केंद्र सरकारकडून जातिनिहाय जनगणनेचा निर्णय; राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला यश
मुंबई (२/५/२५) : केंद्र सरकारचा आजच्या कॅबिनेटचा जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. जातनिहाय जनगणना करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी फार व खुप जुनी आहे. यासाठी राज्यात प्रत्येक तहसीलदार/ जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आंदोलने करण्यात आली. जातीनिहाय जनगणनेसाठी सण 2022 मध्ये जंतर मंतर ते संसद भवन नवी दिल्ली येथे भर पावसात मोर्चा काढत महादेव जानकर यांनी धरणे आंदोलन केले होते. वेळोवेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आणि वेगवेगळे सामाजिक संघटना सोबत घेऊन मोर्चे, निदर्शने केलेली होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती. लालू प्रसाद यादव, शरद यादव, छगन भुजबळ, महादेव जानकर, कपिल पाटील यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला होता. आज त्याचेच प्रतिफल म्हणून केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेणेस भाग पाडले आहे. जातनिहाय जनगणनेची अनेक वर्षाची मागणी होती, त्यास आज यश आल्याचे बोलले जात आहे. जातनिहाय जनगणना करण्याच्या आंदोलनावेळी दादर मुंबई येथे महादेव जानकर यांना अटक करण्यात आली होती, अशी आठवण महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. जनगणना केल्यास विविध वर्गातील लोकांची संख्या, सामाजिक / आर्थिक स्थिती कळेल, ज्यामुळे त्यांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी योजना आखण्यास मदत होईल. यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल. राष्ट्रीय समाज पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाबद्दल भारत सरकार, प्रधानमंत्री यांचे अभिनंदन केले आहे. उच्च दर्जाच्या आयुक्त यांच्या नेतृत्वात विनाविलंब जनगणना व्हावी, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment