Monday, May 26, 2025

मुंबईत सावधानतेचा इशारा ! पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार

मुंबईत सावधानतेचा इशारा ! पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार



मुंबई : (26/5/2025) | दिनांक रविवार 25 मे 2025 रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला खरा. पण, त्याआधीपासून राज्यात पावसाचा मारा मात्र सुरूच होता आणि मुंबईसुद्धा या माऱ्यापासून बचाव करु शकली नाही. रविवारपासूनच शहरात सुरु असणारी संततधार दिवस मावळतीला गेल्यानंतर मुसळधारीमध्ये रुपांतरीत झाली आणि रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणु उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला.


शहरातील सागरी किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली, तर पश्चिम उपनगरांसह ठाणे आणि शहरालगत असणाऱ्या पालघरलाही पावसानं झोडपलं.


मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात पावसानं


26 मे 2025 रोजी सकाळी 6 ते 7 या कालावधीत मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली. यानंतर आय हॉस्पिटल (ग्रँट रोड) येथे 36 मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्र आणि सी वॉर्ड कार्यालय येथे 35 मिमी, कोलाबा अग्निशमन केंद्र येथे 31 मिमी, बी वॉर्ड कार्यालय येथे 30 मिमी, मांडवी अग्निशमन केंद्र येथे 24 मिमी, भायखळा अग्निशमन केंद्र येथे 21 मिमी, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर येथे 18 मिमी आणि नायर हॉस्पिटल येथे 14 मिमी पावसाची नोंद झाली.


याशिवाय, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. पावासाच्या धर्तीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान पुढील काही तासांसाठी शहरात पावसाचा मारा कायम राहणार असून सोसाट्याचे वारेही वाहतील असा इशारा देत हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

वसईच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा; समुद्र खवळला, लाटांचे फटकारे, दहा मिनिटांत होत्याचे नव्हते

वसईच्या किनारपट्टीला वादळाचा तडाखा; समुद्र खवळला, लाटांचे फटकारे, दहा मिनिटांत होत्याचे नव्हते


वसई, 25/5/2025|आधीच अवकाळीने दाणादाण उडालेल्या वसईच्या किनारपट्टीला वादळी वाऱ्यांचा जबरदस्त तडाखा बसला. घोंघावत आलेला प्रचंड वारा आणि त्याच्या जोडीला मुसळधार पाऊस यामुळे अर्नाळा किल्ला परिसरात दाणादाण उडाली.

अनेक घरांचे पत्रे, छपरे, कौले उडून गेली. समुद्र खवळल्याने अवघ्या 10 मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. वादळी पावसाच्या तडाख्याने घरांची पडझड होऊन 12 कुटुंबे रस्त्यावर आली असून डोक्यावर वादळी पाऊस आणि डोळ्यात पाणी अशी या गरीब मच्छीमार कुटुंबांची अवस्था झाली आहे.

चार दिवसांपासून वसई, विरारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. शुक्रवार, शनिवारी अर्नाळा किनारपट्टीला जोराच्या वादळी वाऱ्याने तडाखा दिला. किनाऱ्याजवळच्या घरांना याचा मोठा फटका बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. मंदिराजवळील ध्वज खांबही वाकला. समुद्र खवळल्याने लाटांचे तडाखेही जोराने बसले. याचा 12 घरांना फटका बसला. वसई तहसील विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असल्याची माहिती तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली.

मुरुडमध्ये शक्ती वादळ धडकले

मुरुड – दक्षिण कोकण किनाऱ्यावर शक्ती वादळ धडकले. मुरुडसह नांदगाव, मजगाव, बोर्ली -मांडला परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले.

मासळी भिजली-कुजली



अर्नाळा किल्लात कोळी बांधवांची 435 घरे आहेत. अवेळी आलेल्या पाऊसाचा फटका सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या शेकडो कोळी बांधवांना बसला. सुकवण्यासाठी ठेवलेली पापलेट, सुरमई, बोंबील, मांदेली भिजून कुजली आणि तिचा अक्षरशः चिखल झाला.

Sunday, May 25, 2025

'चंबळ का शेर' जीवाराम बघेल ग्वाल्हेर मध्ये

 राष्ट्रीय समाज पक्षाचा 'चंबळ का शेर' ग्वाल्हेर मध्ये 
31 मे स्वराज महारॅली समर्थनार्थ दिल्लीकडे रवाना

मुंबई (२५/५/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्षाचे धुरंदर नेते अर्थातच चंबळ का शेर जीवाराम बघेल आज राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित 31 मे अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव दिल्लीसाठी रवाना झाले. ग्वाल्हेर मध्ये ते पोहचले आहेत. ग्वाल्हेर मधील समर्थकांना घेऊन ते लवकरच दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत, अशी माहिती यशवंत नायकशी बोलताना दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेवजी जानकर साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येने दिल्लीला यावे, असे त्यांनी आवाहन केले.

Saturday, May 24, 2025

राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीची दिल्लीकडे आगेकूच

राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीची दिल्लीकडे आगेकूच 
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश सीमा ओलांडून हरियाणा राज्यात प्रवेश 



मुंबई |आबासो पुकळे (२४/५/२०२५) : राष्ट्रीय समाज का नारा ! 31 मे चलो दिल्ली, तालकटोरा मैदान की ओर !! असे म्हणत महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगाव चौंडीतून दिनांक १९ एप्रिल पासून निघालेली राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली महाराष्ट्र राज्यात राज्यभर फिरल्यानंतर मध्यप्रदेश राज्यात पोहचली. मध्य प्रदेश राज्यात ठिकठिकाणी महारॅलीचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात नागरिकांनी स्वागत केले. उज्जैन, शिवपुरी, कोलारस, ग्वाल्हेर, भिंड, गुना, मुरैना, मंदसौर जिल्ह्यात शेकडो नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीची दिल्लीकडे आगेकूच केली असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश सीमा ओलांडून हरियाणा राज्यात प्रवेश केल्याचे, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी कळविले आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महादेव जानकर यांची दिल्लीवर स्वारी धडकणार आहे, तर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित राहतील का? हे पहावे लागेल. उत्तर प्रदेश रासपने समाज माध्यमात दिलेल्या प्रचार पत्रिकेत राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव यांचे फोटो आहेत.



रासप पदाधिकाऱ्यांनी महेश्वर येथील राजवाड्यावर जाऊन राजगादीस पुष्पहार अर्पण करून मातोश्री अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधीस्थळी असणाऱ्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. इंदौर येथे महाराणी अहिल्याबाई होळकर राजवाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्वराज महारॅलीचे 'होळकर ट्रस्टतर्फे' स्वागत करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू येथे अभिवादन करण्यात आले. इंदौर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव पंजाबसिंह बघेल यांनी स्वागत केले. इंदौर येथून पुढे उज्जैनकडे स्वराज महारॅली रवाना झाली. भानपुरा येथे महाराज यशवंतराव होळकर यांच्या समाधीस्थळी, तसेच 20 मे रोजी होळकरशाहीचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधीस्थळी स्वराज्य महारॅलीने पुष्पांजली वाहून अभिवादन केले, असे यशवंत नायकशी बोलताना, मध्यप्रदेश राज्य प्रभारी प्राणसिंह पाल यांनी सांगितले. मुरैना मध्य प्रदेश येथील युवा उद्योजक सागर बघेल यांनी मध्यप्रदेश राजस्थानच्या (चंबळ नदी) सीमेपर्यंत रॅली बरोबर येऊन निरोप दिला. राष्ट्रीय समाज पक्ष स्वराज महारॅलीचा राजस्थान राज्यात प्रवेश केल्याचे राष्ट्रीय समाज पक्ष प्रतिनिधी कळवतात. 


स्वराज महारॅली का नेतृत्व करनेवाले राष्ट्रीय समाज पार्टी के बुजुर्ग नेता राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा ने बताया, "दो दिन उत्तर प्रदेश राज्य के आगरा, मथुरा, वृंदावन, गोवर्धन मे रॅली का स्वागत हुआ! आज सुबह गोवर्धन से हरियाणा होडूल मे हरियाणा राष्ट्रीय समाज पार्टी के पदाधिकारियोने रॅली का स्वागत किया" ! हरियाणा राज्यमे स्वराज महारॅलीने एन्ट्री किया |महारॅली समवेत रासपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक मामा रुपनवर, मुंबई प्रदेश सदस्य अंकुश अनुसे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे आदी पदाधिकारी आहेत.

















