राष्ट्रसंताच्या विचाराची देशाला गरज - महादेव जानकर
अकोला /अकोट (११/५/२५) : तालुक्यातील पाटसुल येथील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे सर्वांगीण सुसंस्कार वर्गाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे मत व्यक्त केले.
स्वर्गीय डॉक्टर उद्धवराव गाडेकर यांचा तिसरा पुण्यस्मरण कार्यक्रम श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसुल येथे आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर उद्धवराव गाडेकर महाराज यांनी 33 वर्षापूर्वी या वर्गाची सुरुवात केली होती. दरवर्षी एक महिना राज्यभरातील विद्यार्थी ते सुसंस्कार घेण्यासाठी येतात, मराठवाड्यातून सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतात, जानकर यांनी या वर्गाची सर्व माहिती घेतली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चीन युद्धात भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सीमेवर गेले होते. राष्ट्रसंतांचे कार्य महान होते, त्याचप्रमाणे उद्धव गाडेकर महाराज यांनी कार्य पुढे सुरू चालू ठेवले होते व ते सुद्धा ध्येय रूपाने निघून गेले असले, तरी त्यांचे कार्य शुकदास गाडेकर महाराज हे पुढे घेऊन जात असल्याबाबत श्री. जानकर यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी मराठवाड्यातील ज्ञानेश्वर माऊली, तसेच जिल्हा सेवा अधिकारी शिवाजी म्हैसणे, विवेकानंद आश्रम हिवरा संस्थेतील उपाध्यक्ष अशोक थोरहाते, ज्ञानेफल आश्रम येथील सखाराम मुरकुटे व कार्यकर्ता मंडळी, शिंदे भाऊसाहेब, बुलढाणा जिल्हा सेवा अधिकारी नंदकिशोर कानडे, ग्रामगीताचार्य रमेश कात्रे गुरुजी, रवींद्र मुंडगांवकर, वीरेंद्र मुंडगावकर सावळे गुरुजी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कन्नावार(चंद्रपूर), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तोसिफ शेख, अंकुश बाळापुरे, प्रा. राजेन्द्र वैद्य, जयेश जाधव व राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मंडळी व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment