Tuesday, February 18, 2025

नांदुर मध्यमेश्वर येथील होळकर वाडा तोडफोडी विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

नांदुर मध्यमेश्वर येथील होळकर वाडा तोडफोडी विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक

होळकरवाडा पाडणाऱ्या माथेफिरूवर कठोरात कठोर कारवाई करा : रासप जिल्हाध्यक्ष

नाशिक १५/१/२५ : राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्याची तोडफोड व त्याठिकाणी होळकरवाडा पाडून इतर नवीन बांधकाम करण्याच्या विरोधात आता रासप उतरल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष नवनाथ भाऊ शिंदे व त्यांचे सहकारी खुशीराम पाल, ज्ञानेश्वर ढेपले, अनिल लांडगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन जलद कारवाई करण्याची मागणी केली. अहिल्यादेवी होळकर यांनी नाशिक जिल्ह्याबरोबरच पूर्ण भारतभर विश्व हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. मंदिरे, मस्जिद, चर्च बांधली. असंख्य राम मंदिर ही बांधली. त्याचप्रमाणे घाट, बारव अशा पद्धतीने विविध समाज उपयोगी कार्य केले. वाट सरूनसाठी धर्मशाळा, कितीतरी अन्नछत्रे, पशुपक्षांसाठी अभयारण्ये अशा पद्धतीने समाज उपयोगी जीवन उपयोगी काम मातोश्रीने केली आणि एवढ्या महान महाराणीच्या व्यक्तिगत संपत्तीतील एक हिस्सा म्हणजेच नांदूर मध्यमेश्वरचा होळकर वाडा जो त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना खासगीची संपत्ती म्हणून दिलेला होता.  म्हणजेच एक प्रकारे अहिल्यादेवी होळकर यांनी कोणत्याही प्रकारे राज्याचा किंवा त्यांच्या मराठा साम्राज्यातील असणाऱ्या संपूर्ण संपत्तीचा भाग न वापरता हा स्वतः अहिल्यादेवी होळकर यांच्या खाजगी संपत्तीतील वाडा असून, त्या जागेवरती अज्ञात लोक येऊन होळकर वाड्याची तोडफोड करतात आणि होळकर वाड्याची तोडफोड करून त्या ठिकाणची चीज वस्तू गायब करण्याचा प्रयत्न करतात आणि एवढं होत असताना प्रशासन झोप लागल्यासारखे त्या ठिकाणी दुर्लक्ष करते, ही बाब गंभीर असल्याचे, रासप जिल्हा अध्यक्ष नवनाथ भाऊ शिंदे यांनी नमूद केली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्याहस्ते त्याठिकाणी उद्घाटन झालं. होळकरवाडा पाडून राम मंदिर बांधण्यात यावे, अशी मागणी त्या जागी होत असेल तर ही आम्हास मान्य नाही. होळकर वाड्याच संवर्धन व्हायला हवे व राम मंदिर व्हावे अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची आहे. ज्याप्रमाणे आयोध्या व काशी या ठिकाणी मातोश्रींचा सन्मान झाला, त्याचप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्यामध्ये सुद्धा कुठलेही नवीन काम होताना मातोश्रींचा सन्मान होने गरजेचे आहे. आणि तसं न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रभर जनआंदोलन उभं करेल आणि त्यानंतर जे सामाजिक पडसाद उमटतील किंवा अहिल्याप्रेमी व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असेल. ज्या माथेफिरुंनी  होळकरवाडा पाडण्याचं काम केलं किंवा होळकर वाड्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कोठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व असे न केल्यास राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाभर घोंगडी बैठका घेऊन मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभ करून प्रशासनाला जाग आणु असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथजी शिंदे यांनी दिला.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025