Wednesday, February 26, 2025

सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेसाठी मुदत व्याप्ती वाढविण्यात यावी : दिपकराव तिरके

सावित्रीबाई फुले स्वाधार योजनेसाठी मुदत व्याप्ती वाढविण्यात यावी : दिपकराव तिरके 

रिसोड : सावित्रीबाई फुले स्व आधार योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त इतर मागास घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदविका व्यावसायिक शिक्षण घेता यावे, म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट आधार संलग्न खात्यात वितरित केले जाते. परंतु या योजनेची माहिती भटक्या विमुक्त व इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यापर्यंत वेळेत पोहोचत नाही, ऑनलाईन अर्ज सादर करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे या योजनेची मदत वाढवण्यात यावी, तसेच सदर योजना शहरी व तालुका भागातील प्रवेशासाठी लागू आहे. परंतु शासनाने ग्रामीण भागात अनेक वैद्यकीय महाविद्यालय प्रशिक्षण संस्था तसेच इंजिनिअरिंग कॉलेज यांना मान्यता दिल्याने, ग्रामीण भागात प्रवेश घेणाऱ्या मुला मुलींना या योजनेचा लाभ मिळत नाही, तो मिळावा याकरिता या योजनेची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दीपकराव तिरके यांनी बहुजन कल्याण मंत्री, सामाजिक न्यायमंत्री तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025