राजधानी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे आयोजन
३१ मे रोजी दिल्लीत भव्य दिव्य जयंती सोहळ्यास उपस्थित रहावे; महादेव जानकर यांचे आवाहन
मुंबई (१८/५/२५) : देशाची राजधानी दिल्लीत महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राष्ट्र उभारणीच्या कार्यात महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे काम मोठे आहे. केवळ हिंदू समाजासाठीच नाही तर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध सर्व जाती धर्मियांसाठी देशभरात अहिल्याबाईंनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. भव्य दिव्य अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती सोहळ्यास देशभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने जनजागृती करत स्वराज महारॅली काढली आहे. महारॅली महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश व्हाया दिल्ली असा मोठा प्रवास करणार आहे. दिनांक ३१ मे रोजी दिल्ली तालकटोरा मैदान चलो अशी हाक रासपाने दिली आहे.
रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यशवंत नायकशी बोलताना म्हणाले, महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावात चौंडी येथे अंखड देशातली पहिली जयंती महादेव जानकर यांनी साजरी करत नवा इतिहास रचला. आज सत्ताधारी /विरोधी पक्षतर्फे देशभरात ठिकठिकाणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, पार पडत आहेत, यापाठीमागे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे काम आहे. आदर्श सर्वजण कल्याणकारी महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सर्व धर्मियांसाठी देशभरात कार्य केलेले केले आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा देशाचा सर्वांगीण विकासाचा आदर्श राजकीय वारसा घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष मार्गक्रमण करत आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाने अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त दिल्लीसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. होळकरशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या तालकटोरा मैदान दिल्ली येथे स्वराज्य महारॅलीचा समारोप होईल. रासप आयोजित महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त स्वराज्य महारॅलीस देशभरातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींना आमंत्रित केल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले आहे. जास्तीत संख्येने दिल्लीची महारॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रासपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment