19 एप्रिल चा दिवस, महादेव जानकर जन्म दिवस! अर्थात राष्ट्रीय समाज दिवस!! निमित्त लेख...
✍🏻 एस एल अक्कीसगार
राष्ट्रीय समाज नायक : महादेव जगन्नाथ जानकर
‘रानोमाळ ते विधानभवन ते थेट कॅबिनेट मंत्रीपद’
लक्ष्य संसदभवन आणि प्रधानमंत्रीपद…
जीवनपट थोडक्यात:-
नाव : महादेव जगन्नाथ जानकर
जन्म तारीख : 19 एप्रिल 1968
मूळगाव पत्ता : मु. पळसावडे, पोस्ट - देवापुर, तालूका- माण, जिल्हा - सातारा, महाराष्ट्र.
सध्याचा पत्ता : रासपा केंद्रीय कार्यालय 1/बी 35, हमाम स्ट्रीट, फोर्ट, मुंबई – 400001.
प्राथमिक शिक्षण : जिल्हा परिषद शाळा - पळसावडे
माध्यमिक शिक्षण : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय देवापुर, तालुका-माण, जिल्हा : सातारा
उच्च माध्यमिक : 11 वी, शांतिनिकेतन कॉलेज - सांगली,
उच्च माध्यमिक : 12 वी वाय. सी. सायन्स कॉलेज, सातारा
डिप्लोमा इन इंजीनीअरिंग (इलेक्ट्रिकल) : वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सांगली
संस्थापक अध्यक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष
आमदार – 23 जानेवारी 2015 कॅबिनेट मंत्री –8 जुलै 2016 पशु संवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय - महाराष्ट्र सरकार
लेखकाचे मनोगत :-
लहानपणी शाळेत ”माझा आवडता नेता” असा निबंध लिहायला सांगत असत. शिक्षक आमच्या समोर टिळक, गांधी, आगरकर नेहरू आदि नेत्यांची नावें पुढे करायचे. हे माझे नेते कसे ? हे तेंव्हा मला कळत नसे. तरीही घोकमपट्टी करीत त्यांच्यावर निबंध विद्यार्थी लिहित. मीही लिहित असे. मी त्यांना नेता म्हणत होतो, परंतु मानत नव्हतो, असा हा प्रकार होता. जानेवरी 1994 मध्ये मा. महादेव जानकर यांची भेट झाली. त्यांचे कार्य, ध्येयनिष्टा, अथक परिश्रम, संघर्ष आणि त्याग पाहिला. गेली 32-33 वर्षे ते न थांबता कार्यरत आहेत. ”माझा नेता” कोण याचे उत्तर सापडले. 19 एप्रिल 2025 या त्यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त मा. महादेव जानकर यांचे अभिष्टचिंतन करीत हा लेख आम्ही लिहित आहोत. मूळ लेख 15 मार्च 2013 रोजी लिहिला होता. नंतर 8 जुलै 2016 रोजी लिहिला. आज 19 एप्रिल 2025 रोजी त्याचे पुनर्लेखन करीत आहे.
_एस एल अक्कीसागर
महादेव जगन्नाथ जानकर
‘रानोमाळ ते विधानभवन ते थेट कॅबिनेट मंत्रीपद’
महादेव जानकर यांचा 19 एप्रिल 1968 चा जन्म. मेंढरामागे रानोमाळावर त्यांचा जन्म. मेंढपाळ निरक्षर आई – बापाचा मुलगा इंजिनिअर झाला. समाजकारणात – राजकारणात उतरला. 22 एप्रिल 1988 साली यशवंतसेनेची स्थापना झाली. इंजी. बी. के. कोकरे हे यशवंत सेनेचे संस्थापक प्रमुख नेतृत्व. 1991 मध्ये काँग्रेसच्या राजकीय षडयंत्राचे ते बळी ठरले. बी. के. कोकरे यांनी धनगर समाजाला अस्मिता, स्फुल्लिंग आणि समाज संघ दिला. पुढे 1992 सालात तरुण तडफदार महादेव जानकर यशवंतसेनाप्रमुख बनले. 31 जानेवारी 1994 रोजी यशवंतसेनाप्रमुख महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कुर्ला कोर्ट मैदानात एक सभा झाली. त्या सभेस मी उपस्थित होतो, येथेच आमची भेट झाली. तेथे महाराष्ट्राचे समांतर सरकार स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला होता. महादेव जानकर यांना त्या सरकारचे मुख्यमंत्री घोषित केले होते. दरम्यान बसपा प्रमुख कांशीराम यांची त्यांनी भेट घेतली. "मागण्याचे निवेदन देण्यापेक्षा समाज मताच्या जोरावर आमदार, खासदार, मुख्यमंत्री बनण्याचा सल्ला" कांशीराम यांनी त्यांना दिला. तेथेच I am comander not demander हा नारा यशवंतसेनाप्रमुख महादेव जानकर यांच्या डोक्यात फिट्ट बसला. शिवडी, मुंबई येथे 24 एप्रिल 1994 रोजी धनगर बहुजन विराट परिषद झाली. बसपा प्रमुख मुख्य अतिथी मार्गदर्शक