Sunday, May 18, 2025

अचानक अंगावर विजेची तार पडल्याने मेंढपाळ जागीच ठार; नांदेड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

अचानक अंगावर विजेची तार पडल्याने मेंढपाळ जागीच ठार; नांदेड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना


मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू – सरकारने घ्यावी दखल, मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आवश्यक

मौजे बरबडा (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील एक प्रामाणिक व मेहनती मेंढपाळ कोंडिबा खंडू धुमाळे यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आहे. आपल्या मेंढ्यांच्या उपजीविकेचा व्यवसाय करत असताना, ते शिखांची वाडी (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील शिवारात मेंढ्या घेऊन गेले होते. मात्र, अचानक मेन लाईनवरील विजेची तार तुटून खाली पडल्यामुळे त्यांना तीव्र विद्युतशॉक बसला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धुमाळे हे अत्यंत कष्टकरी, शांत स्वभावाचे व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रात्रंदिवस मेहनत करणारे व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि वृद्ध आई-वडील असा परिवार असून, या कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे.


शासनाकडे मागणी – मदत व उपाययोजना

ही केवळ एक अपघाती घटना नसून, ही मेंढपाळांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्काळ दखल घेऊन धुमाळे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी व मेंढपाळांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, ही समाजाची अपेक्षा आहे.


सावध रहा, सुरक्षित रहा

सर्व मेंढपाळ बांधवांना विनंती आहे की, मेंढ्या चराई करिता  जाताना परिसरातील विजेच्या तारांची स्थिती लक्षात घ्यावी. जर कुठे धोकादायक वीज तार आढळल्यास तत्काळ वीज वितरण कंपनीला कळवावे. आपली सुरक्षा हीच आपल्या कुटुंबाची ताकद आहे....

भटके विमुक्त समाजाला दाखले देण्यासाठी महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करा : ना. बावनकुळे

भटके विमुक्त समाजाला दाखले देण्यासाठी महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करा : ना. बावनकुळे 



#mumbai #भटके #विमुक्त #nomedictribe 

मुंबई (१५/५/२०२५) : भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करावे. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध होईल अशाप्रकारे १५ मागण्यांबाबतचे निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतले. बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह राज्यातील भटके विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

भटक्या समाजासाठी घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे :

 • जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात येणार.

• शाळा, महाविद्यालयात मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात दाखले द्यावेत.

• १९६१ पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र द्यावे.

• भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसिलदारामार्फत ओळखपत्र द्यावे.

• विविध दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात यावे.

• १९५२ चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा.

• आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय देण्यात यावा.

• तात्पुरते रेशनकार्ड देण्याऐवजी कायमस्वरुपी देण्यात यावे.

• सरकारी किंवा खासगी जमिनीवर वसलेल्या भटके समाजाचे सर्वेक्षण करावे.

• भटक्या समाजाला रेशनकार्ड देण्यात यावे.

• भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार.

• जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी सादर करावी.

• अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करुन तिची बैठक घेणार.

• भटके विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे उपलब्ध करुन देणार.

१२ वी चा निकाल जाहीर; कोकणची बाजी तर लातूर पॅटर्न सर्वात मागे

१२ वी चा निकाल जाहीर; कोकणची बाजी तर लातूर पॅटर्न सर्वात मागे


निकालात पुन्हा मुलींचाच बोलबोला, मुलांपेक्षा ५ टक्केने पुढे 


मुंबई (५/४/२५) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मंडळाने निकालाची माहिती सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेतून जाहीर केली.


यंदाही निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. म्हणजे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ५.०७ टक्के अधिक आहे.


बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ आहे. प्रथम श्रेणी आणि त्याच्या पुढे गुण मिळालेले ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९. ९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ आहेत. ३५ टक्के ते ४४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ आहे.


बारावीच्या परीक्षेसाठी यंदा १४ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरला होता. यंदा मंडळाच्या इतिहासात प्रथमच दहा दिवस आधी झाली. त्यामुळे यंदा निकालही लवकर लागला. कॉपी सापडल्या त्या केंद्रावरील परीक्षेशी संबंधित सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरमार्ग आढळले. ती सर्व केंद्र आता रद्द केली आहे. संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने अनेक उपाय केले, असे मंडळाने पत्रकार परिषदेत सांगितले.


यंदा निकाल घसरला


यंदा बारावीचा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाला आहे. मागील वर्षापेक्षा यंदाचा निकाल १.४९ टक्क्यांनी कमी आहे. सन २०२२ या वर्षात ९४.२२ टक्के निकाल लागला होता. त्यानंतर २०२३ मध्ये ९१.२५ टक्के निकाल लागला होता. २०२४ मध्ये ९३.३७ टक्के निकाल लागला आहे. तसेच या वर्षी २०२५ मध्ये ९१.८८ टक्के निकाल लागला आहे. यंदा निकाल कमी का लागला त्यांचा आढवा घेण्यात येणार आहे.

खासगी विद्यार्थ्यांची एकून संख्या ३६ हजार १३६ इतकी होती. त्यामध्ये ३५ हजार ६९७ विद्यार्थी परिक्षेला बसले. त्यामधून २९ हजार ८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ७३.७३ टक्के इतकी आहे. त्याचबरोबर सर्व शाखांमधून एकून ४२ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी नोंदनी केली होती. त्यापैकी ४२ हजार २४ विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेला बसले होते. त्यामधून १५ हजार ८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ टक्के इतकी आहे.

दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकणाने मारली बाजी

दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकणाने मारली बाजी


मुंबई| इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून, राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पालकांना आणि मुलांना निकाल पाहता येणार आहे.

विभागवार निकाल खालीलप्रमाणे :

- कोकण : ९८.८२ टक्के

- कोल्हापूर : ९६.८७ टक्के

- मुंबई : ९५.८४ टक्के

- पुणे : ९४.८१ टक्के

- नाशिक : ९३.४ टक्के

- अमरावती : ९२.९५ टक्के

- छ.संभाजी नगर : ९२.८२ टक्के

- लातूर : ९२.७७ टक्के

- नागपूर : ९९.७८ टक्के


यंदाही राज्यात मुलीच आघाडीवर

यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला असून, कोकण विभागाने पहिल्या नंबरवर असून, कोकणाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका लागला असून, यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. यात मुलींचा निकाल 96.14 टक्के तर, मुलांचा निकाल 92.31 टक्के इतका लागला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली मध्य प्रदेशात दाखल

राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली मध्य प्रदेशात दाखल 

इंदौर(१८/५/२५)  :  राष्ट्रीय समाज का नारा !  31 मे चलो दिल्ली, तालकटोरा मैदान की ओर !! असे म्हणत महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगाव चौंडीतून निघालेली राष्ट्रीय समाज पक्षाची स्वराज महारॅली महाराष्ट्र राज्यभर फिरल्यानंतर मध्यप्रदेश राज्यात दाखल झाली. रासप पदाधिकाऱ्यांनी महेश्वर येथील राजवाड्यावर जाऊन  राजगादीस पुष्पहार अर्पण करून मातोश्री अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. अहिल्यादेवी होळकर यांच्या समाधीस्थळी असणाऱ्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  राजे मल्हाराव होळकर यांच्या पुण्यतिथी दिवशी दिनांक 20 मे रोजी मध्य प्रदेश सरकारची इंदौर ला कॅबिनेट मीटिंग होणार आहे, तर रासपची स्वराज महारॅली भानपुरा येथे महाराजा यशवंतराव होळकर, आलमपूर येथे राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहे.

इंदौर येथे महाराणी अहिल्याबाई होळकर राजवाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या स्वराज महारॅलीचे 'होळकर ट्रस्टतर्फे' स्वागत करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू येथे अभिवादन करण्यात आले. इंदौर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव पंजाबसिंह बघेल यांनी स्वागत केले. महारॅली समवेत रासपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक मामा रुपनवर, मुंबई प्रदेश सदस्य अंकुश अनुसे, अनिल शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातून मध्य प्रदेश राज्यात स्वराज महारॅली पोहचली आहे, रासपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वराज महारॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ३१ मे रोजी दिल्लीला यावे, असे आवाहन रासपचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांनी केले आहे. इंदौर येथून पुढे उज्जैनकडे स्वराज महारॅली रवाना झाली आहे. भानपुरा येथे महाराज यशवंतराव होळकर यांच्या समाधीस्थळी, तसेच 20 मे रोजी होळकरशाहीचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांच्या समाधीस्थळी स्वराज्य महारॅली जाणार आहे, असे यशवंत नायकशी बोलताना, मध्यप्रदेश राज्य प्रभारी प्राणसिंह पाल यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून जातिनिहाय जनगणनेचा निर्णय; राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला यश

केंद्र सरकारकडून जातिनिहाय जनगणनेचा निर्णय; राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला यश 


