दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकणाने मारली बाजी
मुंबई| इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून, राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पालकांना आणि मुलांना निकाल पाहता येणार आहे.
विभागवार निकाल खालीलप्रमाणे :
- कोकण : ९८.८२ टक्के
- कोल्हापूर : ९६.८७ टक्के
- मुंबई : ९५.८४ टक्के
- पुणे : ९४.८१ टक्के
- नाशिक : ९३.४ टक्के
- अमरावती : ९२.९५ टक्के
- छ.संभाजी नगर : ९२.८२ टक्के
- लातूर : ९२.७७ टक्के
- नागपूर : ९९.७८ टक्के
यंदाही राज्यात मुलीच आघाडीवर
यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला असून, कोकण विभागाने पहिल्या नंबरवर असून, कोकणाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका लागला असून, यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. यात मुलींचा निकाल 96.14 टक्के तर, मुलांचा निकाल 92.31 टक्के इतका लागला आहे.
No comments:
Post a Comment