Sunday, May 18, 2025

राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली मध्य प्रदेशात दाखल

राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली मध्य प्रदेशात दाखल 

इंदौर(१८/५/२५)  :  राष्ट्रीय समाज का नारा !  31 मे चलो दिल्ली, तालकटोरा मैदान की ओर !! असे म्हणत महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगाव चौंडीतून निघालेली राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली महाराष्ट्र राज्यभर फिरल्यानंतर मध्यप्रदेश राज्यात दाखल झाली. रासप पदाधिकाऱ्यांनी महेश्वर येथील राजवाड्यावर जाऊन  राजगादीस पुष्पहार अर्पण करून मातोश्री अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधीस्थळी असणाऱ्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  राजे मल्हाराव होळकर यांच्या पुण्यतिथी दिवशी दिनांक 20 मे रोजी मध्य प्रदेश सरकारची इंदौर ला कॅबिनेट मीटिंग होणार आहे, तर रासपची स्वराज महारॅली भानपुरा येथे महाराजा यशवंतराव होळकर, आलमपूर येथे राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहे.

इंदौर येथे महाराणी अहिल्याबाई होळकर राजवाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्वराज महारॅलीचे 'होळकर ट्रस्टतर्फे' स्वागत करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू येथे अभिवादन करण्यात आले. इंदौर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव पंजाबसिंह बघेल यांनी स्वागत केले. महारॅली समवेत रासपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक मामा रुपनवर, मुंबई प्रदेश सदस्य अंकुश अनुसे, अनिल शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातून मध्य प्रदेश राज्यात स्वराज महारॅली पोहचली आहे, रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वराज महारॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ३१ मे रोजी दिल्लीला यावे, असे आवाहन रासपचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी केले आहे. इंदौर येथून पुढे उज्जैनकडे स्वराज महारॅली रवाना झाली आहे. भानपुरा येथे महाराज यशवंतराव होळकर यांच्या समाधीस्थळी, तसेच 20 मे रोजी होळकरशाहीचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधीस्थळी स्वराज्य महारॅली जाणार आहे, असे यशवंत नायकशी बोलताना, मध्यप्रदेश राज्य प्रभारी प्राणसिंह पाल यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025