होते. या सभेनंतर यशवंतसेनेची नव्याने पुनर्रचना करण्यात आली. यशवंतसेनाप्रमुख महादेव जानकर यांनी सुशिक्षित, बुद्धिवादी, नवोदित, विचारक, लेखक, पत्रकार श्री. एस एल अक्कीसागर यांची यशवंतसेना सरचिटणीसपदी नेमणूक केली. धेय्य, उद्देश, निती, लक्ष्य, दिशा आणि मार्ग घेवून यशवंतसेना मार्गक्रमण करू लागली, जागृती सभा कार्यक्रमाची अथक, धडक आणि वेगवान वाटचाल सुरू झाली. महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्याबाई होळकर, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, उमाजी नाईक, संगोळी रायन्ना सारख्या अनेक महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गांचा अवलंब केला. विद्या आणि सत्ता यातूनच विकास - प्रगती या फुले मंत्राचा अवलंब केला. राजकीय सत्ता सर्व समस्यांची गुरुकिल्ली, या आंबेडकर तंत्राचा अवलंब केला. 29 सप्टेंबर 1994 रोजी म्हसवड सातारा येथे धनगर बहुजन विराट परिषद झाली. प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून कांशीराम उपस्थित होते. यशवंत नायक या हस्तलिखित पत्रिकेचे मा. कांशीराम यांचे हस्ते उद्घाटन झाले. महादेव जानकर संपादक पत्रकार बनले. समाज विकासासाठी - परीवर्तनासाठी राजकीय 'राष्ट्रीय राजकिय पक्ष' निर्माण करण्याचा निर्णय झाला. त्यातूनच यशवंतसेनाप्रमुख महादेव जानकर 29 ऑगस्ट 2003 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बनले. 1998, 2006 {सांगली लोकसभा पोटनिवडणूक} तसेच 2009 आणि 2014 अशा 4 लोकसभा निवडणुका लढले – हरले. मा. महादेव जानकर, धनगर माळी ते मराठा–मातंग मुस्लीम ते ब्राह्मण अशा राष्ट्रीय समाजाचा महाराष्ट्राचा नेता – राष्ट्रीय नेता बनले. जानेवारी 2015 मध्ये आमदार बनले. जुलै 2016 मध्ये मंत्री बनले. या दरम्यान 2019 लोकसभा निवडणूक न लढल्याने वाया गेली. 2024 लोकसभा निवडणूक परभणी मधून मा. महादेव जानकर यांनी लढवली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोट्यातून महायुतीतर्फे राष्ट्रीय समाज पक्षाच्या ए. बी. फॉर्मवर आणि स्व-चिन्हावर (शिट्टी) निवडणूक लढवली. अटीतटीच्या लढतीत पराभव झाला. पुढे 2024 विधानसभा स्वबळावर लढवली. एकूण 117 जागा लढवल्या. एक आमदार गंगाखेड मधून निवडून आला. स्वतंत्र आणि स्वाधीन पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष उभा ठाकला. हा पक्षाचा नव जन्मच होता.
राष्ट्र का नेता कैसा हो ! महादेव जानकर जैसा हो !!
महादेव जगन्नाथ जानकर लाखात एक नव्हे तर करोडोत एक असे व्यक्तिमत्व आहेत. उच्च ध्येय, दूरदृष्टी, स्पष्ट लक्ष्य, सातत्यपूर्ण कार्यक्रम, राजकीय ध्येयवाद, अथक परिश्रम, त्याग, संघर्ष तसेच ज्ञान आणि नितिचा उत्कृष्ट संगम म्हणजे महादेव जानकर. मेंढरामागे भटकणाऱ्या माता गुणाबाई आणि पिता जगन्नाथ यांच्या पोटी साताऱ्याच्या एका रान माळावर ‘महादेव’चा जन्म झाला. गावी, तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत इंजिनियर झाला. कॉलेज जिवनापासून नेतृत्व करणारे महादेव जानकर 1992 साली ‘यशवंतसेनाप्रमुख’ बनले. भटकंती करणाऱ्या माता - पित्याचा तरुण पुत्र महादेव जानकर समाजकारणासाठी - राजकारणासाठी भटक्या बनला. चांगली नोकरी करुन सुखाचा संसार थाटन्याचे सोडून, तारुण्य सुलभ भावनेचा त्याग करुन “समाजाचा संसार” थाटण्याचा निर्धार केला. “घरी जाणार नाही," नाते - संबंध ठेवणार नाही, लग्न करणार नाही आणि ‘राष्ट्रीय समाज’ ला सत्ता, संपत्ती, सन्मान मिळवून देण्यासाठी आजन्म कार्यरत राहीन" अशी भीष्म प्रतिज्ञा ‘महादेव’ने घेतली. एका खडतर प्रवासाचा आरंभ महादेव जानकर यांनी सुरु केला. 1992 ते आजतागायत ते या शपथेस जागले. यशवंतसेनेला त्यांनी केडर बेस्ड, मास बेस्ड, ब्रॉड बेस्ड बनविले.
