Friday, May 31, 2024

जिंतूरमध्ये महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ महायुतीचा निर्धार मेळावा...

जिंतूरमध्ये महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ महायुतीचा निर्धार मेळावा...



जिंतूर (६/४/२४) : परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीचा खासदार निवडून आणायचाचं, हाच निश्चय साकार करण्यासाठी महायुतीच्या सर्व‌ घटक पक्षांचा निर्धार महामेळावा आज जिंतूर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी महायुतीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केली. 

या निर्धार मेळाव्यात सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक नियोजन संदर्भात माहिती सादर केली. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत असलेली विकासकामे, नियोजित प्रकल्प, विविध योजना, जनसंपर्क, गावनिहाय संघटन, निवडणूक काळातील प्रचार यंत्रणा, विविध कार्यक्रम, संभाव्य रणनिती अशा विविध विषयांवर पदधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच सर्वांनी महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी माजी आ. रामप्रसादजी बोर्डीकर, आ. मेघनाताई बोर्डीकर, माजी आ. मोहनभाऊ फड, डॉ. केदारजी खटिंग, सुरेश भुमरे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते, सर्व पदधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, बुथप्रमुख, सर्व सेलचे मुख्य समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...