Thursday, May 30, 2024

आष्टी तालुका परतुर येथे महादेव जानकर यांच्या विजयाची संकल्प रॅली

आष्टी तालुका परतुर येथे महादेव जानकर यांच्या विजयाची संकल्प रॅली

परतूर : परभणी लोकसभा महायुतीचा उमेदवार म्हणून महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी मोठी मेहनत घेतली.‌ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मौजे.आष्टी (ता.परतूर) येथे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रासपा, रिपाई, आठवले गट, रिपाई कवाडे गट, रयत क्रांती व सर्व मित्र पक्ष यांनी मिळून भव्य अशी रॅली काढून महायुतीच्या विजयाचा संकल्प केला. तसेच मतदानाच्या दिवशी आपापल्या भागातील जास्तीत-जास्त लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवून मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचेही निश्चित केले. 

यावेळी आ. बबनराव लोणीकर साहेब, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल (भैय्या) लोणीकर, बळीराम कडपे, शत्रृघ्न कणसे, आष्टी सरपंच मधुकर मोरे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...