Thursday, May 30, 2024

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळ्याचे दिल्लीत आयोजन

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळ्याचे दिल्लीत आयोजन

दिल्ली : खास प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे देशाची राजधानी दिल्ली महानगरात महाराणी अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, रासप कार्यालय प्रमुख यांनी समाज माध्यमाद्वारे दिली आहे. डेल्टन हॉल द इंस्टीट्युशनल ऑफ इलेक्ट्रोनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन इंजिनियर्स 2, इन्स्टिट्युशनल एरिया लोधी रोड नवी येथील सभगृहात दिनांक 31 मे रोजी सायंकाळी पाच वाजता जयंती सोहळा पार पडणार आहे.

जयंती सोहळ्याचे उद्धघाटक स्वामी श्री सिद्धरामानंद जी महाराज श्री कागीनेली कानकगुरू पीठ कर्नाटक, कार्यक्रमाच्या अध्यक्षा लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे- राष्ट्रीय सचिव भारतीय जनता पार्टी, प्रमुख पाहुणे श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी सच्चिदानंद जी महाराज - श्री चित्रगुप्त पिठाधीश्वर वृंदावन मथुरा, विशेष पाहुणे डॉ. रत्नाकर गुट्टे - सदस्य महाराष्ट्र विधानसभा रासप, रामभाई पाल- समाजसेवक मुंबई, काशिनाथ शेवते - प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र, अतरसिंह पाल - रासेफ अध्यक्ष दिल्ली, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक महादेव जानकर - संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, एस. एल अक्कीसागर - रासेफ राष्ट्रीय अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत. जयंती सोहळ्यास देशभरातील सर्व राज्यातील रासपचे प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्ते, अहिल्याबाई होळकर यांना माननारे देशभरातील अहिल्याप्रेमी सर्वांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाने केले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...