आटपाडी माण तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा
जीवितहानी वितीयहानीने नुकसान
16 मे 2024 रोजी आटपाडी, माण तालुक्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह, तुफान वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही क्षणातच मोठी झाडे उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाले. झाडाच्या सावलीखाली उभी केलेल्या वाहनांचे नुकसान झाले. आजच्या वादळी पाऊसाने माण तालुक्यात मरगळेवाडी येथील शाळकरी मुलगा वीज पडून जागीच ठार झाले. माण तालुक्यातील तरुण शिक्षकाचा झाड पडून दुर्दैवी मृत्यू. आगासवाडी येथे मंदिरावर वीज पडली. पुकळेवाडी येथे शेडचा पत्रा उलटून जनावरे जखमी. आज झालेल्या वादळी पावसाने वित्तीय व जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे.
No comments:
Post a Comment