म्हणून रासपने पिक विमा कंपनीच्या कार्यालयाला फासले काळे
दर्यापूर (२२/२/२४) : वर्षापूर्वी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी रीतसर पैसे भरून पिक विमा काढला. परंतु एक वर्षे उलटूनही पिक विमा कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांना अद्याप विम्याचे रक्कम देण्यात आलेली नाही. या संदर्भात विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी, निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने, राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी विमा कंपनीच्या कार्यालयाला काळे फासले. या आंदोलनात अमरावती जिल्हाध्यक्ष किरण होले, तालुकाध्यक्ष राजेश पावडे, तेजस राऊत, आकाश नारे, कृष्णा होले, तेजस घुरडे, शिवशंकर धर्माळे आदी सहभागी झाले.
No comments:
Post a Comment