मुंबई (२/५/२५) : केंद्र सरकारचा आजच्या कॅबिनेटचा जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. जातनिहाय जनगणना करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी फार व खुप जुनी आहे. यासाठी राज्यात प्रत्येक तहसीलदार/ जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आंदोलने करण्यात आली. जातीनिहाय जनगणनेसाठी सण 2022 मध्ये जंतर मंतर ते संसद भवन नवी दिल्ली येथे भर पावसात मोर्चा काढत महादेव जानकर यांनी धरणे आंदोलन केले होते. वेळोवेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आणि वेगवेगळे सामाजिक संघटना सोबत घेऊन मोर्चे, निदर्शने केलेली होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी संसदेत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती. लालू प्रसाद यादव, शरद यादव, छगन भुजबळ, महादेव जानकर, कपिल पाटील यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला होता. आज त्याचेच प्रतिफल म्हणून केंद्र सरकारला जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेणेस भाग पाडले आहे. जातनिहाय जनगणनेची अनेक वर्षाची मागणी होती, त्यास आज यश आल्याचे बोलले जात आहे. जातनिहाय जनगणना करण्याच्या आंदोलनावेळी दादर मुंबई येथे महादेव जानकर यांना अटक करण्यात आली होती, अशी आठवण महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. जनगणना केल्यास विविध वर्गातील लोकांची संख्या, सामाजिक / आर्थिक स्थिती कळेल, ज्यामुळे त्यांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी योजना आखण्यास मदत होईल. यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल. राष्ट्रीय समाज पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाबद्दल भारत सरकार, प्रधानमंत्री यांचे अभिनंदन केले आहे. उच्च दर्जाच्या आयुक्त यांच्या नेतृत्वात विनाविलंब जनगणना व्हावी, असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.

मधुबनी जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता संमेलन

मधुबनी जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता संमेलन 

मधुबनी/ बिहार  : मधुबनी जिल्हा येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ता संमेलन पार पडले. या कार्यकर्ता संमेलनास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी खास उपस्थिती लावली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महादेव जानकर यांनी बिहार राज्य कार्यकारिणी, तसेच विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडीचे संघटन बांधणीचे निर्देश दिले. यावेळी फुलेपिठावर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक, अनिल झा, मधुबनी  रोहित शर्मा व अन्य रासप पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रसंताच्या विचाराची देशाला गरज - महादेव जानकर

राष्ट्रसंताच्या विचाराची देशाला गरज - महादेव जानकर 




अकोला /अकोट (११/५/२५) : तालुक्यातील पाटसुल येथील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे सर्वांगीण सुसंस्कार वर्गाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे मत व्यक्त केले. 


स्वर्गीय डॉक्टर उद्धवराव गाडेकर यांचा तिसरा पुण्यस्मरण कार्यक्रम श्री गुरुदेव सेवाश्रम पाटसुल येथे आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर उद्धवराव गाडेकर महाराज यांनी 33 वर्षापूर्वी या वर्गाची सुरुवात केली होती. दरवर्षी एक महिना राज्यभरातील विद्यार्थी ते सुसंस्कार घेण्यासाठी येतात, मराठवाड्यातून सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतात, जानकर यांनी या वर्गाची सर्व माहिती घेतली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चीन युद्धात भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सीमेवर गेले होते. राष्ट्रसंतांचे कार्य महान होते, त्याचप्रमाणे उद्धव गाडेकर महाराज यांनी कार्य पुढे सुरू चालू ठेवले होते व ते सुद्धा ध्येय रूपाने निघून गेले असले, तरी त्यांचे कार्य शुकदास गाडेकर महाराज हे पुढे घेऊन जात असल्याबाबत श्री. जानकर यांनी समाधान व्यक्त केले. 

याप्रसंगी मराठवाड्यातील ज्ञानेश्वर माऊली, तसेच जिल्हा सेवा अधिकारी शिवाजी म्हैसणे, विवेकानंद आश्रम हिवरा संस्थेतील उपाध्यक्ष अशोक थोरहाते, ज्ञानेफल आश्रम येथील सखाराम मुरकुटे व कार्यकर्ता मंडळी, शिंदे भाऊसाहेब, बुलढाणा जिल्हा सेवा अधिकारी नंदकिशोर कानडे, ग्रामगीताचार्य रमेश कात्रे गुरुजी, रवींद्र मुंडगांवकर, वीरेंद्र मुंडगावकर सावळे गुरुजी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कन्नावार(चंद्रपूर), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तोसिफ शेख, अंकुश बाळापुरे, प्रा. राजेन्द्र वैद्य, जयेश जाधव व राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मंडळी व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगडावरील घरांना वन विभागकडून नोटीस; राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रायगडावरील घरांना वन विभागकडून नोटीस; राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

अलिबाग (१४/५/२०२५) : रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांपासून धनगर समाजाची वस्ती असून, येथील घरांना आता वनविभागाने अधिकृत ठरवत घरे हटवण्यासाठी नोटीस देण्यात आल्याने, या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रायगड किल्ल्यावर धनगर समाजाची वस्ती आहे, हा समाज किल्ल्यावर दही, दूध, तूप विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे, मात्र आताच वन विभागाला जाग येऊन वस्ती हटवण्याची मागणी केली आहे, असा प्रश्न राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते भगवान ढेबे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी होत असताना, त्याला महाराष्ट्रातील धनगर समाजाने तीव्र विरोध केला आहे. हा वाद आता शांत होत असताना, नुकतेच वनविभागाने दिलेल्या नोटिसाबाबत समाजात तीव्र संताप पाहायला मिळत आहे. 


ऐतिहासिक वारशाचा दर्जा देण्याची मागणी 

राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे राज्य कार्यकारणी सदस्य भगवान ढेबे, रायगड जिल्हा हर हर चांगभलं संस्थेचे हरीश ढेबे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात घरांना दिलेल्या बेकायदेशीर नोटीस तात्काळ रद्द करून कारवाई थांबवावी, वस्तीला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा म्हणून दर्जा देऊन कायदेशीर मान्यता द्यावी, वन विभागाने दिलेल्या नोटिसा रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात, कोणत्याही कुटुंबाला हटवू नये, असे मागणीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

देवरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची कार्यकर्ता संवाद बोठक

देवरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची कार्यकर्ता संवाद बोठक


अकोला (११/५/२५) : देवरी , ता-अकोट, जि-अकोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला जिल्हा महासचिव तथा पाटसुल गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंकुश बाळापुरे यांनी राष्ट्रीय समाज पक्ष संवाद बैठक आयोजित केली होती. संवाद बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तोशिक शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव नरेश मंडळ, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कन्नावार, अकोला जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा

स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा 


चार महिन्यात निवडणुका घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगास निर्देश

दिल्ली (६/५/२५) : महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपून साधारणतः तीन वर्षं झाले, तरी निवडणुका झालेल्या नाहीत. त्यावर सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत पुढील चार आठवड्यात निवडणुका घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पूर्ण प्रक्रिया चार महिन्यात संपवावी, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे.


'स्थानिक पातळीवर लोकशाही बळकट राहावी, यासाठी राज्यघटनेने दिलेले निर्देश पाळणे आवश्यक आहे. त्यानुसार नियमितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात, या निर्देशांचा आदर व्हायला हवा,' असे मत घटनापीठाचे प्रमुख न्या. सूर्य कांत यांनी निकालाचे वाचन करताना दिले.


ओबीसी आरक्षणासंदर्भात असलेल्या प्रलंबित खटल्यांमुळे निवडणुका झाल्या नसल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत. २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. दिनांक ४ जुलै २०२१ रोजी ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या, यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने महाराष्ट्रात राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडले होते. 


कोणत्या निवडणुका प्रलंबित?


चौकट करणे 

[*या महानगरपालिका निवडणुका प्रलंबित*


मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी]


चौकट करणे

[*या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित*


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा]

नांदेड जिल्ह्यात महाराणी अहिल्याबाई होळकर यांची स्वराज रथयात्रा चौंडी ते दिल्लीकडे जात असताना ठिक ठिकाणी स्वागत..

नांदेड जिल्ह्यात महाराणी अहिल्याबाई होळकर यांची स्वराज रथयात्रा चौंडी ते दिल्लीकडे जात असताना ठिक ठिकाणी स्वागत..


नांदेड (प्रतिनिधी) : महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीमोहत्सव निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली महाराणी‌ अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान चौंडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर येथून १९ एप्रिल २०२५ रोजी सुरूवात करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उतर प्रदेश करून ३१ में २०२५ रोजी तालकोटोरा मैदान दिल्ली येथे पोहचणार आहे.‌ दिनांक ९ व १० मे रोजी नांदेड जिल्ह्यात माळेगांव यात्रा, लोहा, कंधार, मुखेड, देगलुर, नर्सी, नांदेडमार्गे भोकर मुक्कामी. दुसरे दिवशी भोकर, तामसा, हदगाव, वारंगा, आर्दापुर, मालेगावमार्गे हिंगोली जिल्ह्याकडे प्रस्थान झाले.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या रथ यात्रेचे गावोगावी स्वागत करण्यात आले.

