Friday, May 31, 2024

पुकळेवाडीत अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन

पुकळेवाडीत अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन 



पुकळेवाडी : महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती पुकळेवाडी तालुका माण जिल्हा सातारा येथे साजरी करण्यात आली. श्री.विठोबा बिरोबा मंदिर ते श्री. सिद्धनाथ मंदिर पर्यंत धनगरी ढोल कैताळ्याच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. कैलासवासी पांडुरंगमामा कोकरे मंचकावर विविध मान्यवरांच्या हस्ते अहिल्यामातेचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा सजवून मिरवणूक भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो अशी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किसन यशवंत पुकळे, ओंकार बंडाभाऊ पुकळे यांनी विशेष परिश्रम घेतले. मंचकावर अशोक झंजे, किरणकुमार काळे यांच्यासाह प्रतिष्टीत नागरिक, विविध पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थ मंडळ पुकळेवाडी यांच्या उपस्थितीत महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्सहात पार पडला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...