मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाथरीत महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ रॅली व विजयी संकल्प सभा
सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी महादेव जानकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा : एकनाथ शिंदे
पाथरी : परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य प्रचारसभा पाथरी येथे पार पडली. तसेच यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत मुख्यमंत्र्यांनी सहभागी होत सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी महादेव जानकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. पाथरी येथील श्री साईबाबांच्या मंदिरास महादेव जानकर यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांनी भेट देत मनोभावे पूजन करीत भक्तीभावाने दर्शन घेतले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, एका सर्वसामान्य शिवसैनिक, शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याने काहींच्या पोटात पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळेच ते माझ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. शिव्या देत आहेत. पण ही शिवीगाळ मलाच नव्हे तर राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मराठा आणि बहुजनांनाही आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जे जन्माला आले, त्यांच्यावर योग्य संस्कार मात्र झालेले नाहीत. अशांच्या आरोपांना कामातून उत्तर देऊ असे स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, सरकारने मौलाना आझाद महामंडळाचा निधी ५० कोटींवरुन ५०० कोटींपर्यंत वाढवला आहे. सरकारने सर्वच समाज्याला न्याय देण्याचे काम केले. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ते मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे, असे सरकारचे उद्दिष्ट आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मुस्लिम समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. काँग्रेसने फक्त मुस्लिम समाजाला व्होट बँक म्हणून वापरले आणि त्यांना गरिबीत ठेवले, मात्र मोदीजींनी मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास केल्याचे सांगितले.
बारामतीत साडेतीन लाखांचा लीड ३४ हजारांवर आणणारे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आहेत. तेव्हा इतिहास घडवला असता. मात्र आता ते परभणीत इतिहास घडविणार आहेत. परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर नक्की दिल्लीत खासदार म्हणून बहुमताने विजयी होऊन जातील असा विश्वास यासमयी व्यक्त केला.
महादेव जानकर यांना १७ भाषा येतात. खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर विकास आणि प्रगतीची भाषाही ते शिकतील आणि परभणीच्या विकासासाठी आकाश पाताळ एक करतील असे सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार आशिष देशमुख, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे सईद खान आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाई, मनसे महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परभणी लोकसभा मतदारसंघातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment