रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा परभणी लोकसभा मतदारसंघात विजय निश्चित
महादेव जानकरांना मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत : देवेंद्र फडणवीस
परभणी (०१/०४/२०२४) : राष्ट्रभारती
महादेव जानकर हा साधा माणूस आहे. पंकजाताई मुंडे सोबत निश्चितच जानकर साहेब दिल्लीला खासदार म्हणून जातील, हा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महादेव जानकर यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत' असे प्रतिपादन केले. परभणी लोकसभा मतदारसंघ संघातून महादेव जानकर यांनी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी समवेत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पंकजाताई मुंडे, सदाभाऊ खोत व अन्य महायुतीचे स्थानिक पदाधिकारी यांच्या समवेत भव्य नामांकन मोठी जाहीर सभा पार पडली.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महादेव जानकर यांनी पाच वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळात काम केलं. कोणतीही कुरकूर त्यांनी केली नाही. सातत्याने आपल्या खात्याचे काम नेटानी करायचं. सामान्य माणसाकरता काम करायचं. पाच वर्षांत 1 रुपयाचा डाग सुद्धा या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही. हा मंत्री फाटकाच आला, मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला, आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटका राहणार आहे. म्हणूनच लोकांच्य मनामध्ये जानकरांचे घर आहे. महादेव जानकरांची श्रीमंती म्हणजे इथे बसलेले लोक आहेत. महादेव जानकरांची श्रीमंती या महाराष्ट्रातील दलीत गोरगरिब, आदिवाशी, शेतकरी, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक, भटके विमुक्त यांच्याबद्दल जानकरांबद्दल जी जागा आहे, तीच महादेव जानकरांची श्रीमंती आहे. जानकरांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत. महादेव जानकरांचे चिन्ह आता लवकरच येईल, नाहीतर कमळ, धनुष्यबाण किंवा घड्याळ शोधाल. पण कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे महादेव जानकरांच्या पाठीशी उभे आहे. जानकरांचे चिन्ह आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर हे चिन्ह घराघरांच पोहचवून महादेव जानकरांना निवडून आणायचे आहे. महादेव जानकर हा साधा माणूस आहे. त्यांच्या फोनची कुणीही वाट पाहू नये.
महादेव जानकरांना सांगा, मी तुमची वाट बघतोय! पंतप्रधान मोदींनी फडणवीसांकडे पाठवला खास संदेश
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीचं काय सुरू आहे याची माहिती विचारली. तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही महादेव जानकरांचा फॉर्म भरायला परभणीत जाणार आहोत अशी माहिती आम्ही मोदींना दिली. त्यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, जानकरांना सांगा, मी त्यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहतोय. परभणीच्या लोकांना सांगा जानकरांना दिल्लीला पाठवण्याची आता त्यांची जबाबदारी आहे. मोदींचा संदेश मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. मोदींसाठी जाकरांनासारखा एक खासदार तुम्ही दिल्लीला पाठवणार का? असा देवेंद्र फडणवीसांनी परभणीकरांना सवाल विचारला.
गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारत बदलल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 2014 पर्यंत प्रत्येकजण गरिबीविषयी बोलायचा, पण देशात पहिल्यांदा कोणी खऱ्या अर्थाने गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या 10 वर्षांमधील भारताची कामगिरी पाहून संपूर्ण जग आश्चर्याने तोंडात बोटं घालत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेच्या वर काढलं. जगातील अर्थतज्ज्ञ म्हणतात की, भारतामध्ये हे काय आश्चर्य झालं. जे विकसित देशांना जमलं नाही, ते मोदींनी करुन दाखवलं. मोदीजींनी हे कसं केलं, हा प्रश्न सगळ्यांना पडला. पंतप्रधान मोदींना हे जमलं कारण, त्यांनी मुठभर लोकांसाठी काम केले नाही. त्यांनी गरिबांच्या घरात वीज, पाणी, सिलेंडर या सुविधा मिळतील, हे पाहिले. तसेच आमच्या महिलांना शौचालय, मुद्रा लोन, शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासातंर्गत तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, यासाठी मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केले. मोदीजी म्हणतात की, 10 वर्षांमध्ये देशात झालेले हे परिवर्तन हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्याप्रकारे बदलणार आहे, त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
No comments:
Post a Comment