राष्ट्रीय समाज पक्षाने महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वाराणसी येथील पुतळ्याजवळील आक्षेपार्ह फलक हटविले
वाराणसी - उत्तर प्रदेश (१८/२/२५) : काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोध्दार करणाऱ्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वाराणसी येथील पुतळ्याभोवती काही सूचना फलक लावले होते. तसेच महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे नाव देखील झाकोळले होते. आक्षेपार्ह विचित्र सूचना फलक पाहून देशभरातून होळकर समर्थकांनी नाराजी दर्शवली होती. समाज माध्यमातून संताप व्यक्त होत होता. अखेर आज राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठिय्या देऊन ते सूचना फलक हटवले आहेत. रासपचे मिर्जापूर जिल्हाध्यक्ष अनिलकुमार पाल यांचे बंधू सुनील टायगर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे पुष्पहार व राष्ट्रीय समाज पक्षाचे दुपट्टा अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मिर्जापुर येथून डॉक्टर राजेश पाल, जिला उपाध्यक्ष, संदीप पाल भदोही यांनी फलक हटवण्यास प्रशासनास भाग पाडले. उत्तर प्रदेश रासप पदाधिकारी कार्यकर्ते यांचे रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी अभिनंदन केले आहे. रासपचे सर्वत्र कौतुक होत आहे, सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment