Wednesday, April 17, 2024

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा लढविणार : महादेव जानकर

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा लढविणार : महादेव जानकर 

नागपूर : पत्रकार परिषदेत रासपची भूमिका मांडताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बाजूस विदर्भातील रासपचे पदाधिकारी

अमेरिका प्रमाणे ईव्हीएम बंदी करा 

नागपूर (२२/२/२४) : काँग्रेस, भाजप सारखे सर्वच पक्ष लहान पक्षांचा शिडी सारखा वापर करतात, अशी टीका करीत राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची माहिती, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

आ. जानकर म्हणाले, विदर्भात पक्षाचे समर्थन वाढवण्यासाठी दौरा करण्यात येत आहे. मूल, शिंदेवाही, नागभीड, पवनी, चंद्रपूर, भंडारा येथील दौरा आटोपला आहे. यात अनेक ठिकाणी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन, कार्यकर्ता मिळावे घेण्यात आले. 23 फेब्रुवारीला यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला जाईल. अकोला, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये पक्षाला चांगले बहुमत मिळेल असा विश्वास आहे. सध्या कोणत्याच राजकीय पक्षाकडून निवडणुकीत चांगला वाटा देण्याचा प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याची आम्ही तयारी केली आहे. पक्षाची १७ राज्यात ताकद वाढेल. आमच्या हातात सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज उरणार नाही. नागपूर या उपराजधानीत सर्व प्रकारच्या सोयी - सुविधा उपलब्ध असून, वेगळे विदर्भ राज्य दिल्यास विदर्भाचा विकास होईल. तसेच भारतात अमेरिकेप्रमाणे ईव्हीएम बंदी करण्याची मागणी केली. पत्रकार परिषदेला विदर्भ अध्यक्ष एड. रमेश पिसे, देविदास आगरकर, डॉ. तौसिफ शेख, पुरुषोत्तम कांबळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...