राजकारण हेच समाजकारणासाठी सर्वात मोठे साधन
राजकारण हेच समाजकारणासाठी सर्वात मोठे साधन मानून महादेव जानकर कार्यरत राहिले. त्यातुनच 29 ऑगस्ट 2003 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. राष्ट्रीय समाजाला, त्यातही उपेक्षित - दुर्लक्षित बहुजन समाजाला, ओबीसी - आदिवासी - दलित- अल्पसंख्याक समाजाला सत्तेत घेवून जाणे, हे मुख्य लक्ष्य केले. त्यासाठी देशातील ‘सर्वात मोठी पॉवर’ ज्या ठिकाणी आहे, प्रामुख्याने संसद भवन - दिल्ली” ला लक्ष्य करुन आणि “विधान भवन – मुंबई, महाराष्ट्र तसेच (देशातील अन्य राज्यातील विधानभवने) लक्ष्य करून वाटचाल सुरु केली. सत्य शोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्रसंघटन हे प्रमुख त्रिसूत्र केले. त्यासाठी अनेक जागृती कार्यक्रम राज्य तसेच देशपातळीवर घेतले. प्रारंभी 2004 सालच्या फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील शिवाजी पार्कवर स्वराज्य रॅलीचे यशस्वी आयोजन केले गेले. ग्रामपंचायत ते विधानसभा - लोकसभा लढविल्या आणि जिंकल्या. 2009 साली आपल्या पक्षाचा एक आमदार निवडून आणला. स्वत: महादेव जानकर यांनी सर्वप्रथम 1998 साली नांदेड लोकसभा लढविली, तीन नंबर’ची मते मिळवली. 2006 साली सांगली लोकसभा पोट निवडणुक लढविली. राष्ट्रीय समाज पक्षाने सर्वप्रथम 2004 सालच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीतुन संसदीय लढाईत प्रवेश केला. महाराष्ट्र - 11 आणि कर्नाटक - 1 जागा स्वबळावर लढविल्या. पहिल्याच निवडणूकीत दिड लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्र राज्यात 10 व्या ‘नंबर’ची पार्टी ठरली. पुढे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत दिड लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्र राज्यात 8 व्या नंबर’ची पार्टी ठरली. 2006 साली महादेव जानकर यांनी सांगली लोकसभा लढविली, तिसऱ्या नंबर’ ची मते मिळवली. 2009 साली रासपने महाराष्ट्र – 29 आणि कर्नाटक –1, आसाम – 1, गुजरात -1, बिहार -1 अशा एकूण 5 राज्यातून 34 लोकसभा जागा स्वबळावर लढविल्या. स्वत: महादेव जानकर यांनी माढा येथून शरद पवार विरुद्ध निवडणूक लढवून लाखभर मते मिळवली. एकूण 2 लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्रात 5 व्या नंबर’ची पार्टी ठरली. नंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत 1 आमदार सहित 2 लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्रात 5 व्या नंबर’ची पार्टी ठरली. रासपचे अनेक पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, तालुका पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. 2014 साली महादेव जानकर यांनी बारामती लोकसभेमधून सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात साडे चार लाखापेक्षा अधिक मते मिळवून खऱ्या अर्थाने बाजीगर ठरले. पुढे जानेवारी 2015 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदचे आमदार बनले. 5 जानेवारी 2018 रोजी श्री एस एल अक्कीसगर यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. याच 2018 साली गुजरात राज्यातून वडोदरा, कर्जन आणि पादरा पालिकेतून 28 नगरसेवक निवडून आले. गुजरात विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यात राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात 7 व्या नंबरचा पक्ष ठरला. गुजरात विधानसभा निवडणूकीत वडोदरा मतदार संघातून राज्याचे पक्षाध्यक्ष राजेश आयरे (माजी अध्यक्ष गुजरात) यांनी कडवी झुंज दिली. त्यांनी तीन नंबरची मते