रथ यात्रे सोबत गोविंदराम शूरनर, राष्ट्रीय संघटक रासपा, ज्ञानेश्वर सलगर, महाराष्ट्र प्रदेश महासचिव, विनायक रूपनवर पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, अनिल शेंडगे सोलापूर जिल्हाध्यक्ष, विकास आलदर सोलापूर जिल्हाध्यक्ष, अश्रुबा कोळेकर मराठवाडा अध्यक्ष, अंकुश अनुसे मुंबई प्रदेश सदस्य, दत्ता कौठकर रासपा कार्यकर्ता पुणे, दिलावर रथ चालक रासपा कार्यकर्ता, सुर्यकांत गुंडाळे, रासपा कार्यकर्ता यांच्यासह रथासोबत चार गाड्या होते, असे आर. जे तुडमे शहराध्यक्ष नांदेड हे कळवितात.

रासपचे विधानसभा सदस्य डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी स्वराज महारॅलीचे केले स्वागत

रासपचे विधानसभा सदस्य डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी स्वराज महारॅलीचे केले स्वागत 

गंगाखेड : महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केलेल्या स्वराज महारॅलीचे स्वागत राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभागृह सदस्य आ. रत्नाकर गुट्टे यांनी स्वागत केले. ३१ मे रोजी दिल्ली येथे होळकरशाहीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या तालकटोरा मैदानात स्वराज महारॅलीचा समारोप होणार आहे. 

राष्ट्रिय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय समाज दिनाचे औचित्य साधत दिनांक १९ एप्रिल रोजी चौंडी येथून रासपच्या स्वराज महारॅलीस प्रारंभ झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात फिरल्यानंतर मराठवाड्याकडे स्वराज महारॅली रवाना झाली. धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यात फिरून काल परभणी जिल्ह्यात स्वराज महारॅली दाखल झाली. रासपचे विधानसभागृह सदस्य डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी स्वराज महारॅलीचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. यावेळी महारॅली समवेत महाराष्ट्र रासप राज्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, मराठवाडा अध्यक्ष अश्रूबा कोळेकर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनायक रुपनवर, मुंबई रासप नेते अंकुश अनुसे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल शेंडगे, परभणी युवक आघाडी जिल्हाअध्यक्ष राम मरगळ व स्थानिक रासप पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राजधानी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे आयोजन

राजधानी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे आयोजन 



३१ मे रोजी दिल्लीत भव्य दिव्य जयंती सोहळ्यास उपस्थित रहावे; महादेव जानकर यांचे आवाहन 

मुंबई  (१८/५/२५) : देशाची राजधानी दिल्लीत महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राष्ट्र उभारणीच्या कार्यात महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे काम मोठे आहे. केवळ हिंदू समाजासाठीच नाही तर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध सर्व जाती धर्मियांसाठी देशभरात अहिल्याबाईंनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. भव्य दिव्य अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० वी जयंती सोहळ्यास देशभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महादेव जानकर यांनी केले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाने जनजागृती करत स्वराज महारॅली काढली आहे. महारॅली महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश व्हाया दिल्ली असा मोठा प्रवास करणार आहे. दिनांक ३१ मे रोजी दिल्ली तालकटोरा मैदान चलो अशी हाक रासपाने दिली आहे. 


रासेफचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर यशवंत नायकशी बोलताना म्हणाले, महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावात चौंडी येथे अंखड देशातली पहिली जयंती महादेव जानकर यांनी साजरी करत नवा इतिहास रचला. आज सत्ताधारी /विरोधी पक्षतर्फे देशभरात ठिकठिकाणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, पार पडत आहेत, यापाठीमागे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे मोठे काम आहे. आदर्श सर्वजण कल्याणकारी महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सर्व धर्मियांसाठी देशभरात कार्य केलेले केले आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा देशाचा सर्वांगीण विकासाचा आदर्श राजकीय वारसा घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष मार्गक्रमण करत आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाने अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त दिल्लीसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. होळकरशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या तालकटोरा मैदान दिल्ली येथे स्वराज्य महारॅलीचा समारोप होईल. रासप आयोजित महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त स्वराज्य महारॅलीस देशभरातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींना आमंत्रित केल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले आहे. जास्तीत संख्येने दिल्लीची महारॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रासपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी केले आहे.

रासपकडून ३१ मे अहिल्याबाई होळकर जयंतीचे राहुल गांधीना निमंत्रण

रासपकडून ३१ मे अहिल्याबाई होळकर जयंतीचे राहुल गांधीना निमंत्रण 


नवी दिल्ली(६/५/२५) :  देशाची राजधानी दिल्लीत दिनांक ३१ मे २०२५ रोजी तालकटोरा स्टेडियममध्ये होणाऱ्या अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. रासपचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील उपस्थित होते. त्यानिमित्ताने श्री. जानकर यांनी राहुल गांधी यांचा घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.  राष्ट्रीय समाज पक्षाने दिल्लीत महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. शरद पवार, एम. के. स्टॅलिन, तेजस्वी यादव, अखिलेश यादव यांच्यासहित देशभरातील प्रमुख मान्यवर नेत्यांना आमंत्रित करणाऱ्या असल्याचे महादेव जानकर यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.



Monday, May 12, 2025

Sunday, May 11, 2025

19 एप्रिल चा दिवस, महादेव जानकर जन्म दिवस! अर्थात राष्ट्रीय समाज दिवस!! निमित्त लेख..

19 एप्रिल चा दिवस,  महादेव जानकर जन्म दिवस! अर्थात राष्ट्रीय समाज दिवस!! निमित्त लेख...
✍🏻 एस एल अक्कीसगार 

राष्ट्रीय समाज नायक : महादेव जगन्नाथ जानकर

‘रानोमाळ ते विधानभवन ते थेट कॅबिनेट मंत्रीपद’

लक्ष्य संसदभवन आणि प्रधानमंत्रीपद…

जीवनपट थोडक्यात:-

नाव : महादेव जगन्नाथ जानकर

जन्म तारीख : 19 एप्रिल 1968

मूळगाव पत्ता : मु. पळसावडे, पोस्ट - देवापुर, तालूका- माण, जिल्हा - सातारा,  महाराष्ट्र. 

सध्याचा पत्ता : रासपा केंद्रीय कार्यालय 1/बी 35, हमाम स्ट्रीट, फोर्ट, मुंबई – 400001.

प्राथमिक शिक्षण : जिल्हा परिषद शाळा - पळसावडे

माध्यमिक शिक्षण : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय देवापुर, तालुका-माण, जिल्हा  : सातारा

उच्च माध्यमिक :  11 वी, शांतिनिकेतन कॉलेज - सांगली, 

उच्च माध्यमिक : 12 वी वाय. सी. सायन्स कॉलेज, सातारा

डिप्लोमा इन इंजीनीअरिंग (इलेक्ट्रिकल) : वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सांगली

संस्थापक अध्यक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष

आमदार – 23 जानेवारी 2015 कॅबिनेट मंत्री –8 जुलै 2016 पशु संवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय  - महाराष्ट्र सरकार

लेखकाचे मनोगत :-

लहानपणी शाळेत ”माझा आवडता नेता” असा निबंध लिहायला सांगत असत. शिक्षक आमच्या समोर टिळक, गांधी, आगरकर नेहरू आदि नेत्यांची नावें पुढे करायचे. हे माझे नेते कसे ? हे तेंव्हा मला कळत नसे. तरीही घोकमपट्टी करीत त्यांच्यावर निबंध विद्यार्थी लिहित. मीही लिहित असे. मी त्यांना नेता म्हणत होतो, परंतु मानत नव्हतो, असा हा प्रकार होता. जानेवरी 1994 मध्ये मा. महादेव जानकर यांची भेट झाली. त्यांचे कार्य, ध्येयनिष्टा, अथक परिश्रम, संघर्ष आणि त्याग पाहिला. गेली  32-33 वर्षे ते न थांबता कार्यरत आहेत. ”माझा नेता” कोण याचे उत्तर सापडले. 19 एप्रिल 2025 या त्यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त मा. महादेव जानकर यांचे अभिष्टचिंतन करीत हा लेख आम्ही लिहित आहोत. मूळ लेख 15 मार्च 2013 रोजी लिहिला होता.  नंतर 8 जुलै 2016 रोजी लिहिला. आज 19 एप्रिल 2025 रोजी त्याचे पुनर्लेखन करीत आहे. 

