Thursday, May 30, 2024

माझा भाऊ संसंदेत पाठवा : पंकजाताई मुंडे

माझा भाऊ संसंदेत पाठवा : पंकजाताई मुंडे

जिंतुर : परभणी लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ महायुतीचे राज्यातील प्रमुख नेते विविध ठिकाणी सभा, दौरे, रॅली घेत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री आणि महादेव जानकर यांची लाडकी बहिण पंकजाताई मुंडे यांनी जिंतूर येथील जिल्हा परिषद मैदान येथे भव्य सभा घेवून महादेव जानकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. 

पंकजाताई म्हणाल्या, महादेव जानकर हा उपेक्षित, वंचित, बहुजनांचा आणि सर्वसामान्यांचा नेता आहे. त्यांनी आयुष्यभर सामाजिक परिवर्तनाची लढाई लढली आहे. त्यामुळे आपले श्रद्धास्थान स्व.गोपीनाथ मुंडे साहेब यांनी त्यांना महायुतीत आणून मानसपुत्र मानले होते. त्यामुळे माझ्या या भावाला संसंदेत पाठविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, 'पंकजाचे हे शब्द माझा आनंद द्विगुणित करणारे आहेत', असे जानकर म्हणाले. माझी बहिण पंकजा स्वतः बीड लोकसभेची उमेदवार आहे. तरीही केवळ माझ्या प्रेमापोटी तिने आज आपला अमूल्य वेळ देवून माझ्यासाठी सभा घेतली. हे ऋणानुबंध आणि नातं राजकीय चौकटीच्या बाहेरचे आहे आणि हेचं नाते आम्ही दोघेही आयुष्यभर जपणार आहोत. म्हणून पंकजाला फक्त 'धन्यवाद तायडे' एवढेच म्हणेन.

यावेळी आ.मेघनाताई बोर्डीकर, मा.आ.रामप्रसादजी बोर्डीकर तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...