मिळवली. दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यात पक्ष उभारणी केली. पक्ष जोमाने वाढू लागला. गोवा, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, बिहार, उत्तराखंड, हरियाना, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश या राज्यात पक्ष मूळ धरू लागला, वाढू लागला. आता आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यात विस्तारत आहे. रासप ही खऱ्या अर्थाने जन-पार्टी आहे. निष्ठावान कार्यकर्ते आणि जनतेचा निधी यावर रासपने इथपर्यंत प्रवास केला. महादेव जानकर सारखे त्यागी तसेच सक्षम नेतृत्व यांच्यामुळे रासपा महाराष्ट्रात महायुतीपर्यंत पोहोचली. देशात एन.डी.ए. मध्ये सहभागी होण्याएवढी सक्षम बनली. राज्यातील आणि देशातील मोठया नेत्यांबरोबर महादेव जानकर बसू लागले, बोलू लागले. रानोमाळ मेंढरामागे भटकंती करणाऱ्या महादेव जानकर यांचे हे कार्य निश्चितच सामान्य कार्य नव्हते व नाही. ते एक मोठे कार्य होते. एक नेता म्हणून त्यांचे हे एक मोठे यश होते. आमदार - खासदार - मंत्री - मुख्यमंत्री - प्रधानमंत्री पेक्षा ‘नेता’ मोठा असतो. तात्पर्य महादेव जानकर एक नेता आहेत. एक ‘राष्ट्रीय’ नेता आहेत. आपल्या पक्षाला ‘राष्ट्रीय’ समाज पक्ष, असे नाव महादेव जानकर यांनी दिले.
सत्य शोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन ही मार्गसुत्री.
जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश या ना त्या कारणाने भारत देशाला विभागले आणि तोडले जात असताना ‘राष्ट्र’ हे सर्वात मोठे असे मानणारा समाज म्हणजे ‘राष्ट्रीय समाज’ आणि अशा राष्ट्रीय समाजाची पार्टी म्हणजे राष्ट्रीय समाज पार्टी, असे सांगत संसदीय लोकशाही राजकारणात महादेव जानकर यांनी प्रवेश केला. राष्ट्र हि देव राष्ट्र हि धर्म हमारा, राष्ट्र बने बलशाली भाषा सुत्र हमारा ! ही आमच्या पक्षाची सोशो – पोलिटिकल फिलॉसिफी (समाज – राजकीय विचारधारा) आहे. सत्य शोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन ही आमची मार्गसुत्री आहे. संपूर्ण राष्ट्रीय विकास आणि समान राष्ट्रीय भागीदारी हा आमचा राजकीय अजेंडा आहे. राष्ट्र सर्वांपरी मानणारा समाज – राष्ट्रीय समाज हा आमच्या पक्षाचा सामाजिक आधार आहे. ब्राह्मण - मराठा ते जैन - दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाला आम्ही राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतो. एकात्म राष्ट्र निर्माण हे आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि वाहन बनविले आहे. संपूर्ण देशभरात महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे. राज-पुत्र ते राजा, असा महादेव जानकर यांचा प्रवास नसून तो ‘रानोमाळ ते विधानभवन - कॅबिनेट मंत्रिपद’ असा आहे. दिनांक 8 जुलै 2016 रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचे पशू संवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री बनले. तर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यमंत्री दर्जा पदावर बसविले. मंत्रिपदाच्या जोरावर अनेक सामाजिक उपक्रम राबविले. पक्ष आणि कार्यकर्ते यांना भारतीय जनतेत सन्मानपात्र बनविले. त्यांचा हा प्रवास केवळ ‘दैदीप्यमान’ आहे. महाराष्ट्र राज्याचे मा. महादेव जानकर मंत्री बनले तरी संसद भवन दिल्ली व पंतप्रधानपद हेच त्यांचे लक्ष्य आहे. त्यामुळे महादेव जानकर यांच्याशी इतर नेत्यांची तुलना होवू शकत नाही. महादेव जानकर हे एकमेव “महादेव - जानकर” आहेत. त्या सम फक्त तेच एकमेव आहेत.
नव अभिमन्युला साथ देता आली नाही तरी कोणी जयद्रथ बनू नये.