_एस एल अक्कीसागर


महादेव जगन्नाथ जानकर

‘रानोमाळ ते विधानभवन ते थेट कॅबिनेट मंत्रीपद’

महादेव जानकर यांचा 19 एप्रिल 1968 चा जन्म. मेंढरामागे रानोमाळावर त्यांचा जन्म. मेंढपाळ निरक्षर आई – बापाचा मुलगा इंजिनिअर झाला. समाजकारणात – राजकारणात उतरला. 22 एप्रिल 1988 साली यशवंतसेनेची स्थापना झाली. इंजी. बी. के. कोकरे हे यशवंत सेनेचे संस्थापक प्रमुख नेतृत्व. 1991 मध्ये काँग्रेसच्या राजकीय षडयंत्राचे ते बळी ठरले. बी. के. कोकरे यांनी धनगर समाजाला अस्मिता, स्फुल्लिंग आणि समाज संघ  दिला.  पुढे 1992  सालात तरुण तडफदार महादेव जानकर यशवंतसेनाप्रमुख बनले. 31 जानेवारी 1994 रोजी यशवंतसेनाप्रमुख महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कुर्ला कोर्ट मैदानात एक सभा झाली. त्या सभेस मी उपस्थित होतो, येथेच आमची भेट झाली. तेथे महाराष्ट्राचे समांतर सरकार स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला होता. महादेव जानकर यांना त्या सरकारचे मुख्यमंत्री घोषित केले होते. दरम्यान बसपा प्रमुख कांशीराम यांची त्यांनी भेट घेतली. "मागण्याचे निवेदन देण्यापेक्षा समाज मताच्या जोरावर आमदार, खासदार,  मुख्यमंत्री बनण्याचा सल्ला"  कांशीराम यांनी त्यांना दिला. तेथेच I am comander not demander हा नारा यशवंतसेनाप्रमुख महादेव जानकर यांच्या डोक्यात फिट्ट बसला. शिवडी, मुंबई येथे 24 एप्रिल 1994 रोजी धनगर बहुजन विराट परिषद झाली.  बसपा प्रमुख मुख्य अतिथी मार्गदर्शक होते. या सभेनंतर यशवंतसेनेची नव्याने पुनर्रचना करण्यात आली. यशवंतसेनाप्रमुख महादेव जानकर यांनी सुशिक्षित, बुद्धिवादी, नवोदित, विचारक, लेखक, पत्रकार श्री. एस एल अक्कीसागर यांची यशवंतसेना सरचिटणीसपदी नेमणूक केली. धेय्य, उद्देश, निती, लक्ष्य, दिशा आणि मार्ग घेवून यशवंतसेना मार्गक्रमण करू लागली, जागृती सभा कार्यक्रमाची अथक, धडक आणि वेगवान वाटचाल सुरू झाली. महाराजा यशवंतराव होळकर, महाराणी अहिल्याबाई होळकर, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, उमाजी नाईक, संगोळी रायन्ना सारख्या अनेक महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गांचा अवलंब केला.  विद्या आणि सत्ता यातूनच विकास - प्रगती या फुले मंत्राचा अवलंब केला. राजकीय सत्ता सर्व समस्यांची गुरुकिल्ली, या आंबेडकर तंत्राचा अवलंब केला.  29 सप्टेंबर 1994 रोजी म्हसवड सातारा येथे धनगर बहुजन विराट परिषद झाली. प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून कांशीराम उपस्थित होते. यशवंत नायक या हस्तलिखित पत्रिकेचे मा. कांशीराम यांचे हस्ते उद्घाटन झाले. महादेव जानकर संपादक पत्रकार बनले. समाज विकासासाठी - परीवर्तनासाठी  राजकीय 'राष्ट्रीय राजकिय पक्ष' निर्माण करण्याचा निर्णय झाला. त्यातूनच यशवंतसेनाप्रमुख महादेव जानकर 29 ऑगस्ट 2003 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बनले. 1998, 2006 {सांगली लोकसभा पोटनिवडणूक} तसेच 2009 आणि 2014 अशा 4 लोकसभा निवडणुका लढले – हरले. मा. महादेव जानकर, धनगर माळी ते मराठा–मातंग मुस्लीम ते ब्राह्मण अशा राष्ट्रीय समाजाचा महाराष्ट्राचा नेता – राष्ट्रीय नेता बनले. जानेवारी 2015 मध्ये आमदार बनले. जुलै 2016 मध्ये मंत्री बनले. या दरम्यान 2019 लोकसभा निवडणूक न लढल्याने वाया गेली.  2024 लोकसभा निवडणूक परभणी मधून मा. महादेव जानकर यांनी लढवली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोट्यातून महायुतीतर्फे राष्ट्रीय समाज पक्षाच्या ए. बी. फॉर्मवर आणि स्व-चिन्हावर (शिट्टी) निवडणूक लढवली. अटीतटीच्या लढतीत पराभव झाला. पुढे 2024 विधानसभा स्वबळावर लढवली. एकूण 117 जागा लढवल्या. एक आमदार गंगाखेड मधून निवडून आला. स्वतंत्र आणि स्वाधीन पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष उभा ठाकला. हा पक्षाचा नव जन्मच होता. 

राष्ट्र का नेता कैसा हो !  महादेव जानकर जैसा हो !!

महादेव जगन्नाथ जानकर लाखात एक नव्हे तर करोडोत एक असे व्यक्तिमत्व आहेत. उच्च ध्येय,  दूरदृष्टी, स्पष्ट लक्ष्य, सातत्यपूर्ण कार्यक्रम, राजकीय ध्येयवाद, अथक परिश्रम, त्याग, संघर्ष तसेच ज्ञान आणि नितिचा उत्कृष्ट संगम म्हणजे महादेव जानकर. मेंढरामागे भटकणाऱ्या माता गुणाबाई आणि पिता जगन्नाथ यांच्या पोटी साताऱ्याच्या एका रान माळावर ‘महादेव’चा जन्म झाला. गावी, तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत इंजिनियर झाला. कॉलेज जिवनापासून नेतृत्व करणारे महादेव जानकर 1992 साली ‘यशवंतसेनाप्रमुख’ बनले. भटकंती करणाऱ्या माता - पित्याचा तरुण पुत्र महादेव जानकर समाजकारणासाठी - राजकारणासाठी भटक्या बनला. चांगली नोकरी करुन सुखाचा संसार थाटन्याचे सोडून, तारुण्य सुलभ भावनेचा त्याग करुन  “समाजाचा संसार” थाटण्याचा निर्धार केला. “घरी जाणार नाही," नाते - संबंध ठेवणार नाही, लग्न करणार नाही आणि ‘राष्ट्रीय समाज’ ला सत्ता, संपत्ती, सन्मान मिळवून देण्यासाठी आजन्म कार्यरत राहीन" अशी भीष्म प्रतिज्ञा ‘महादेव’ने घेतली. एका खडतर प्रवासाचा आरंभ महादेव जानकर यांनी सुरु केला. 1992  ते आजतागायत ते या शपथेस जागले. यशवंतसेनेला त्यांनी केडर बेस्ड, मास बेस्ड, ब्रॉड बेस्ड बनविले.

