Wednesday, February 26, 2025

घटनेत आरक्षण नाही, प्रतिनिधित्व आहे : अक्कीसागर

घटनेत आरक्षण नाही, प्रतिनिधित्व आहे : अक्कीसागर

सामाजिक महापरिवर्तन गठबंधन (SRA) मीटिंग संपन्न 


मुंबई (१९/१/२०२५) : सामाजिक न्याय व जातीय जनगणना करण्यासाठी ओबिसी, एसी.सी, एसटी आणि अल्पसंख्यांक संघटनांची भूमिका काय.? याविषयावर ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. सामाजिक परिवर्तन गठबंधनचे संयोजक आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त जस्टिस व्हि. ईश्वरया, अध्यक्षस्थानी आणि मुख्य वक्ते मार्गदर्शक म्हणून ऑल इंडिया आरबीआय एम्प्लॉइज ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक/राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्कीसागर उपस्थित होते. श्री. अक्कीसागर म्हणाले, आरक्षण हा शब्द घटनेत नाही, प्रतिनिधित्व Representedness असा शब्द आहे. देश स्वतंत्र झाला तरीही कित्येक समाज घटकांना अद्याप सामाजिक, आर्थिक, राजकीय पर्याप्त भागीदारी वा न्याय अजून मिळालेला नाही. AIBCF च्या सर्वच मागण्यांना महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे समर्थन असेल, असे त्यांनी सांगितले.

सेवानिवृत जस्टिस व्हि. ईश्वरय्या यांनी विविध मुद्द्यांवर काँगेस, भाजप पक्षावर जाहिर नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी फक्त बोलतात मात्र करत तर काहीच नाही, अशा शब्दांत काँगेस समर्थकाना माजी न्यायमूर्ती ईश्वरय्या यांनी सुनावले. महादेव जानकर यांचा आम्हाला पाठींबा राहिला आहे व नेहमीच ते आमच्या सोबत असतात. अक्कीसागर साहेब हे भारतातील एक रत्न आहे. त्यांचे मार्गदर्शन आजच्या मीटिंगमध्ये महत्त्वाचे आहे. आरक्षण कायदा इंग्रजीत मसुदा तयार केला आहे, त्याची प्रत तुम्हाला दिली जाईल. वेगवेगळया राज्यात स्थानिक भाषेतून आरक्षण अंमलबजावणी कायदा जनजागृती करावी व चर्चा घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी केले.

गुजरात मधील एका वक्त्याने ओबीसी नेतृत्वाना मंत्रीमंडळात डावलले जाते व दुय्यम दर्जाचे पद दिले जाते, याकडे लक्ष वेधले. बैठकित अलाहाबाद उच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश विरेंद्र सिंह यादव, सर्व आदिवासी समाज छत्तीसगढ संघटनेचे युवा अध्यक्ष डॉ. सुभाष सिंह, भोपाळचे माजी जिल्हा सत्र न्यायाधीश रमेशचंद्र चौरसिया, श्रीकांत पाल, दिंगबर राठोड, आदिराम धाकड, सायंटिस्ट बी. एस. राजपूत (रायगढ, छत्तीसगढ), बहादुर सिंह, दादन बैगन, डॉ. बी.एल. कुशवाह (सतना), रॉबिन वर्मा (लखनऊ), डॉ. रोहिणी साहु, गोविंदराम शूरनर(नांदेड, महाराष्ट्र), रमाकांत करगटला(तेलंगणा), हशीत जाधव, के. पी. वर्मा(मेहर, मध्य प्रदेश), किशोर पंचोली, अशोक कुमार, मालकन सिंह, नामदेव बोरसे, नरेंद्रसिंह चौधरी, राजकुमार सिंह, रामेश्वर ठाकूर, रामकृष्ण यादव, ऋषिकेश जरग(सांगली, महाराष्ट्र), श्री निवास, शिवलिंगप्पा जोगीन(बेंगलोर, कर्नाटक), श्रीराम सेन, तिकेश कुमार, गुलसिंहमेटारीभाई राठोड, कशमा सिंह, नीलम यादव, प्रकाश मालवीय, डॉ. केवल कृष्ण, आबासो पुकळे (सातारा, महारष्ट्र) सहित देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025