त्यानंतर मधल्या काळात 2014 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. महादेव जानकर यांना ‘माढा’ लोकसभा ऐवजी बारामती आपले ‘कुरुक्षेत्र’ करावे लागले. आधुनिक युगातील महा-भारताचे चक्रव्युह भेदु पहाणाऱ्या नव अभिमन्युला साथ देता आली नाही, तरी कोणी जयद्रथ बनू नये, अशी कळकळीची विनंती - आवाहन, त्यावेळी प्रस्तुत लेखकाने समाज बांधवांना केले होते. राज-पुत्र ते राजा असा महादेव जानकर यांचा प्रवास नसून तो रानोमाळ ते राजभवन असा आहे. महादेव जानकर हे एकमेव “महादेव - जानकर” आहेत. त्या सम फक्त तेच आहेत, दूसरा कोणी नाही, असे सांगत मा. महादेव जानकर आपल्या इप्सित ध्येयाप्रत लवकरात लवकर पोहोचो, अशी सदिच्छाही त्यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केली होती. मधल्या काळात 2014 साली दिल्लीत एनडीएचे तर मुंबईत भाजपा –शिवसेना – रासपा – रिपाई युतीचे सरकार सत्तेवर आले. मा. महादेव जानकर महाराष्ट्र विधानभवन मध्ये पोहोचले. आमदार – मंत्री बनले. स्वपक्षाच्या – राष्ट्रीय समाज पक्षाच्या बळावर मा. महादेव जानकर महाराष्ट्राच्या मंत्रीपदावर पोहोचले. रानोमाळ माण सातारा व्हाया चोंडी करीत मा. महादेव जानकर मुंबईत पोहोचले. दिल्लीला जवळ केले.
राष्ट्रीय समाज पक्ष एक आगळा–वेगळा पक्ष
31 मे 2003 रोजी पक्षाची घोषणा केली. त्याचवर्षी 29 ऑगस्ट 2003 रोजी पार्टी रजिस्टर झाली. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये तालुका पंचायत निवडणूक जिंकली, पहिला विजय मिळवला. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई मधून येल्डा पंचायत समितीत रासपाचा पहिला उमेदवार निवडून आला. येल्डा पॅटर्न म्हणून तो गाजला. राष्ट्रीय समाज पक्षाने 2004 सार्वत्रिक लोकसभा निवडणुक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात लढवली. त्यानंतर आजपर्यंतच्या सर्व लोकसभा लढवल्या. 2009 साली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम आणि बिहार राज्यातून लढवली. 2014 साली पक्षअध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा क्षेत्र मधून निवडणूक लढवून राष्ट्रीय समाज पार्टीने तर इतिहास निर्माण केला. महादेव जानकर कार्यकर्ता पासून नेता बनले. त्यांचे कार्यकर्ता देखील हजारो - लाखोत एक आहेत. जैसा नेता वैसा कार्यकर्ता आहेत. या कार्यकर्त्यात सर्व जाती, धर्म, भाषा, प्रदेश तथा राज्याचे लोक आहेत. गणतंत्र भारत अजून खऱ्या अर्थाने जनतंत्र बनले नाही, लोकशाही भारतात अजून राजतंत्र आहे, घराणेशाही आहे. आणि ही घराणेशाही सर्व देशातील सर्व छोट्या- मोठ्या पार्टीत दिसून येते. परंतु राष्ट्रीय समाज पक्ष मात्र यात आगळा–वेगळा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राहुल जी यांना माता सोनिया जी समोर बराच काळ वाट पाहायला लागली. परंतु संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद (5 जानेवारी 2018 रोजी) श्री एस एल अक्कीसागर यांचेकडे मोठ्या विश्वासाने आणि सन्मानाने सोपविले. श्री. एस एल अक्कीसागर
मूलत: कर्नाटक राज्याचे आहेत. कर्नाटक त्यांची मातृ- पितृ भूमी आहे. त्यांची जन्मभूमी जबलपूर मध्यप्रदेश आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. श्री अक्कीसागर यांनी तीन - साडे तीन वर्षे अध्यक्षपद सांभाळले. एकुण 17 राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष पोहोचला आहे. 13 राज्यात पक्ष राज्य कार्यकारिणीचे गठण झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या 4 राज्यात नोंदणीकृत पक्ष बनला आहे. महाराष्ट्रात 2 मंत्री बनले, एक एमएलए आणि एक एमएलसी आहे. महाराष्ट्रात 100 पेक्षा अधिक स्थानिक स्वराज संस्थेत पक्ष सदस्य निवडून आले आहेत. गुजरात राज्यात 28 सदस्य निवडून आणले. राजनीतीचा कसलाच इतिहास नव्हता, अनुभव नव्हता. साधन कमी होते, तरी कमी वेळेत महादेव जानकर आणि त्यांच्या पार्टीने जी राजनीतिक सफलता प्राप्त केली आहे, ती केवळ एकमेव अद्वितीय आहे. भारतीय राजनितिज्ञ किंवा पत्रकारिता मानो या ना मानो, परंतु हे वास्तव मात्र कोणी खोटे ठरवू शकत नाही. आणि हे सर्व आपला नेता, आपला पक्ष, आपला कार्यकर्ता, आपले साधन, आपला अजेंडा याच्या जोरावर राजनीतिक सफलता प्राप्त केली आहे. ऐऱ्या- गऱ्या आणि दुसऱ्या कोणी बनविलेल्या रेडीमेड पार्टीतून एमएलए, एमपी, मंत्री, प्रधानमंत्री बनणे सोपे आहे. परंतु आपली पार्टी बनवून आपल्या बळावर – स्वबळावर अशा प्रकारची सफलता प्राप्त करणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. अविचल निश्चय - निर्धार, असीम निष्ठा - विश्वास आणि संपूर्ण त्याग - समर्पण ( DETERMISSION, DEVOTION & DEDICATION ) हे महादेव जानकर यांचे गुणविशेष आहेत. आज राष्ट्रीय समाज पक्ष देशात ओळखपात्र, दखलपात्र पक्ष बनला आहे. हे सर्व मा. महादेव जानकर यांच्या स्वतंत्र, स्वाधीन आणि कुशल नेतृत्वाआधीन झाले आहे.
2014 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कुरुक्षेत्र : दिल्ली संसद भवन जाण्याचे गेट उघडले...
“बारामती लोकसभा क्षेत्रमें शरद पवार की बेटी सुप्रियाताई सुळे–पवार को पराजित करके मै ‘जायंट किलर’ साबित हूँगा; 2014 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कुरुक्षेत्र रणसंग्रामात महादेव जानकर यांनी घोषणा केली होती. यापूर्वी तीन लोकसभा निवडणुका हरणारे महादेव जानकर या निवडणुकीतही हारले, परंतु त्यांच्यासाठी संसदीय राजनीतीचे दरवाजे उघडले गेले. नेता महादेव जानकर तसेच राष्ट्रीय समाज पार्टीचे मुंबई विधानसभा आणि दिल्ली संसद भवन जाण्याचे गेट उघडले गेले. राजमाता अहिल्या जन्मभूमी चोंडी हे “गेट वे ऑफ मुंबई” आणि महात्मा फुले मुळगाव कटगुण हे "गेट वे ऑफ दिल्ली” हा राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्षाच्या स्थापना दिन पासून नारा होता. तो खरा होताना दिसत होते. परंतु त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातून युती सरकार गेले, आघाडी सरकार आले आणि याचे श्रेय शरद पवार यांच्या प्रचार सभांना दिले गेले. परंतु तत्पूर्वी 2014 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय समाज पार्टी अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीत रोखून ठेवले होते. महादेव जानकर सुप्रिया सुळे - पवार यांच्या तुलनेत पॉवरफुल साबित होताना दिसत होते. किंबहुना महादेव जानकर यांची जीत निश्चित मानली जात होती. अशा विवशतापूर्ण अवस्था आणि नामुष्की भय कारणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीमध्येच तळ ठोकणे भाग पडले. परिणामी महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा सुपडा साफ झाला. दिल्लीमध्ये मोदी सरकार पुन: प्रस्थापित झाले. पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकून युती सरकार स्थापित झाले.
महारानी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी वर्ष !
राजमाता अहिल्यादेवी मन बल बुद्धी देवो..
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये ना. महादेव जानकर आणि त्यांची राष्ट्रीय समाज पार्टी यांना डावलण्याचे किंबहुना संपविण्याचे काम केले गेले. परिणामी काँग्रेसमुक्त भारतची भाषा करणाऱ्या भाजप नेतृत्वाखालील युती सरकार पडले आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसयुक्त अशा महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. रासपाचा एक आमदार श्री रत्नाकर गुट्टे गंगाखेड येथून विजयी झाला. सिंह गेला पण गड वाचला. नामुष्की टळली. आणि राष्ट्रीय समाज पक्ष अ-भेद्द्य ठरला. एका बिकट राजकीय परिस्थितीमुळे रासपला महाराष्ट्रात 2019 लोकसभा निवडणूक न लढवता आल्याने ती टर्म वाया गेली. 2019 साली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या 6 राज्यात लढविली. (महाराष्ट्र राज्यातून मात्र लोकसभा लढली नाही) याप्रकारे महाराष्ट्र व्यतिरिक्त 6 राज्यात लोकसभा लढवून आपले अस्तित्व जिवंत ठेवले. महात्मा फुलेवाडा पुणे महाराष्ट्र ते संगोळी रायान्ना समाधीस्थळ नंदगड कर्नाटक समाज संगम राज यात्राचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र आणि देशभरात कनेक्ट इंडिया - स्वराज्य रॅलीचे आयोजन केले गेले. महाराष्ट्रातील मुंबई माढा परभणी सह अनेक अनेक जिल्ह्यातून जन स्वराज यात्रा काढली. दिल्ली, उत्तर प्रदेश कर्नाटक राज्यात देखील जन स्वराज यात्रा काढली गेली. महाराष्ट्रात 2019 लोकसभा निवडणूक न लढवता आल्याने आलेली मरगळ निघून गेली. 