राजकारण हेच समाजकारणासाठी सर्वात मोठे साधन

राजकारण हेच समाजकारणासाठी सर्वात मोठे साधन मानून महादेव जानकर कार्यरत राहिले. त्यातुनच 29 ऑगस्ट 2003 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. राष्ट्रीय समाजाला, त्यातही उपेक्षित - दुर्लक्षित बहुजन समाजाला, ओबीसी - आदिवासी - दलित- अल्पसंख्याक समाजाला सत्तेत घेवून जाणे, हे मुख्य लक्ष्य केले. त्यासाठी देशातील ‘सर्वात मोठी पॉवर’ ज्या ठिकाणी आहे, प्रामुख्याने संसद भवन - दिल्ली” ला लक्ष्य करुन आणि “विधान भवन – मुंबई, महाराष्ट्र तसेच (देशातील अन्य राज्यातील विधानभवने) लक्ष्य करून वाटचाल सुरु केली. सत्य शोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्रसंघटन हे प्रमुख त्रिसूत्र केले. त्यासाठी अनेक जागृती कार्यक्रम राज्य तसेच देशपातळीवर घेतले. प्रारंभी 2004 सालच्या फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील शिवाजी पार्कवर स्वराज्य रॅलीचे यशस्वी आयोजन केले गेले. ग्रामपंचायत ते विधानसभा - लोकसभा लढविल्या आणि जिंकल्या. 2009 साली आपल्या पक्षाचा एक आमदार निवडून आणला. स्वत: महादेव जानकर यांनी सर्वप्रथम 1998 साली नांदेड लोकसभा लढविली, तीन नंबर’ची  मते मिळवली. 2006 साली सांगली लोकसभा पोट निवडणुक लढविली. राष्ट्रीय समाज पक्षाने सर्वप्रथम 2004 सालच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीतुन संसदीय लढाईत प्रवेश केला. महाराष्ट्र - 11 आणि कर्नाटक - 1 जागा स्वबळावर लढविल्या. पहिल्याच निवडणूकीत दिड लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्र राज्यात 10 व्या ‘नंबर’ची पार्टी ठरली. पुढे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत दिड लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्र राज्यात 8 व्या नंबर’ची पार्टी ठरली.  2006 साली महादेव जानकर यांनी सांगली लोकसभा लढविली, तिसऱ्या नंबर’ ची मते मिळवली. 2009 साली रासपने महाराष्ट्र – 29 आणि कर्नाटक –1, आसाम – 1, गुजरात -1, बिहार -1 अशा एकूण 5 राज्यातून 34 लोकसभा जागा स्वबळावर लढविल्या. स्वत: महादेव जानकर यांनी माढा येथून शरद पवार विरुद्ध निवडणूक लढवून लाखभर मते मिळवली. एकूण 2 लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्रात 5 व्या नंबर’ची पार्टी ठरली. नंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत 1 आमदार सहित 2 लाखापेक्षा जास्त मते मिळवुन महाराष्ट्रात 5 व्या नंबर’ची पार्टी ठरली. रासपचे अनेक पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, तालुका पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. 2014 साली महादेव जानकर यांनी बारामती लोकसभेमधून सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात साडे चार लाखापेक्षा अधिक मते मिळवून खऱ्या अर्थाने बाजीगर ठरले. पुढे जानेवारी 2015 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदचे आमदार बनले. 5 जानेवारी 2018 रोजी श्री एस एल अक्कीसगर यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. याच 2018 साली गुजरात राज्यातून वडोदरा, कर्जन आणि पादरा पालिकेतून 28 नगरसेवक निवडून आले.  गुजरात विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यात राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात 7 व्या नंबरचा पक्ष ठरला. गुजरात विधानसभा निवडणूकीत वडोदरा मतदार संघातून राज्याचे पक्षाध्यक्ष राजेश आयरे (माजी अध्यक्ष गुजरात) यांनी कडवी झुंज दिली. त्यांनी तीन नंबरची मते मिळवली. दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ या राज्यात पक्ष उभारणी केली. पक्ष जोमाने वाढू लागला. गोवा, तामिळनाडू, दिल्ली,  कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान, बिहार, उत्तराखंड, हरियाना, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश या राज्यात पक्ष मूळ धरू लागला, वाढू लागला. आता आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यात विस्तारत आहे. रासप ही खऱ्या अर्थाने जन-पार्टी आहे. निष्ठावान कार्यकर्ते आणि जनतेचा निधी यावर रासपने इथपर्यंत प्रवास केला. महादेव जानकर सारखे त्यागी तसेच सक्षम नेतृत्व यांच्यामुळे रासपा महाराष्ट्रात महायुतीपर्यंत पोहोचली. देशात एन.डी.ए. मध्ये सहभागी होण्याएवढी सक्षम बनली. राज्यातील आणि देशातील मोठया नेत्यांबरोबर महादेव जानकर बसू लागले,  बोलू लागले. रानोमाळ मेंढरामागे भटकंती करणाऱ्या महादेव जानकर यांचे हे कार्य निश्चितच सामान्य कार्य नव्हते व नाही. ते एक मोठे कार्य होते. एक नेता म्हणून त्यांचे हे एक मोठे यश होते. आमदार - खासदार - मंत्री - मुख्यमंत्री - प्रधानमंत्री पेक्षा ‘नेता’ मोठा असतो. तात्पर्य महादेव जानकर एक नेता आहेत. एक ‘राष्ट्रीय’ नेता आहेत. आपल्या पक्षाला ‘राष्ट्रीय’ समाज पक्ष, असे नाव महादेव जानकर यांनी दिले. 

सत्य शोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन ही मार्गसुत्री.

जात, धर्म, भाषा, प्रदेश, वंश या ना त्या कारणाने भारत देशाला विभागले आणि तोडले जात असताना ‘राष्ट्र’ हे सर्वात मोठे असे मानणारा समाज म्हणजे ‘राष्ट्रीय समाज’ आणि अशा राष्ट्रीय समाजाची पार्टी म्हणजे राष्ट्रीय समाज पार्टी, असे सांगत संसदीय लोकशाही राजकारणात महादेव जानकर यांनी प्रवेश केला. राष्ट्र हि देव राष्ट्र हि धर्म हमारा, राष्ट्र बने बलशाली भाषा सुत्र हमारा ! ही आमच्या पक्षाची सोशो – पोलिटिकल फिलॉसिफी (समाज – राजकीय विचारधारा) आहे. सत्य शोधन, समाज प्रबोधन आणि राष्ट्र संघटन ही आमची मार्गसुत्री आहे. संपूर्ण राष्ट्रीय विकास आणि समान राष्ट्रीय भागीदारी हा आमचा राजकीय अजेंडा आहे. राष्ट्र सर्वांपरी मानणारा समाज – राष्ट्रीय समाज हा आमच्या पक्षाचा सामाजिक आधार आहे. ब्राह्मण - मराठा ते जैन - दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाला आम्ही राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतो. एकात्म राष्ट्र निर्माण हे आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि वाहन बनविले आहे. संपूर्ण देशभरात महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे. राज-पुत्र ते राजा, असा महादेव जानकर यांचा प्रवास नसून तो ‘रानोमाळ ते विधानभवन - कॅबिनेट मंत्रिपद’ असा आहे. दिनांक 8 जुलै 2016 रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचे पशू संवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री बनले. तर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यमंत्री दर्जा पदावर बसविले. मंत्रिपदाच्या जोरावर अनेक सामाजिक उपक्रम राबविले. पक्ष आणि कार्यकर्ते यांना भारतीय जनतेत सन्मानपात्र बनविले. त्यांचा हा प्रवास केवळ ‘दैदीप्यमान’ आहे. महाराष्ट्र राज्याचे मा. महादेव जानकर मंत्री बनले तरी संसद भवन दिल्ली व पंतप्रधानपद हेच त्यांचे लक्ष्य आहे. त्यामुळे महादेव जानकर यांच्याशी इतर नेत्यांची तुलना होवू शकत नाही. महादेव जानकर हे एकमेव “महादेव - जानकर” आहेत. त्या सम फक्त तेच एकमेव आहेत.

नव अभिमन्युला साथ देता आली नाही तरी कोणी जयद्रथ बनू नये.

त्यानंतर मधल्या काळात 2014 मध्ये लोकसभा निवडणूक झाली. महादेव जानकर यांना ‘माढा’ लोकसभा ऐवजी बारामती आपले ‘कुरुक्षेत्र’  करावे लागले. आधुनिक युगातील महा-भारताचे चक्रव्युह भेदु पहाणाऱ्या नव अभिमन्युला साथ देता आली नाही, तरी कोणी जयद्रथ बनू नये, अशी कळकळीची विनंती - आवाहन, त्यावेळी प्रस्तुत लेखकाने समाज बांधवांना केले होते. राज-पुत्र ते राजा असा महादेव जानकर यांचा प्रवास नसून तो रानोमाळ ते राजभवन असा आहे. महादेव जानकर हे एकमेव “महादेव - जानकर” आहेत. त्या सम फक्त तेच आहेत, दूसरा कोणी नाही, असे सांगत मा. महादेव जानकर आपल्या इप्सित ध्येयाप्रत लवकरात लवकर पोहोचो, अशी सदिच्छाही त्यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केली होती.  मधल्या काळात 2014 साली दिल्लीत एनडीएचे तर मुंबईत भाजपा –शिवसेना – रासपा – रिपाई युतीचे सरकार सत्तेवर आले. मा. महादेव जानकर महाराष्ट्र विधानभवन मध्ये पोहोचले. आमदार – मंत्री बनले. स्वपक्षाच्या – राष्ट्रीय समाज पक्षाच्या बळावर मा. महादेव जानकर महाराष्ट्राच्या मंत्रीपदावर पोहोचले. रानोमाळ माण सातारा व्हाया चोंडी करीत मा. महादेव जानकर मुंबईत पोहोचले. दिल्लीला जवळ केले.



