संपूर्ण राष्ट्रीय विकास व समान भागीदारी हाच राष्ट्रीय समाज पक्षाचा अजेंडा : सिद्धप्पा अक्कीसागर
सिध्दप्पा अक्कीसागर |
बेळगावी : राष्ट्र भारती द्वारा
'संपूर्ण राष्ट्रीय विकास व समान भागीदारी', हाच राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर यांनी बेळगावी येथे पत्रकार परिषदेत केले. कन्नड साहित्य भवन येथे कर्नाटक रासप तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
राष्ट्रीय विकास होत असताना, राष्ट्रातील सर्व समाजाला समान भागीदारी दिली जात नसल्याचा घणाघात करत, राष्ट्रातील सर्वांना समान भागीदारी हा रासपचा अजेंडा असल्याचे अक्कीसागर यांनी स्पष्ट केले. 2003 साली राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली. 2004 साली सार्वत्रिक पहिली लोकसभा निवडणुक महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात लढवली होती. सत्यशोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन ही रासपची त्रिसूत्री आहे. देशात लोकशाहीचा उत्सव होत आहे, राष्ट्रीय समाज पक्षाचे कमी अधिक प्रमाणात देशभर संघटन उभे केले आहे. 2019 ला सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सहा राज्यात लढवली होती. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, दिल्ली आदी राज्यात विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाने लढवले आहेत.
महाराष्ट्रात भाजपप्रणीत एनडीए महायुतीत रासप सहभागी झाले आहेत. परभणी लोकसभा मतदार संघातून रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत आरबीआयच्या कार्यक्रमाला आले असता, त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ महादेव जानकर यांची 18 व्या लोकसभेत वाट पाहत आहे असा संदेश दिला आहे. महाराष्ट्र राज्य बाहेर कर्नाटकात 28 जागावर राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढवण्याचा मानस असून, पाच जागांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. चिक्कोडी, बागलकोट, बेळगांव, विजयपुर, रायचूर, कोप्पळ आदी मतदार संघात लढण्याची तयारी झाली आहे. कर्नाटकात काँग्रेस व भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे बोलले जाते. लोकशाही धोक्यात आली असून, नेत्यांना राष्ट्रांशी, जनतेशी, समाजाशी काही देणे घेणे नाही. सर्वसामान्य नागरिकांना या देशाची सत्ता मिळावी, हे रासपचे उद्दिष्ट आहे. कर्नाटकातील जनतेने राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन करत आहे.
सिद्धप्पा अक्कीसागर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना हिंदी व कन्नड मधून सडेतोड उत्तर देऊन, राष्ट्रीय समाज पक्षाची बाजू भक्कमपणे जनतेसमोर मांडली.
No comments:
Post a Comment