Friday, May 31, 2024

राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबतच : महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष महायुती सोबतच : महादेव जानकर 



मुंबई (२४/३/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची  बैठक पार पडली. रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्याशी भेटीगाठी वाढल्या होत्या. मात्र महादेव जानकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्यानंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा सोडण्यात आल्याचे जाहीर केले. महादेव जानकर यांच्या महायुतीसोबत येण्याने महायुती अधिक बळकट झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद व महादेव जानकर यांचे नेतृत्व राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रस्थानी ठरले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...