राष्ट्रीय समाज पक्ष एक आगळा–वेगळा पक्ष

31 मे 2003 रोजी पक्षाची घोषणा केली. त्याचवर्षी 29 ऑगस्ट 2003 रोजी पार्टी रजिस्टर झाली. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये तालुका पंचायत निवडणूक जिंकली, पहिला विजय मिळवला. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई मधून येल्डा पंचायत समितीत रासपाचा पहिला उमेदवार निवडून आला. येल्डा पॅटर्न म्हणून तो गाजला. राष्ट्रीय समाज पक्षाने 2004 सार्वत्रिक लोकसभा निवडणुक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात लढवली. त्यानंतर आजपर्यंतच्या सर्व लोकसभा लढवल्या.  2009 साली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आसाम आणि बिहार राज्यातून लढवली.  2014 साली  पक्षअध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा क्षेत्र मधून निवडणूक लढवून राष्ट्रीय समाज पार्टीने तर इतिहास निर्माण केला. महादेव जानकर कार्यकर्ता पासून नेता बनले. त्यांचे कार्यकर्ता देखील हजारो - लाखोत एक आहेत. जैसा नेता वैसा कार्यकर्ता आहेत. या कार्यकर्त्यात सर्व जाती, धर्म, भाषा, प्रदेश तथा राज्याचे लोक आहेत. गणतंत्र भारत अजून खऱ्या अर्थाने जनतंत्र बनले नाही, लोकशाही भारतात अजून राजतंत्र आहे, घराणेशाही आहे. आणि ही घराणेशाही सर्व देशातील सर्व छोट्या- मोठ्या पार्टीत दिसून येते. परंतु राष्ट्रीय समाज पक्ष मात्र यात आगळा–वेगळा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राहुल जी यांना माता सोनिया जी समोर बराच काळ वाट पाहायला लागली. परंतु संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद (5 जानेवारी 2018 रोजी) श्री एस एल अक्कीसागर यांचेकडे मोठ्या विश्वासाने आणि सन्मानाने सोपविले. श्री. एस एल अक्कीसागर 

मूलत: कर्नाटक राज्याचे आहेत. कर्नाटक त्यांची मातृ- पितृ भूमी आहे. त्यांची जन्मभूमी जबलपूर मध्यप्रदेश आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. श्री अक्कीसागर यांनी तीन - साडे तीन वर्षे अध्यक्षपद सांभाळले.  एकुण 17 राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष पोहोचला आहे. 13 राज्यात पक्ष राज्य कार्यकारिणीचे गठण झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या 4 राज्यात नोंदणीकृत  पक्ष बनला आहे. महाराष्ट्रात 2 मंत्री बनले, एक एमएलए आणि एक एमएलसी आहे. महाराष्ट्रात 100 पेक्षा अधिक स्थानिक स्वराज संस्थेत पक्ष सदस्य निवडून आले आहेत. गुजरात राज्यात 28 सदस्य निवडून आणले. राजनीतीचा कसलाच इतिहास नव्हता, अनुभव नव्हता. साधन कमी होते, तरी कमी वेळेत महादेव जानकर आणि त्यांच्या पार्टीने जी राजनीतिक सफलता प्राप्त केली आहे, ती केवळ एकमेव अद्वितीय आहे. भारतीय राजनितिज्ञ किंवा पत्रकारिता मानो या ना मानो, परंतु हे वास्तव मात्र कोणी खोटे ठरवू शकत नाही. आणि हे सर्व आपला नेता, आपला पक्ष, आपला कार्यकर्ता, आपले साधन, आपला अजेंडा याच्या जोरावर राजनीतिक सफलता प्राप्त केली आहे.  ऐऱ्या- गऱ्या आणि दुसऱ्या कोणी बनविलेल्या रेडीमेड पार्टीतून एमएलए, एमपी, मंत्री,  प्रधानमंत्री बनणे सोपे आहे. परंतु आपली पार्टी बनवून आपल्या बळावर – स्वबळावर अशा प्रकारची सफलता प्राप्त करणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही. अविचल निश्चय - निर्धार, असीम निष्ठा - विश्वास आणि संपूर्ण त्याग - समर्पण ( DETERMISSION, DEVOTION & DEDICATION ) हे महादेव जानकर यांचे गुणविशेष आहेत.  आज राष्ट्रीय समाज पक्ष देशात ओळखपात्र, दखलपात्र पक्ष बनला आहे. हे सर्व मा. महादेव जानकर यांच्या स्वतंत्र, स्वाधीन आणि कुशल नेतृत्वाआधीन झाले आहे.


2014 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कुरुक्षेत्र : दिल्ली संसद भवन जाण्याचे गेट उघडले...

“बारामती लोकसभा क्षेत्रमें शरद पवार की बेटी सुप्रियाताई सुळे–पवार  को पराजित करके मै ‘जायंट किलर’ साबित हूँगा;  2014 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कुरुक्षेत्र रणसंग्रामात महादेव जानकर यांनी घोषणा केली होती. यापूर्वी तीन लोकसभा निवडणुका हरणारे महादेव जानकर या निवडणुकीतही हारले, परंतु त्यांच्यासाठी संसदीय राजनीतीचे दरवाजे उघडले गेले. नेता महादेव जानकर तसेच राष्ट्रीय समाज पार्टीचे मुंबई विधानसभा आणि दिल्ली संसद भवन जाण्याचे गेट उघडले गेले. राजमाता अहिल्या जन्मभूमी चोंडी हे  “गेट वे ऑफ मुंबई” आणि महात्मा फुले मुळगाव कटगुण हे "गेट वे ऑफ दिल्ली” हा राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्षाच्या स्थापना दिन पासून नारा होता. तो खरा होताना दिसत होते. परंतु त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातून युती सरकार गेले, आघाडी सरकार आले आणि याचे श्रेय शरद पवार यांच्या प्रचार सभांना दिले गेले. परंतु तत्पूर्वी 2014 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय समाज पार्टी अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीत रोखून ठेवले होते. महादेव जानकर  सुप्रिया सुळे - पवार यांच्या तुलनेत पॉवरफुल साबित होताना दिसत होते.  किंबहुना महादेव जानकर यांची जीत निश्चित मानली जात होती. अशा विवशतापूर्ण अवस्था आणि नामुष्की भय कारणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीमध्येच तळ ठोकणे भाग पडले. परिणामी महाराष्ट्र राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा सुपडा साफ झाला. दिल्लीमध्ये मोदी सरकार पुन: प्रस्थापित झाले. पुढे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकून युती सरकार स्थापित झाले.


महारानी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी वर्ष !

राजमाता अहिल्यादेवी मन बल बुद्धी देवो.. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये ना. महादेव जानकर आणि त्यांची राष्ट्रीय समाज पार्टी यांना डावलण्याचे किंबहुना संपविण्याचे काम केले गेले. परिणामी काँग्रेसमुक्त भारतची भाषा करणाऱ्या भाजप नेतृत्वाखालील युती सरकार पडले आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसयुक्त अशा महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. रासपाचा एक आमदार श्री रत्नाकर गुट्टे गंगाखेड येथून विजयी झाला. सिंह गेला पण गड वाचला. नामुष्की टळली. आणि राष्ट्रीय समाज पक्ष अ-भेद्द्य ठरला. एका बिकट राजकीय परिस्थितीमुळे  रासपला महाराष्ट्रात 2019 लोकसभा निवडणूक न लढवता आल्याने ती टर्म वाया गेली. 2019 साली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या 6 राज्यात लढविली. (महाराष्ट्र राज्यातून मात्र लोकसभा लढली नाही) याप्रकारे महाराष्ट्र व्यतिरिक्त 6 राज्यात लोकसभा लढवून आपले अस्तित्व जिवंत ठेवले. महात्मा फुलेवाडा पुणे महाराष्ट्र ते संगोळी रायान्ना  समाधीस्थळ नंदगड कर्नाटक समाज संगम राज यात्राचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र आणि देशभरात कनेक्ट इंडिया - स्वराज्य रॅलीचे आयोजन केले गेले.  महाराष्ट्रातील मुंबई माढा परभणी सह अनेक अनेक जिल्ह्यातून जन स्वराज यात्रा काढली. दिल्ली, उत्तर प्रदेश कर्नाटक राज्यात देखील जन स्वराज यात्रा काढली गेली. महाराष्ट्रात 2019 लोकसभा निवडणूक न लढवता आल्याने आलेली मरगळ निघून गेली.  2024 लोकसभा निवडणूक परभणी मधून मा. महादेव जानकर यांनी लढवली. अजित पवार राष्ट्रवादी कोट्यातून  महायुती तर्फे राष्ट्रीय समाज पक्षाच्या ए बी फॉर्म आणि चिन्हावर लढवली. अतितटीच्या लढाईत पराभव झाला. पुढे 2024 विधानसभा स्वबळावर लढवली. 117 उमेदवारी अर्ज दाखल झाले, 92 जागा लढवल्या. एक आमदार गंगाखेड मधून निवडून आला.  2019 सार्वत्रिक निवडणूकीत एनडीएची दिल्लीची सत्ता शाबूत राहिली. परंतु महादेव जानकर यांचे नेतृत्व आणि रासपला अपशकून केला गेला. परिणामी मुंबईची सत्ता गेली होती. 2024 विधानसभा निवणुकीत भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचे बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. मनसे सकट अनेक पक्षाचे एक ही सदस्य निवडून आले नसताना, सभागृहात राष्ट्रीय समाज पक्षाचे एक सदस्य आहेत, जे पक्षाचा बी फॉर्म आणि पक्षाच्या निवडणुक चिन्हावर सदस्य  बनले आहेत, पक्षाचा गड महाराष्ट्र विधानसभेत लढवीत आहेत. हार जीत होत असते.  थोरले पवार आणि धाकटे पवार वादात परभणी लोकसभा ताब्यात घेण्याची एक मोठी संधी मिळाली होती. या सुवर्ण संधीचा फायदा घेता आला नाही, हे वास्तव नाकारता येत नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजला आहे.  कार्यकर्ता, कौशल्य साधने आणि परिस्थिती यश ठरवते. देव आणि दैव अनाकलानिय असते. कोठे चुकलो याचा शोध आणि बोध घेणे हे पक्षाचे विशेषतः पक्ष नेतृत्वाचे मुख्य कर्तव्य आणि जिम्मेदारी असते आणि आहे, हे आता तरी अमान्य करून चालणार नाही. पक्षाला आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण,  आत्मसमीक्षण आणि त्यानुसार कार्यक्रमण करण्याची गरज निर्माण झाली आहे. महारानी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष आहे. 31 मे 2003 रोजी राजमाता अहिल्या जन्मभूमी चोंडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा जन्म झाला. 14 जानेवारी 2014 या संक्रमण दिवशी युतीत सामिल झाला.  पक्ष पुढेच पुढे कालक्रमण करू लागला. परंतु 2024 साली मात्र पुनः त्यावेळच्या मूळ अवस्थेत पोहोचला असल्याचे दिसत आहे.  महारानी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष निमित्ताने राजमाता अहिल्या जन्मभूमी चोंडी येथून 19 एप्रिल या राष्ट्रीय समाज दिवसी राष्ट्रव्यापी स्वराज महारॅली चलो दिल्ली चा नारा देत तालकटोरा स्टेडियम दिल्लीकडे रवाना झाली आहे. अर्थात येथून पुढे मा. महादेव जानकर आणि त्यांची राष्ट्रीय समाज पार्टी स्वतंत्र आणि स्वाधिनतेच्या स्वबळावर आपले सरकार कसे स्थापन करता येइल, या दिशेने वाटचाल करीत राहील, अशी अपेक्षा आहे. महारानी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष निमित्ताने, राष्ट्रीय समाज पक्षाला राजमाता अहिल्यादेवी मन, बल,  बुद्धी देवो, हेच साकडे..


