रासपकडून ३१ मे अहिल्याबाई होळकर जयंतीचे राहुल गांधीना निमंत्रण
नवी दिल्ली(६/५/२५) : देशाची राजधानी दिल्लीत दिनांक ३१ मे २०२५ रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये होणाऱ्या अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील उपस्थित होते. त्यानिमित्ताने श्री. जानकर यांनी राहुल गांधी यांचा घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्लीत महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. शरद पवार, एम. के. स्टॅलिन, तेजस्वी यादव, अखिलेश यादव यांच्यासहित देशभरातील प्रमुख मान्यवर नेत्यांना आमंत्रित करणाऱ्या असल्याचे महादेव जानकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment