Sunday, May 18, 2025

भटके विमुक्त समाजाला दाखले देण्यासाठी महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करा : ना. बावनकुळे

भटके विमुक्त समाजाला दाखले देण्यासाठी महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करा : ना. बावनकुळे 



#mumbai #भटके #विमुक्त #nomedictribe 

मुंबई (१५/५/२०२५) : भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करावे. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध होईल अशाप्रकारे १५ मागण्यांबाबतचे निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतले. बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह राज्यातील भटके विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

भटक्या समाजासाठी घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे :

 • जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात येणार.

• शाळा, महाविद्यालयात मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात दाखले द्यावेत.

• १९६१ पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र द्यावे.

• भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसिलदारामार्फत ओळखपत्र द्यावे.

• विविध दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे.

• १९५२ चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा.

• आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय देण्यात यावा.

• तात्पुरते रेशनकार्ड देण्याऐवजी कायमस्वरुपी देण्यात यावे.

• सरकारी किंवा खासगी जमिनीवर वसलेल्या भटके समाजाचे सर्वेक्षण करावे.

• भटक्या समाजाला रेशनकार्ड देण्यात यावे.

• भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार.

• जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी सादर करावी.

• अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करुन तिची बैठक घेणार.

• भटके विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे उपलब्ध करुन देणार.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025