कोरोना काळ आणि रासप...

2020 सालापासून कोरोना या जागतिक आपत्तीचा आपण सर्वांनी सामना केला.  या महासंकटाशी सामना करीत मानव समूहाने केवळ आपले अस्तित्वच राखले नसून विस्मयकारक अशी प्रगतीही साधली आहे. मानवाला हजारो – लाखो वर्षाचा इतिहास आहे. प्रगती साधत असताना काही वृत्ती – काही मानव समूह निसर्गाला शह देत जगावर – बहुसंख्यांक मानव समुहावर सत्ता, संपत्ती, साधने आणि बुद्धीच्या जोरावर अनैसर्गिक वर्चस्व निर्माण करू पाहत आला आहे. तरी जगात पूर्वीही, आज-अजूनही सत्तप्रवृत्तीची माणसे आणि मानव समुह अस्तित्वात आहेत. त्यामुळे कोरोना संकटावर मानव समाजाने मात केली, यात शंका नाही. त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री मा. महादेव जानकर यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळुन सक्रिय सहभाग  दाखवून कोरोनाग्रस्तांसाठी 35 लाख रुपयाची सहयोग राशी दिली होती.


मुझे इस देशपर मुझे राज करना है. देश का प्रधानमंत्री बनना है  - महादेव जानकर

उपेक्षित, शोषित, दलित, मागास, मायनॉरिटी आणि दुर्लक्षित अशा समाज वर्गाला - राष्ट्रीय समाजाला सत्ता, संपत्ती आणि सन्मान मिळवून देण्यासाठी रासपाचा जन्म झाला आहे. दिल्ली संसद भवन म्हणजे सत्तेचे सर्वात मोठे मंदिर असल्याचे आधुनिक लोकशाही भारताचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत. अर्थात मा. महादेव जानकर यांना आता ‘संसद भवन दिल्ली’ गाठायची आहे. रासपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक वर्ग 'राष्ट्रीय समाज नायक' महादेव जानकर यांचा वाढदिवस ‘राष्ट्रीय समाज दिवस’ म्हणून साजरा करीत असतो. याच दिवशी रासपासाठी संपूर्ण सत्ता प्राप्तीचा संकल्पहि हा वर्ग करतो. सर्व प्रकारचे अडचणी –विरोध पार करून मा. महादेव जानकर आपल्या इप्सित ध्येयाप्रत लवकरात लवकर पोहोचो, अशी सदिच्छा राष्ट्रीय समाज नायक महादेव जानकर यांच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त (19 एप्रिल 2025)  व्यक्त करतो आणि पुढील कार्य-क्रमाना मनापासून शुभेच्छा देतो..


"इस देशपर मुझे राज करना है. देश का प्रधानमंत्री बनना है." इसलिए संसद भवन मेरी पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष का लक्ष्य बनाया है. महादेव जानकर के ये बयान है. 32 सालसे ये उनका नारा रहा है, लक्ष्य रहा है.  मुंबई के असेंब्ली - विधानसभा मे महादेव जानकर और उनकी पार्टी पहुंची. उन्हे अब संसद भवन दिल्ली पहुंचना है, और हम सबको मिलकर संसद भवन दिल्ली पहुंचाना है... 


आज, राष्ट्रीय समाज दिवस है, 

आये, हम सब संकल्प करे...


19 एप्रिल का दिवस !

महादेव जानकर जन्म दिवस!

राष्ट्रीय समाज दिवस!!


राष्ट्रीय समाज भारत का, 

भारत राष्ट्रीय समाज का !

भारत पर अब राज नही चलेगा गैरोंका !!  


राष्ट्रीय समाज दिवस है ! आऐ हम सब संकल्प करे,

कॉंग्रेस, भाजपा तथा और पार्टी के प्रधानमंत्री इस गेट से गये.

अब संसद भवन दिल्ली को इंतजार है...       

बालक चंद्रगुप्त को राष्ट्रीय समाज पार्टी के प्रधानमंत्री का !


जितना बडा संघर्ष, उतना बडा फल.

पार्टी के नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता तथा हितचिंतक गौर करे...

जितना जादा कार्य, गती

उतना लक्ष्य नजिक समय कम!

तो चले लक्ष्य की ओर...

राष्ट्रीय समाज पक्ष ! 

संसद भवन लक्ष्य !!


19 एप्रिल का दिवस !

महादेव जानकर जन्म दिवस!

राष्ट्रीय समाज दिवस!!

राष्ट्रीय समाज भारत का, 

भारत राष्ट्रीय समाज का !

भारत पर अब राज नही चलेगा औरोंका !!  


आज, राष्ट्रीय समाज दिवस है, 

आवो, हम सब मिलकर संकल्प करे...

रासपा को दिल्ली भेजना है !

जानकर महादेव को प्रधानमंत्री बनाना है !!


राष्ट्रीय समाज नायक महादेव जगन्नाथ जानकर

जन्म जयंती दिवस निमित्त तमाम राष्ट्रीय समाज बंधू आणि भगिनींना...

राष्ट्रीय समाज दिवसमय हार्दिक – हार्दिक शुभेच्छा !


लेखन – संकलन:-

श्री. एस.एल.अक्कीसागर

संस्थापक अध्यक्ष, ऑल इंडिया रिजर्व बैंक ओ.बी.सी एम्पलॉइज वेलफेअर असोसीएशन

संस्थापक अध्यक्ष, रिझर्व बैंक एस.ई.बी.सी. / ओ.बी.सी एम्पलॉइज असोसीएशन, मुंबई

कार्यकारी संपादक : विश्वाचा यशवंत नायक ( 29 सितम्बर 1994 से)

लेखक – सत्यशोधक दंडनायक - संत कनकदास (31 मई 2005)

सदस्य, शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल, दिल्ली

सदस्य, श्री कागिनेली महासंस्थान कनक गुरुपीठ, कर्नाटक

माजी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष (05.012018 से  29.08.2021)

संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय समाज एम्प्लॉइज फेडरेशन रा-सेफ (2010 से  )

(मो. 9969608338) Email ID : sidsagar1956@gmail.com: मुंबई, दि. 19.04.2025

Thursday, May 1, 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025