सर्वांना सोबत घेऊन मुंबई प्रदेश रासपमय बनवू : यमकर
'भांडुप'मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी यांची बैठक संपन्न
मुंबई (२०/०२/२०२४) : राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनिर्वाचित मुंबई प्रदेश अध्यक्ष विठ्ठल यमकर यांच्या नेतृत्वात भांडुप येथे राष्ट्रीय समाज पक्ष मुंबईतील जिल्हाध्यक्षांची बैठक पार पडली. श्री. यमकर यांची मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्षानी त्यांचे अभिनंदन केले व मुंबई शहर प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत एकजुटीने काम करू असा निश्चय केला.
"पक्ष श्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थितरीत्या पार पाडू. लवकरच मुंबई शहरातील समस्यांना घेऊन मोठे जनआंदोलन उभारून, जनतेचे हित साधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष कटीबध्द असेल. जुन्या व नव्या पदाधिकारी या सर्वांना सोबत घेऊन, मुंबई प्रदेश रासपमय बनवू, असा विश्वास मुंबई प्रदेश अध्यक्ष विठ्ठल यमकर यांनी व्यक्त केला. श्री. यमकर पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी जानकर साहेब यांच्याप्रमाणे काम करावे. जानकर साहेब कुणासाठी थांबत नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी यांनी मनापासून काम केले तर लवकरच पक्षाला चांगले दिवस येतील.
यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव जिवाजी लेंगरे, मुंबई प्रदेश महासचिव संतोष ढवळे-धनवीकर, मुंबई उपाध्यक्ष रामधारी पाल, मुंबई उपाध्यक्ष प्रकाश डांगे, मुंबई उत्तर भारतीय आघाडी सचिव इकबाल अन्सारी, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष वसंत कोकरे, उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश यादव, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष लल्लन पाल, ईशान्य मुंबई युवा जिल्हाध्यक्ष विजय जयस्वार, उत्तर पश्चिम मुंबई व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष युसुफ कुरेशी, शिवाजीनगर युवा अध्यक्ष आरिफ कुरैशी, ईशान्य मुंबई वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, विश्वास यमकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment