राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीची दिल्लीकडे आगेकूच
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश सीमा ओलांडून हरियाणा राज्यात प्रवेश
मुंबई |आबासो पुकळे (२४/५/२०२५) : राष्ट्रीय समाज का नारा ! 31 मे चलो दिल्ली, तालकटोरा मैदान की ओर !! असे म्हणत महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगाव चौंडीतून दिनांक १९ एप्रिल पासून निघालेली राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली महाराष्ट्र राज्यात राज्यभर फिरल्यानंतर मध्यप्रदेश राज्यात पोहचली. मध्य प्रदेश राज्यात ठिकठिकाणी महारॅलीचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात नागरिकांनी स्वागत केले. उज्जैन, शिवपुरी, कोलारस, ग्वाल्हेर, भिंड, गुना, मुरैना, मंदसौर जिल्ह्यात शेकडो नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीची दिल्लीकडे आगेकूच केली असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश सीमा ओलांडून हरियाणा राज्यात प्रवेश केल्याचे, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी कळविले आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महादेव जानकर यांची दिल्लीवर स्वारी धडकणार आहे, तर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित राहतील का? हे पहावे लागेल. उत्तर प्रदेश रासपने समाज माध्यमात दिलेल्या प्रचार पत्रिकेत राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांचे फोटो आहेत.
रासप पदाधिकाऱ्यांनी महेश्वर येथील राजवाड्यावर जाऊन राजगादीस पुष्पहार अर्पण करून मातोश्री अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधीस्थळी असणाऱ्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. इंदौर येथे महाराणी अहिल्याबाई होळकर राजवाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्वराज महारॅलीचे 'होळकर ट्रस्टतर्फे' स्वागत करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू येथे अभिवादन करण्यात आले. इंदौर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव पंजाबसिंह बघेल यांनी स्वागत केले. इंदौर येथून पुढे उज्जैनकडे स्वराज महारॅली रवाना झाली. भानपुरा येथे महाराज यशवंतराव होळकर यांच्या समाधीस्थळी, तसेच 20 मे रोजी होळकरशाहीचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधीस्थळी स्वराज्य महारॅलीने पुष्पांजली वाहून अभिवादन केले, असे यशवंत नायकशी बोलताना, मध्यप्रदेश राज्य प्रभारी प्राणसिंह पाल यांनी सांगितले. मुरैना मध्य प्रदेश येथील युवा उद्योजक सागर बघेल यांनी मध्यप्रदेश राजस्थानच्या (चंबळ नदी) सीमेपर्यंत रॅली बरोबर येऊन निरोप दिला. राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीचा राजस्थान राज्यात प्रवेश केल्याचे राष्ट्रीय समाज पक्ष प्रतिनिधी कळवतात.
स्वराज महारॅली का नेतृत्व करनेवाले राष्ट्रीय समाज पार्टी के बुजुर्ग नेता राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा ने बताया, "दो दिन उत्तर प्रदेश राज्य के आगरा, मथुरा, वृंदावन, गोवर्धन मे रॅली का स्वागत हुआ! आज सुबह गोवर्धन से हरियाणा होडूल मे हरियाणा राष्ट्रीय समाज पार्टी के पदाधिकारियोने रॅली का स्वागत किया" ! हरियाणा राज्यमे स्वराज महारॅलीने एन्ट्री किया |महारॅली समवेत रासपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक मामा रुपनवर, मुंबई प्रदेश सदस्य अंकुश अनुसे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे आदी पदाधिकारी आहेत.
No comments:
Post a Comment