बाहेर फाशी देण्यास सांगून भारत भूमीवर परत जन्म घेऊन माझ्या भारत देशातून ब्रिटिशांना हाकलून लावणे हिच माझी शेवटची इच्छा आहे असे सांगितले. मरण समोर दिसत असूनही आपल्या  भारतीय मातीच्या स्वातंत्र्यासाठी परत एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे स्वातंत्र्य सेनानी राष्ट्ररत्न संगोळी रायन्ना नायक यांच्या धगधगत्या क्रांतिकारी इतिहासाची माहीती मराठी साहित्यात अथवा प्रचार-प्रसार माध्यमात का दिसून येत नाही? आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना नायक यांचा इतिहास भारतीय इतिहासकार पुढे आणत नसतील, तर या पंडितांना इतिहासकार का म्हणावे असा प्रश्न आहे.   
     भारतात 'संगोळी रायन्ना नायक' यांचा स्मृतीदीन हा २६ जानेवारी म्हणजेच भारतीय 'प्रजासत्ताक दिन' ठरला तर 'संगोळी रायन्ना' चा जन्म दिवस हा भारत राष्ट्राचा 'स्वातंत्र्यदीन' ठरला. संगोळी रायन्ना नंदगड ता-खानापूर जि-बेळगाव हा परीसर मुस्लिम बहुल आहे. नंदगड गावातील समाधीची जागा ही मुस्लिम समाजाची असून तिथे सर्व प्रथम रायन्नास फाशी देण्याचा प्रयत्न केला होता मात्र फाशीचा दोर चार वेळा तुटुन तो असफल झाला असल्याची माहीती नंदगड वासियांकडून मिळाली. तिथे कोणताही धर्म, भाषा, प्रांतवाद आडवा येत नाही. मराठी भाषिक असणारे जानकर साहेबांना कन्नड रक्षक वेदिका संघटना संगोळी रायन्ना प्रति असणारा अभिमान पाहून आदराने मान, सन्मान देते. संगोळी रायन्नाची महत्वाची फाइल्स ब्रिटिशांनी जपून ठेवल्या मात्र स्वतःला भारतीय महणवणा-या प्रस्थापित वर्गाकडून संगोळी रायन्ना यांच्या फाईल्स जाणिवपूर्वक गहाळ केल्या गेल्यात.पोलिस शिपाई जी.एस. हट्टनगी यांनी रायन्ना यांच्या फाईल्स जपून ठेवल्या. पुढे संगोळी रायन्नाचा आशिवार्द मिळाल्याने जी.एस.हट्टनगी पोलिस अधिकारी बनले. संगोळी रायन्ना स्मृती स्थळाचे पुजारी व सेवा चव्हाण आडनावाची मराठा समाजातील महिला करते. तिथे महाराष्ट्रारखी वेगळी जातीची मांडणी पहायला मिळत नाही. गत प्रजासत्ताक दिनी राष्ट्ररत्न संगोळी रायन्ना स्मृतीस्थळास भेट देण्याच्या चंग बाधंला होता. महेश बिरादार-पाटील(बिदर-कर्नाटक), गुड्डुकुमार कुशवाह (उत्तर प्रदेश), दिनकर खांडेकर, मंगेश मोटे(नवी मुंबई) यांच्या समवेत मुंबई वरून नंदगडच्या दिशेने २५ जानेवारीच्या रात्री राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करून सकाळी बेळगावला पोहचलो.पुढे बेळगाव वरून खानापूर रस्त्याने पुढे जात नंदगडच्या अलिकडे हेब्बाळ डॅमवर अंघोळ करून नंदगडला पोहचलो. नंदगड येथे संगोळी रायन्ना पुतळ्यासमोर जानकर साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यावर बाल कलाकारांनी पथनाटयाच्या माध्यामातून राणी चेन्नमा व संगोळी रायन्नाचा इतिहास सांगितला. नंदगड पासून थोडे दूर अंतरावर रायन्नास जिथे ब्रिटिशांनी वडाच्या झाडाला लटकावून फाशी दिली तिथे जाऊन रायन्नास  अभिवादन केले. ज्या ठिकाणी रायन्नास फाशी दिली त्या ठिकाणचा परीसर देशातील विविध भागातून आलेल्या पर्यटकांच्या तुडुंब गर्दीने फुलुन गेला होता. नवविवाहित वडाच्या झाडाला पाळणा बांधून संगोळी रायन्ना सारखा  क्रांतिवीर पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा अशी इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळाले. संपूर्ण कुटुंब संगोळी रायन्ना दर्शनासाठी येतात.नंदगड ला युवकांची लक्षणीय गर्दी पाहयला मिळाली. महाराष्ट्र राज्यातून नाशिक, परभणी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड,दौंड, इंदापूर,जालना, अंबड इत्यादी भागातील हजारो लोक आले होते. तमिळनाडूचे एम.जी.मणिशंकर,कर्नाटकचे गणेश देवासी, एल.मादेश, मोहनकुमार, हनुमंत पुजेर, एस नाजरकर आदी राष्ट्रीय समाजातील लोकांची ओळख करून दिली. चंदरगी ता-रामदुर्ग जि-बेळगाव येथील थोर विचारवंत, लेखक एस.एल.अक्कीसागर यांनी नंदगड व ज्यांच्या नसानसात राष्ट्रभक्ती भरली आहे देशाभिमानी 'संगोळी रायन्ना' यांच्या कार्याची माहीती 'विश्वाचा यशवंत नायक' मधून माझ्यासारख्या देशप्रेमी युवकाला उपलब्ध करून दिली तसेच सुदर्शन अक्कीसागर यांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. जय संगोळी रायण्णा..! जय भारत...!
-आबासो पुकळे, पुकळेवाडी ता-माण.
१५ ऑगस्ट २०१६

अधिक माहितीसाठी 



6 comments:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete
  2. खुप उपयुक्त माहिती मिळाली. इतिहासात बरेचदा खरे हीरे जानून बुजून बाजूला पाडले जातात.

    ReplyDelete
  3. खुप उपयुक्त माहिती मिळाली. बरेचदा इतिहासातील खरे हीरे जानुन बुजुन पडद्याआड ठेवले जातात.

    ReplyDelete
  4. खुप उपयुक्त माहिती मिळाली. बरेचदा इतिहासातील खरे हीरे जानुन बुजुन पडद्याआड ठेवले जातात.

    ReplyDelete
  5. विरोध करणारे इतिहास वाचत नाही आणि विरोध तेवढा झुंडीने करत रस्त्यावर उतरतात.
    आबासाहेब, खूप महत्वपूर्ण माहिती दिली.
    धन्यवाद

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...