2024 लोकसभा निवडणूक परभणी मधून मा. महादेव जानकर यांनी लढवली. अजित पवार राष्ट्रवादी कोट्यातून महायुती तर्फे राष्ट्रीय समाज पक्षाच्या ए बी फॉर्म आणि चिन्हावर लढवली. अतितटीच्या लढाईत पराभव झाला. पुढे 2024 विधानसभा स्वबळावर लढवली. 117 उमेदवारी अर्ज दाखल झाले, 92 जागा लढवल्या. एक आमदार गंगाखेड मधून निवडून आला. 2019 सार्वत्रिक निवडणूकीत एनडीएची दिल्लीची सत्ता शाबूत राहिली. परंतु महादेव जानकर यांचे नेतृत्व आणि रासपला अपशकून केला गेला. परिणामी मुंबईची सत्ता गेली होती. 2024 विधानसभा निवणुकीत भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचे बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. मनसे सकट अनेक पक्षाचे एक ही सदस्य निवडून आले नसताना, सभागृहात राष्ट्रीय समाज पक्षाचे एक सदस्य आहेत, जे पक्षाचा बी फॉर्म आणि पक्षाच्या निवडणुक चिन्हावर सदस्य बनले आहेत, पक्षाचा गड महाराष्ट्र विधानसभेत लढवीत आहेत. हार जीत होत असते. थोरले पवार आणि धाकटे पवार वादात परभणी लोकसभा ताब्यात घेण्याची एक मोठी संधी मिळाली होती. या सुवर्ण संधीचा फायदा घेता आला नाही, हे वास्तव नाकारता येत नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजला आहे. कार्यकर्ता, कौशल्य साधने आणि परिस्थिती यश ठरवते. देव आणि दैव अनाकलानिय असते. कोठे चुकलो याचा शोध आणि बोध घेणे हे पक्षाचे विशेषतः पक्ष नेतृत्वाचे मुख्य कर्तव्य आणि जिम्मेदारी असते आणि आहे, हे आता तरी अमान्य करून चालणार नाही. पक्षाला आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण, आत्मसमीक्षण आणि त्यानुसार कार्यक्रमण करण्याची गरज निर्माण झाली आहे. महारानी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष आहे. 31 मे 2003 रोजी राजमाता अहिल्या जन्मभूमी चोंडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झाला. 14 जानेवारी 2014 या संक्रमण दिवशी युतीत सामिल झाला. पक्ष पुढेच पुढे कालक्रमण करू लागला. परंतु 2024 साली मात्र पुनः त्यावेळच्या मूळ अवस्थेत पोहोचला असल्याचे दिसत आहे. महारानी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष निमित्ताने राजमाता अहिल्या जन्मभूमी चोंडी येथून 19 एप्रिल या राष्ट्रीय समाज दिवसी राष्ट्रव्यापी स्वराज महारॅली चलो दिल्ली चा नारा देत तालकटोरा स्टेडियम दिल्लीकडे रवाना झाली आहे. अर्थात येथून पुढे मा. महादेव जानकर आणि त्यांची राष्ट्रीय समाज पार्टी स्वतंत्र आणि स्वाधिनतेच्या स्वबळावर आपले सरकार कसे स्थापन करता येइल, या दिशेने वाटचाल करीत राहील, अशी अपेक्षा आहे. महारानी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष निमित्ताने, राष्ट्रीय समाज पक्षाला राजमाता अहिल्यादेवी मन, बल, बुद्धी देवो, हेच साकडे..
कोरोना काळ आणि रासप...
2020 सालापासून कोरोना या जागतिक आपत्तीचा आपण सर्वांनी सामना केला. या महासंकटाशी सामना करीत मानव समूहाने केवळ आपले अस्तित्वच राखले नसून विस्मयकारक अशी प्रगतीही साधली आहे. मानवाला हजारो – लाखो वर्षाचा इतिहास आहे. प्रगती साधत असताना काही वृत्ती – काही मानव समूह निसर्गाला शह देत जगावर – बहुसंख्यांक मानव समुहावर सत्ता, संपत्ती, साधने आणि बुद्धीच्या जोरावर अनैसर्गिक वर्चस्व निर्माण करू पाहत आला आहे. तरी जगात पूर्वीही, आज-अजूनही सत्तप्रवृत्तीची माणसे आणि मानव समुह अस्तित्वात आहेत. त्यामुळे कोरोना संकटावर मानव समाजाने मात केली, यात शंका नाही. त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मा. महादेव जानकर यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळुन सक्रिय सहभाग दाखवून कोरोनाग्रस्तांसाठी 35 लाख रुपयाची सहयोग राशी दिली होती.
