Friday, May 31, 2024

महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परतूर मध्ये महायुतीने‌ वज्रमूठ उभारली...

महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परतूर मध्ये महायुतीने‌ वज्रमूठ उभारली...



परतूर (१०/४/२४) : परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ आज परतूर येथे महायुतीचा महाएल्गार सभा अतिशय उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगते मांडली. तसेच विजयाचा निर्धार व्यक्त केला.‌

महादेव जानकर हे सर्वसामान्यांचे नेते आहेत.‌ २०१४ पासून ते महायुतीचे प्रामाणिक व एकनिष्ठ घटक आहेत. त्यांना राज्यासह देशपातळीवरील राजकारणाचा अनुभव आहे. सर्वसामान्य घरातला हा माणूस लोकांच्या मनात बसला आहे. त्यांच्या रूपाने महायुतीला सक्षम उमेदवार मिळाला असून आपला विजय निश्चित आहे, असे उपस्थित वक्त्यांनी म्हटले.‌

यावेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, माजी जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर, मा. आ. विलास बापू खरात, राहुल लोणीकर, माजी आ.अरविंद चव्हाण यांच्यासह महायुतीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...