मधुबनी जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता संमेलन
मधुबनी/ बिहार : मधुबनी जिल्हा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता संमेलन पार पडले. या कार्यकर्ता संमेलनास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी खास उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महादेव जानकर यांनी बिहार राज्य कार्यकारिणी, तसेच विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडीचे संघटन बांधणीचे निर्देश दिले. यावेळी फुलेपिठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक, अनिल झा, मधुबनी रोहित शर्मा व अन्य रासप पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment