नांदेड जिल्ह्यात महाराणी अहिल्याबाई होळकर यांची स्वराज रथयात्रा चौंडी ते दिल्लीकडे जात असताना ठिक ठिकाणी स्वागत..
नांदेड (प्रतिनिधी) : महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीमोहत्सव निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान चौंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर येथून १९ एप्रिल २०२५ रोजी सुरूवात करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उतर प्रदेश करून ३१ में २०२५ रोजी तालकोटोरा मैदान दिल्ली येथे पोहचणार आहे. दिनांक ९ व १० मे रोजी नांदेड जिल्ह्यात माळेगांव यात्रा, लोहा, कंधार, मुखेड, देगलुर, नर्सी, नांदेडमार्गे भोकर मुक्कामी. दुसरे दिवशी भोकर, तामसा, हदगाव, वारंगा, आर्दापुर, मालेगावमार्गे हिंगोली जिल्ह्याकडे प्रस्थान झाले.
महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या रथ यात्रेचे गावोगावी स्वागत करण्यात आले.
रथ यात्रे सोबत गोविंदराम शूरनर, राष्ट्रीय संघटक रासपा, ज्ञानेश्वर सलगर, महाराष्ट्र प्रदेश महासचिव, विनायक रूपनवर पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, अनिल शेंडगे सोलापूर जिल्हाध्यक्ष, विकास आलदर सोलापूर जिल्हाध्यक्ष, अश्रुबा कोळेकर मराठवाडा अध्यक्ष, अंकुश अनुसे मुंबई प्रदेश सदस्य, दत्ता कौठकर रासपा कार्यकर्ता पुणे, दिलावर रथ चालक रासपा कार्यकर्ता, सुर्यकांत गुंडाळे, रासपा कार्यकर्ता यांच्यासह रथासोबत चार गाड्या होते, असे आर. जे तुडमे शहराध्यक्ष नांदेड हे कळवितात.
No comments:
Post a Comment