राष्ट्रीय समाज पक्ष दिल्ली हेच लक्ष्य
31 मे 2003 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना अहिल्याबाई होळकर जन्मगावी चोंडी येथे झाली. 2004 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात रासप मैदानात दिल्ली लक्ष्य घेऊन लढला. 2009 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. 2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष इंडिया प्रणित महायुती सोबत महाराष्ट्रामध्ये एकत्रित निवडणुकीला सामोरे गेला. माढा लोकसभा मतदार क्षेत्रातून लक्ष ठेवून असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला ऐनवेळी निवडणुकीत महायुतीच्या वाटाघाटीत बारामतीची जागा मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाने बारामतीत महादेव जानकर यांच्या रूपाने मोठी झुंज दिली. बारामती परिवर्तन होऊ शकते, असा आत्मविश्वास दिला. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रीय समाज पक्षाने आपले उमेदवार लढवून राष्ट्रीय समाज पक्ष देशभर विस्तार करत असल्याचे दाखवून दिले. 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र वगळता उत्तर प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, राजस्थान, केरळ, कर्नाटक राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवून राष्ट्रीय समाज पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व दाखवलेच, शिवाय राष्ट्रीय समाज पक्षाचे केवळ एक दोन जागा लढवणे हा उद्देश नसून, या देशाची पार्लमेंटची सत्ता रासपाच्या ताब्यात यावी, यासाठीचा लढा असल्याचे दाखवून दिले. यावर्षी होत असलेल्या सण 2024 च्या 18 व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपप्रणीत एनडीए सोबत रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर परभणी लोकसभा मतदार क्षेत्रातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. 26 एप्रिल रोजी मतदान यंत्रात जनमताचा कौल बंदिस्त झाला आहे.
आपला पक्ष, आपला नेता, आपला अजेंडा, आपलाच झेंडा, 'स्व'साधन याद्वारे रासपने दिल्ली लक्ष्य केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकात विजयाचे खाते उघडले आहे. मात्र पक्ष स्थापनेपासून देशाची सर्वोच्च सत्ता असणाऱ्या संसदेत खाते उघडण्यासाठी धडपड चालूच आहे. पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी देशाचे सर्वोच्च पद पंतप्रधान बनण्याची अभिलाषा अनेकवेळा बोलून दाखवले आहे. त्यांच्या भाषणात नेहमी दिल्ली आणि पंतप्रधान हा शब्द असतो, त्याला जोडून राष्ट्रीय शब्दावर ही भर असतो, पक्षाच्या नावातच राष्ट्रीय आणि समाज आहे, राष्ट्रात जे जे राहतात व राष्ट्रावर प्रेम करतात, तो राष्ट्रीय समाज आहे. दीनदुबळे ते उच्चवर्णीय यांना मान सन्मान मिळवून देणारी 'फुलेवादाची आदर्श विचारधारा' राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे. राष्ट्रीय समाज पक्ष 'सब समान तो देश महान' हा विचार घेऊन जनतेपर्यंत जात आहे.
'एक देश एक शिक्षण' हा संकल्प राष्ट्रीय समाज पक्षाने केला आहे. गरीब असो किंवा श्रीमंत सर्वांना एक समान शिक्षण मिळावे. संपूर्ण राष्ट्रासाठी एकच शिक्षणनीती असावी. शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करून बदलत्या काळाप्रमाणे ज्ञान आणि रोजगाराभिमुख अत्याधुनिक राष्ट्रीय शैक्षनिक धोरण राबविन्यासाठी रासपने दिल्ली लक्ष्य केले आहे. रासपला प्रत्येक नागरिकाला आरोग्याची शाश्वती देणारे धोरण राबवायचे आहे. गरजेप्रमाणे सर्वांना पाणी वाटपाचे राष्ट्रीय जल धोरण राबवायचे आहे. वाडी, वस्ती, तांडा, पाडा, गाव, शहारातील प्रत्येक घरात माफक दरात वीज पोहचविणारे राष्ट्रीय धोरण राबवायचे आहे. सर्वांना रोजगाराची हमी देणारे राष्ट्रीय रोजगार धोरण राबवायचे आहे. शेतमजूर आणि कामगारांना सन्माननीय रोजगार मिळवून देणारे राष्ट्रीय शेतमजुर आणि कामगार धोरण राबवायचे आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणारे (७/१२ कोरा करणार), शेतमालाला किफायतशीर भाव मिळवून देणारे राष्ट्रीय कृषी धोरण राबवायचे आहे. मत्स्यपालनसहित पशुपालन व्यवसायाच्या विकासाचे राष्ट्रीय धोरण राबवायचे आहे. पशुपालकांना त्यांच्या हक्काची गायरान जमीन पशुंसाठी उपलब्ध करायची आहेत. सर्व समुदयांना समान राष्ट्रीय भागीदारी देण्याचे आरक्षणाचे धोरण राबवायचे आहे. राष्ट्रीय सुरक्षा नीतीची कडक अंमलबजावणी करणारे राष्ट्रीय धोरण राबवायचे आहे. देशातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर करणारे आणि समता मुलक समाज घडविणारे राष्ट्रीय धोरण रासपला राबवायचे आहे. भारताला सार्वभौम ठेवून बलशाली बनवणारे आंतरराष्ट्रीय धोरण राबवायचे आहे. जगात भारत देश तंत्रज्ञानाच्या उच्च क्रमांकवर नेण्यासाठी विशेष योजना राबवणारे धोरण राबवून विज्ञान तंत्रज्ञानात देशाला सर्वोच्च स्थानी पोहोचवायचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या घरापासून त्याच्या कार्यस्थानापर्यंत रस्ता देण्याचे दळणवळणाचे धोरण राबवायचे आहे. सर्वांना सांभाळून घेणारे सर्वव्यापी राष्ट्रीय विमा संकल्पना अमलात आणणारे धोरण राबवायचे आहे. राष्ट्रीय समाज पक्ष दिल्ली लक्ष्य करून वाटचाल चालू आहे. 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत देशभरात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. रासपचे संघटनात्मक जाळे देशभर तयार होत आहे. ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि राष्ट्रीय पातळीवर संसदीय राजकारणात महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय समाज पक्षाची एन्ट्री होईल.
- कार्यकारी संपादक राष्ट्र भारती
No comments:
Post a Comment