वेगळ्या विदर्भाच्या मागणीला रासपचा पाठींबा : महादेव जानकर
चंद्रपुर (२१ /२/२४) : विदर्भाचा विकास स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय होणार नाही. राष्ट्रीय समाज पार्टीचा वेगळ्या विदर्भाच्या मागण्याला पाठिंबा आहे, असे प्रतिपादन महादेव जानकर यांनी चंद्रपुर येथे केले आहे. शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत महादेव जानकर बोलत होते.
श्री. जानकर पुढे म्हणाले, छोटे राज्य विकासाला पूरक असतात. विदर्भात मोठ्या प्रमाणात कोळसा, पाणी मॅगजीन लोह, चौखडक, डोलामाईट मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती विदर्भात आहे. यातूनच येथे उद्योगधंदे निर्मितीसाठी उद्योगपतींना आकर्षित करता येईल. विदर्भात प्रचंड प्रमाणात रोजगार होईल.
'राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं जानकर यांनी अभिनंदन केलं. कोर्टात मराठा आरक्षण 100% टिकणार व त्याबाबत तिळमात्र शंका नाही. "भारतात जिथे उमेदवार मिळतील, तिथे राष्ट्रीय समाज पक्ष सर्व जागा लोकसभा लढवणार आहे". भाजप सत्तेत येत नव्हते, तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती, त्यावेळी आमच्याशी युती करून ते दीड दोन टक्के मते मिळवत त्यांनी सत्ता हस्तगत केली. मात्र नंतर सत्तेची घमंड त्यांच्या डोक्यात शिरली. जो तो त्याचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो, राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात फिरवून जनतेत जाऊन मते आजमावत आहे, आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ओबीसी घटकातील काही जातींना शून्य टक्के आरक्षण आहे. त्यांचे कोण बघणार आहे.? हे ताकदवान आहेत, त्यांचेच ऐकले जाणार असेल तर, लहान गटांचे काय? "जिसकी जितनी संख्या, उसकी उतनी भागीदारी" असायला हवी. त्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मांडली. जातनिहाय जनगणनेशिवाय कोणत्याही समाजाची किती लोकसंख्या आहे हे समजणार नाही. आज राज्यात 52 टक्के ओबिसी समाज राहतो. मात्र 9% देखील आरक्षण त्यांना मिळालेले नाही. हे अपयश सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांचे आहे.
No comments:
Post a Comment