बाभळीच्या काट्यांचा हेल .
पूर्वीच्या गावगाड्यातील लुप्त होत चाललेले हे दृश्य मनात नक्कीच कालवाकालव करणारे आहे. बांधावरील टुमदार विस्ताराने बहरलेली बाभळ जेव्हा धनगरांकडून खडसून / सवळून घेतली जाते. तेव्हा तोडून खाली पडलेला काट्यांचा विस्तार एकत्र करून रचला जातो. त्याला हेल / पेटा / फेस असे म्हटले जाते. तर असे हे बाभळी सवळून त्याचा हेल लावणे. हे काम जेवढे सोप्पे वाटते, तेवढे सोप्पे असंत नाही. यासाठी कसलेल्या व्यक्तीचीच आवश्यकता लागते. त्यातल्या त्यात अश्या कामासाठी धनगरांचा हात कोणी धरू शकत नाही.
तसेच हा रचलेला काट्यांचा फेस गाडीत भरून घरी परड्यात आणणे ही फार जिकिरीचे काम असते. आज घडीला असें किचकट काम करणे. कोणालाही आवडणारे नाही. जमाना खूप फास्ट झालेला आहे. परंतु हेच किचकट काम आपल्या कित्येक पिढ्यांनी केले आहे. त्याची जाण, एक आवड म्हणून हत्तीच्या किंमतीची बैलं. जोडीला लागणारी गाडी , शेती, दुधदुप्ती जनावरं घरात माणसांचा असणारा मोठा बारदाना सांभाळला आहे.
शेडगेवस्ती - कोडोली जि. सातारा येथील प्रगतिशील शेतकरी श्री रामचंद्र शंकर शेडगे. (बबनअप्पा) 🌹❤️🌹
No comments:
Post a Comment