Friday, May 31, 2024

पुकळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

पुकळेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी


कुकुडवाड (३१ मे २०२४)  : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय पुकळेवाडी ता - माण जिल्हा सातारा येथे साजरी करण्यात आली. सरपंच सौ. अलका शंकर पुकळे, पोलीस पाटील सौ. लता हेमंतकुमार पुकळे यांच्या शुभहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो, अशा घोषणा देऊन जयजयकार केला. पत्रकार आबासो पुकळे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा उलगडा करून सांगितला.

यावेळी कुर्ला नागरिक बँकेचे संचालक दादासाहेब पुकळे, माजी ग्रामपंचायत सदस्य रखमाजी पुकळे, बिरा पुकळे, लक्ष्मण पुकळे, विष्णुबुवा पुकळे, सौ. जगाबाई पुकळे, सौ. साळू पुकळे, लक्ष्मण पुकळे, ओंकार पुकळे, विलास पुकळे, प्रनशुल पुकळे, अर्णव वीरकर, अहिल्या पुकळे, आदिश्री पुकळे, बाबू कचरे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025