महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परभणीत महायुतिचा संवाद मेळावा
परभणी (१४/४/२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी येथे महायुती संवाद मेळावा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाला. त्यामध्ये महायुतीच्या प्रचाराचे नियोजन व दिशा ठरविण्यात आली. तसेच विधानसभानिहाय आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे अचूक नियोजन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचेही निश्चित केले.
यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.मेघनताई बोर्डीकर, आ. डॉ.रत्नाकरजी गुट्टे, माजी खासदार सुरेशराव जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, मा.आ. हरिभाऊ काका लहाने, भाजप महानगराध्य आनंद भरोसे, डॉ.केदार खटिंग, प्रताप भैया देशमुख, सुरेश भुमरे, संदीप माटेगावकर यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment