स्वरूप रामटेके यांच्या निधनाने हळहळ, रासपकडून शोक
संभाजीनगर : मुंबईतील बैठक संपवून गावी परतणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष श्री. स्वरूप रामटेके आणि संदीप साखरवाडे यांचा समृध्दी महामार्गावर भीषण रस्ते अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक आहे. रितेश भानादकर आणि आशिष सरवदे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वरूप रामटेके यांनी नुकताच भंडारा येथे रासपचा मेळावा घेतला होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावून त्यांच्या पाठीशी राजकीय बळ उभे केले होते.
स्वरूपजी यांचे निधन ही विदर्भातील पक्षाची आणि सामाजिक राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्रीय समाज पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे. ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच निर्मिकास प्रार्थना. राष्ट्रिय समाज पक्ष सदैव त्यांच्या सोबत आहे, ओम शांति ओम.
No comments:
Post a Comment