परभणी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मतदान द्या : महादेव जानकर
नामांकन सभेत बोलताना परभणी लोकसभा मतदार क्षेत्र महायुतीचे अधिकृत उमेदवार महादेव जानकर |
महादेव जानकर म्हणले, मला महायुतीने उमेदवारी दिली. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुम्ही सामाजिक समन्वय साधण्यासाठी तुम्ही मदत केलेली आहे. ७० वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही, पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केलेली आहे. मी आणि माझा पक्ष जिथे माझी ताकद असेल तिथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुतीच्या मागे उभे राहण्यासाठी वचनबध्द असेल.
जानकर पुढे म्हणाले, बांधवांनो, या नेत्यांनी ठरवलं. अमित शहा असतील, मोदी असतील, त्यांनाही धन्यवाद देईन. अजितदादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात दोन कॅबिनेटमंत्री होते. एक इंजिनियर आणि दुसरे प्राध्यापक. तिसरे राज्यसभेवर घेतले ते डॉक्टर होते. राजकीय भागिदारी देण्याची भूमिका कोणी केली असेल तर या माणसांनी केलेली आहे, म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो. परभणीतील नेत्यांनो, तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही. कारण मला बायका पोरं नाहीत. घरदार नाही. रेल्वेस्टेशनवर सुध्दा मी झोपू शकतो. जसा वाराणसी, नागपूर, बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही.
जानकर पुढे म्हणाले, मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळे सर्व नेते मला ओळखतात. इथे मी राहणार आहे. एक घर विकत घेणार आहे. 40 वर्षापासून फिरतोय. तुमची कामे करण्याचा प्रयत्न सर्वांच्या साक्षीने करीन. मला 17 भाषा येतात. खासदारकीच्या ठिकाणी हिंदी, इंग्रजी लागते आणि मला ते चांगले येते. सर्वांना विनंती करून फंड आणण्यासाठी तुम्ही ताकद द्यायची भूमिका करा. मी महायुतीचा उमेदवार आहे. मी महायुतीला 47 ठिकाणी मदत करायला जाणार आहे. मला फक्त एका ठिकाणी तुमची मदत हवी आहे. तन, मन, धनाने साथ द्यायचा प्रयत्न करा. परभणी लोकसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनवण्याचा प्रयत्न करू. विमानतळ सुरू करण्याचा प्रयत्न करू. समृद्धी महामार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी प्रयत्न करीन. परभणी जिल्ह्यातील लोक पुणे - मुंबईला जगायला जातात, आम्हाला स्टार एमायडीसी द्या, म्हणून विनंती करीन. विकासाची गंगा आणण्यासाठी मी प्रयत्न करीन. माझं कुठ शाळा, कॉलेज, कुठे काही भानगड नाही. लग्न नाही, कुठे काय नाही, त्यामुळे काळजी करू नका. माझा देह आहे, तो जनतेसाठी आहे. तुम्ही जनतेने दत्तक घेतले, तुमचे पारणे फेडण्याचा प्रयत्न करीन.
महायुतीत आम्हाला ही जागा दिली. राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा आहे. बारामतीला सुद्धा प्रचाराला जाणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी नंतर आम्हाला संधी दिली, मान सन्मान दिला, त्याबद्दल तिघांचेही ह्रुदयातून अभिनंदन करतो. आणि मला दिल्लीला जाण्यासाठी आशिर्वाद द्याल, अशी अपेक्षा करतो. जय हिंद. जय भारत.
No comments:
Post a Comment