Wednesday, April 17, 2024

मी सुरवात केल्यास सरकार राहणार नाही; विजय मेळाव्यातून महादेव जानकरांचा इशारा

मी सुरवात केल्यास सरकार राहणार नाही; विजय मेळाव्यातून महादेव जानकरांचा इशारा

परभणी : लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात बोलताना रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर

रासपच्या विजय निर्धार मेळाव्यास परभणीत तुफान प्रतिसाद

परभणी (११/३/२४) : 'भाजपनं माझ्यासोबत धोका केला, मात्र मी त्यांच्यासोबत इमानदारीने राहिलो. ज्या दिवशी मी धोका देईल, त्या दिवशी यांचे सरकार राहणार नाही. मला मुख्यमंत्री नाही व्हायचं, पाच मिनिटं का होईना, मला पंतप्रधान व्हायचंय असे म्हणत पुन्हा एकदा महादेव जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. परभणीत रासपच्या लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर बोलत होते. परभणी शहरातील श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला. याप्रसंगी रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर बोलत होते. 

लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहिलेला जनसमुदाय.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर, रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शूरनर, बाळकृष्ण लेंगरे, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर सलगर, रासपचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, विलास गाढवे, गणेशराव रोकडे, विष्णू सायगुंडे, परभणी मनपाचे माजी आरोग्य सभापती सचिन देशमुख, किशन भोसले, प्रा. संदीप माटेगावकर, राज्य सचिव ओमप्रकाश चितळकर, राम मरगळ, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्याग बांधवांनी महादेव जानकर यांचे परभणी शहरात स्वागत केले. यावेळी आ. रत्नाकर गुट्टे व अन्य उपस्थीत होते.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नसण्यामुळे पंकजाताई पेक्षा जास्त माझी वाताहत झाली असल्याची खंत रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केली. महाआघाडी आणि महायुती दोन्ही आमच्या संपर्कात आहेत, अजून कोणताही निर्णय झाला नसून, मात्र रासपकडून परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. महादेव जानकर यांनी संपुर्ण कार्यक्रम हा व्यासपीठावर न जाता, खाली कार्यकर्त्यांमध्ये बसुन राहिल्याने कार्यकर्त्याचा उत्साह वाढला. 

परभणी लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर, एस. एल. अक्कीसागर, रत्नाकर गुट्टे यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

महादेव जानकर म्हणाले, माझ्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघ हा देशात ओळखला जाणार आहे. परभणीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी आपण प्रयत्न केले होते. राष्ट्रीय समाज पक्षाची देशात सत्ता आल्यास जात, धर्म न पाहता सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे एकसमान शिक्षणाचे धोरण राबविणार. आम्हाला राशन नको हक्काचे शासन पाहिजे. काँग्रेस आणि भाजपचा जातनिहाय जनगणनेस विरोध असून, त्यांना बहुसंख्य राष्ट्रीय समाजाला विकासापासून वंचित ठेवायचे आहे. लोकसंखेच्या प्रमाणात सर्वांना त्यांचा वाटा मिळालाच पाहिजे. 

लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात महादेव जानकर मंचावर न बसता थेट जनतेत मिसळले.

यावेळी बोलतांना महादेव जानकर यांनी भाजपला लक्ष करत लोकसभेतील जागावाटपावरून इशारा देखील दिला आहे. गोपीनाथ मुंडे हयात असते तर मी आज केंद्रात मंत्री राहिलो असतो. 'महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही' लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती जागा देणार यावर कोणताही निर्णय झाला नसून, यासाठी दिल्लीत बैठका होतांना पाहायल मिळत आहे. अशात मित्रपक्षांना मात्र भाजपकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. महायुतीसोबत राहूनही महायुतीचे नेते आम्हाला विचारायला तयार नाहीत. मात्र आम्ही आमचं सक्षम आहोत. कुणी आम्हाला कितीही डावलल तरीही काहीही फरक पडणार नाही. महायुतीला आमची गरज नाही, तर आम्हालाही त्यांची गरज नाही अशा शब्दात महादेव जानकर यांनी ठणकावून सांगितले. भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांना पैश्यांचा हार घातला. या मेळाव्याला रासपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रा. विष्णू गोरे सर यांनी केले तर आभार परभणी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दुगाने यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या विजय निर्धार मेळाव्यास परभणीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...