मुझे इस देशपर मुझे राज करना है. देश का प्रधानमंत्री बनना है - महादेव जानकर
उपेक्षित, शोषित, दलित, मागास, मायनॉरिटी आणि दुर्लक्षित अशा समाज वर्गाला - राष्ट्रीय समाजाला सत्ता, संपत्ती आणि सन्मान मिळवून देण्यासाठी रासपाचा जन्म झाला आहे. दिल्ली संसद भवन म्हणजे सत्तेचे सर्वात मोठे मंदिर असल्याचे आधुनिक लोकशाही भारताचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत. अर्थात मा. महादेव जानकर यांना आता ‘संसद भवन दिल्ली’ गाठायची आहे. रासपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक वर्ग 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर यांचा वाढदिवस ‘राष्ट्रीय समाज दिवस’ म्हणून साजरा करीत असतो. याच दिवशी रासपासाठी संपूर्ण सत्ता प्राप्तीचा संकल्पहि हा वर्ग करतो. सर्व प्रकारचे अडचणी –विरोध पार करून मा. महादेव जानकर आपल्या इप्सित ध्येयाप्रत लवकरात लवकर पोहोचो, अशी सदिच्छा राष्ट्रीय समाज नायक महादेव जानकर यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त (19 एप्रिल 2025) व्यक्त करतो आणि पुढील कार्य-क्रमाना मनापासून शुभेच्छा देतो..
"इस देशपर मुझे राज करना है. देश का प्रधानमंत्री बनना है." इसलिए संसद भवन मेरी पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष का लक्ष्य बनाया है. महादेव जानकर के ये बयान है. 32 सालसे ये उनका नारा रहा है, लक्ष्य रहा है. मुंबई के असेंब्ली - विधानसभा मे महादेव जानकर और उनकी पार्टी पहुंची. उन्हे अब संसद भवन दिल्ली पहुंचना है, और हम सबको मिलकर संसद भवन दिल्ली पहुंचाना है...
आज, राष्ट्रीय समाज दिवस है,
आये, हम सब संकल्प करे...
19 एप्रिल का दिवस !
महादेव जानकर जन्म दिवस!
राष्ट्रीय समाज दिवस!!
राष्ट्रीय समाज भारत का,
भारत राष्ट्रीय समाज का !
भारत पर अब राज नही चलेगा गैरोंका !!
राष्ट्रीय समाज दिवस है ! आऐ हम सब संकल्प करे,
कॉंग्रेस, भाजपा तथा और पार्टी के प्रधानमंत्री इस गेट से गये.
अब संसद भवन दिल्ली को इंतजार है...
बालक चंद्रगुप्त को राष्ट्रीय समाज पार्टी के प्रधानमंत्री का !
जितना बडा संघर्ष, उतना बडा फल.
पार्टी के नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता तथा हितचिंतक गौर करे...
जितना जादा कार्य, गती
उतना लक्ष्य नजिक समय कम!
तो चले लक्ष्य की ओर...
राष्ट्रीय समाज पक्ष !
संसद भवन लक्ष्य !!
19 एप्रिल का दिवस !
महादेव जानकर जन्म दिवस!
राष्ट्रीय समाज दिवस!!
राष्ट्रीय समाज भारत का,
भारत राष्ट्रीय समाज का !
भारत पर अब राज नही चलेगा औरोंका !!
आज, राष्ट्रीय समाज दिवस है,
आवो, हम सब मिलकर संकल्प करे...
रासपा को दिल्ली भेजना है !
जानकर महादेव को प्रधानमंत्री बनाना है !!
राष्ट्रीय समाज नायक महादेव जगन्नाथ जानकर
जन्म जयंती दिवस निमित्त तमाम राष्ट्रीय समाज बंधू आणि भगिनींना...
राष्ट्रीय समाज दिवसमय हार्दिक – हार्दिक शुभेच्छा !
लेखन – संकलन:-
श्री. एस.एल.अक्कीसागर
संस्थापक अध्यक्ष, ऑल इंडिया रिजर्व बैंक ओ.बी.सी एम्पलॉइज वेलफेअर असोसीएशन
संस्थापक अध्यक्ष, रिझर्व बैंक एस.ई.बी.सी. / ओ.बी.सी एम्पलॉइज असोसीएशन, मुंबई
कार्यकारी संपादक : विश्वाचा यशवंत नायक ( 29 सितम्बर 1994 से)
लेखक – सत्यशोधक दंडनायक - संत कनकदास (31 मई 2005)
सदस्य, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल, दिल्ली
सदस्य, श्री कागिनेली महासंस्थान कनक गुरुपीठ, कर्नाटक
माजी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष (05.012018 से 29.08.2021)
संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशन रा-सेफ (2010 से )
(मो. 9969608338) Email ID : sidsagar1956@gmail.com: मुंबई, दि. 19.04.2025
No comments:
Post a Comment