"थोर भारतीय माता हिरकणी हिरवे"
हिरकणी या धनगर समाजातील असून, त्यांचे आडनाव हे गवळी धनगर कुळातील हिरवे असल्याची माहीती रायगड लोकसभा रासपचे अध्यक्ष संतोष हिरवे यांनी दिली. आजही रायगड किल्ल्यावर धनगर वाडे वास्तव्यास असून, त्यांचा व्यवसाय गवळी आहे. पायथ्यापासून ते गड हे रायगड किल्ला अंतर सात मिनीटांत पार करणारी, आजही धनगर समाजात हिरकणीचा वारसा सिद्ध करणारी साहसी, धाडसी महिला असल्याचे संतोष हिरवे यांनी सांगितले.
रयतेचे राजे शिवछत्रपतींची राजधानी रायगड, बेलाग आणि दुर्गम किल्ला! गडाच्या दरवाजाशिवाय या किल्ल्यातनं कुणालाही आत-बाहेर जाता येत नव्हतं. गडाचे सारे बुरुज भक्कम! कडे म्हणजे मृत्यूला आमंत्रण! त्यामुळं या किल्ल्यात दरवाजाशिवाय कुणालाही आत प्रवेश करता येत नव्हते आणि बाहेरही पडता येत नव्हते. अशा कडेकोट किल्ल्याच्या कड्यावरून काळ्याकभिन्न अंधारात हिरकणी गवळण आपल्या तान्ह्या बाळासाठी उतरून खाली गेल्याची ऐतिहासिक धाडसी कथा प्रसिद्ध आहे. रायगडावर दूध, दही, ताक घेवून गेलेल्या हिरकणीला घरी परतायला वेळ झाला. सूर्य मावळला. गडाचे दरवाजे बंद झाले होते. श्री शिवरायांच्या कडक आदेशामुळं ते दुसर्या दिवशी सकाळी सूर्योदयालाच उघडणार होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या चंद्रमौळी झोपडीत तिचं तान्हं बाळ होतं. बाळाच्या ओढीनं हिरकणीनं अत्यंत अवघड कडा उतरायचा निर्धार केला. तिच्या मातृत्वापुढं संकटंही हरली. हिरकणी गडाखाली उतरली. आपल्या बाळाला तिनं घट्ट छातीशी कवटाळलं. मातृत्वाच्या धाडसी विजयाची नवी गाथा महाराष्ट्राच्या मातीत लिहिली गेली. छ. शिवरायांना ही घटना समजताच त्यांनी त्या मातेचा सन्मानपूर्वक गौरव केला, अशी कथा आपण सर्वानीच शालेय अभ्यासक्रमात वाचली आहे. माऊली "हिरकणी' ज्या कड्यावरनं खाली उतरून गेली, तो कडा त्यांनी अधिक भक्कम केला. तिथं बुरुज बांधला आणि त्याला त्या मातेचे नाव "हिरकणी' बुरुज असं नाव दिलं. रायगड किल्ल्यावर तो बुरुज "हिरकणी'च्या अपार मातृत्वाची गाथा सांगत आजही उभा आहे.
आईची थोरवी वेदकालापासून प्राचीन ऋषीमुनींनी शब्दबध्द केली. जगभरातल्या धार्मिक ग्रंथांनीही आईची थोरवी गायली. "घार हिंडे आकाशी। लक्ष तिचे पिलापाशी।।' पक्षी जाय दिगंतरा, पिलासाठी आणी चारा, असं आईच्या त्यागाचं महात्म्य संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. मातृत्व हे फक्त मनुष्य जातीपुरतंच नव्हे, तर प्राणीमात्रातही आहे. आपलं बाळ हे आईचं सर्वस्व असतं. नऊ महिने पोटात वाढवलेल्या या बाळाचं संगोपन ती प्राणपणानं करते. तिच्याच दुधावर ते बाळ वाढतं. मोठं होतं. आईच्या त्यागाला कसल्याही सीमांची मर्यादा नाही. तिची माया अपार, अथांग आणि अनंत! . "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"असा जगप्रसिद्ध विचार प्रचलीत आहे.
"आई' या दोन शब्दांचं सामर्थ्य सांगायसाठी प्रतिभावंत लेखकांनी पुस्तकच्या पुस्तकं लिहिली. संतांनी अभंग लिहिले. पण, आईच्या मायेचा सागर केवढा मोठा, हे काही त्यांना लिहिता आलेलं नाही. "आई' या शब्दाला जगातल्या विविध भाषेत पर्यायी शब्द असतील, पण आई ती आईच! ती आपल्या बाळासाठी अनंत कष्ट उपसते. थंडी, वारा लागू नये, यासाठी श्रमिक आई आपण थंडी सोसत आपल्या बाळाला पदराखाली मायेची उब देते. बाळ हे तिचं सर्वस्व असतं. त्याच्यासाठी ती आपले प्राणही देते आणि घेतेही! जेव्हा आपल्या बाळाचे प्राण संकटात येतात, तेव्हा ती माझं आयुष्य माझ्या बाळाला दे, पण त्याला या संकटातनं वाचव, असा धावा परमेश्वराला करतेे. जग बदललं. भौतिक सुख-साधनं वाढली. बदललं नाही ते आईचं मन आणि तिचा त्याग!
आजच्या चंगळवादी दुनियेत वावरणा-या तमाम भारतवासी मातांना हिरकणीची मातृत्वाची गाथा प्रेरणा देत राहील.
- आबासो पुकळे
दि- २० नोव्हेंबर २०१५

'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
ReplyDeleteकृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-आबासो पुकळे